मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिकाघारगे

साहित्य : २ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस १ वाटी किसलेला गूळ कणीक आणि तांदळाचं पीठ (अंदाजे कणकेच्या निम्मं) हे लागेल तसं. तळणासाठी तेल पिठीसाखर साजूक तूप चवीनुसार मीठ कृती : एका कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण लावून कीस चांगला वाफवून घ्या. कीस शिजून मऊ झाला की त्यात गूळ घाला. गूळ वितळला आणि मिश्रणाला चांगली उकळी आली की आच बंद करा आणि हे मिश्रण गार करत ठेवा. मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढी तांदळाची पिठी आणि कणीक यांचं मिश्रण घाला. हे प्रमाण अंदाजानेच घ्या, साधारण पुरीसाठी भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवा. पुरी एवढ्या आकाराचे गोळे करून घारगे लाटून घ्या. कढईत गरम तेलावर घारगे लाल रंगावर खरपूस तळून घ्या. गरमागरम घारग्यांवर चहा गाळणीतून पिठीसाखर भुरभुरा. आवडीनुसार वरून साजूक तूपाची धार सोडा.

.png)
वाचने
12565
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा !
आहाहा..मस्तंच!
छान.
पाकृ
लई भारी !
मस्त पाकृ.
आसावरी घारगे ला कॊम्पिटीशन
चला काका तुमचं आपलं काहितरीच.
In reply to आसावरी घारगे ला कॊम्पिटीशन by प्रकाश घाटपांडे
आवडली रेसिपी...
घारगे हा प्रकार आवडत नाही पण
मंग पयल्या तळणीचा माल ये हा.
In reply to घारगे हा प्रकार आवडत नाही पण by प्रचेतस
घारगे वीक पॉईंट
मस्तच. ...