औट घटकेचे सरकार कारण

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
28 Nov 2019 - 2:48 pm
गाभा: 

औट घटकेचे सरकार कारण
मिपा कार आनन्दा ह्यांचे काही मुद्दे

१ .आंतरराष्ट्रीय राजकारणात, जिथे याहीपेक्षा अनेक मुरब्बी प्लेयर्स २४ तास काम करत असतात, तिथे हल्लीच्या काळात दादागिरी करणारे इतका कच्चा डाव टाकतील हे मनाला पटत नाही. कारण हा डाव अगदीच कच्चा होता. शरद पवारांचा आतून पाठिंबपाठिंबातर एक्टे अजित पवार काहीही करू शकत नाहीत असे स्पष्ट आहे. मी हे त्या दिवशीच एका राष्ट्रवादीच्या माणसाला बोललो होतो. आणि त्याने मला स्पष्ट सांगितले की शरद पवारांचा पाठींबा नाहीये. वेट अँड वॉच.
२. राजीनामा दिल्याच्या पत्रकारपरिष्देत फडणवीस अगदी आनंदात होते, म्हणजे भासवात तरी होते, किंवा खरेच होते. जे करायचे होते ते साध्य झाल्याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर होता. मला ते खटकलं होतं.. की आपला डाव फसला असताना देखील माणुस इतका आनंदी कसा राहू शकतो?
३. खरे तर अजित पवारांनी विश्वासघात केलाय, मग पत्रकारपरिषदेत त्यांनी पवारांवर घसरायला हवे होते, पण ते घसरले शिवसेनेवर.

ह्यात माझे असे विश्लेषण
१) संजय राऊत ह्यांनी शनिवारीच ट्विट केले होते कि संभाजी महाराज खानाच्या गोटात घुसून परत आले होते असेच काहीसे
२) बहुमत सिद्ध नसताना पण मंत्रालायत जाऊन काही फायली उरकल्या

हा मुद्दा महत्वाचा कारण निवडणुकी आधी आपलेच सरकार येणार ह्याची पूर्ण खात्री होती
शिवसेने काही झाली तरी आपल्यालाच पाठिंबा देणार म्हणून वानखेडे बुक केले होते

** जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली अगदी नाही पण तडकाफडकी होती **

साडेपाच वाजता संध्याकाळी ,दुसऱ्या दिवसाहीच्या पेंडिंग फाइल्स तश्याच राहू शकतात
आता सोमवारी त्या क्लिअर झाल्याची संभावना रोखता येत नाही

३) शरद पवार ह्यांचा हात

असेल किंवा नसेल पण एवढे आमदार ह्यांना अजित पवार अचानक बोलावतात कोणीच पवार ह्यांना पूर्व कल्पना दिली नाही असे होऊ शकत नाही ,काका पुतण्याचे उघड भांडण सगळ्यांना माहित असणारच

४) अजित पवार ह्यांनी राजीनामा दिल्यावर फडणवीस २ तासात राजीनामा दिली
घाई नव्हती कारण नंतर विधान सभेत बहु मत सिद्ध करायचे होते ,वाटाघाटी ला अजून वेळ होता मग असे का

प्रतिक्रिया

आयला, माझ्या मुद्द्याना उत्तर द्यायला स्पेशल धागा काढला हे पाहून मला एकदम भाजपा प्रवक्ता झाल्याचाच भास होतोय!

असो. माझे पण असेच काहीसे मत आहे.

हस्तर's picture

28 Nov 2019 - 5:54 pm | हस्तर

उत्तर नाहि

मला पण असेच वाटत होते,माझे तुम्च काहि मुद्दे सेम होते

मुक्त विहारि's picture

28 Nov 2019 - 9:38 pm | मुक्त विहारि

ते काही वेळा कधीच कळत नाही.

जसा "जॅक द रीपर" कुठली व्यक्ती होती?

यांचे नाव मिपावर आदराने घेतले जात नाही, पण ते देखील असेच म्हणतायत.. मला तर प्रश्न पडलाय की अगदी माझं वाचून त्यांनी लेख लिहिला की काय :प
http://jagatapahara.blogspot.com/

हस्तर's picture

29 Nov 2019 - 12:15 pm | हस्तर

मला पण तोच प्रश्न आहे

रमेश आठवले's picture

29 Nov 2019 - 5:27 am | रमेश आठवले

अजित पवार यांनी स्वतःचे नाक कापुन घेऊन फडणवीस यांना तोंडघशी पाडले.

विजुभाऊ's picture

29 Nov 2019 - 6:28 am | विजुभाऊ

आगे आगे देखो काय होतंय ते

चौकस२१२'s picture

29 Nov 2019 - 7:03 am | चौकस२१२

- अजित पवार निर्लज्ज तेने राष्ट्रवादीत थोड्या वेळात उच्च पदावरच दिसतील...आणि लोक काहीही बोलणार नाहीत ...
- फडणवीसांनी एकदम विश्वास कसा ठेवला? आणि शहां आणि त्यांचं काहीच बोलणे झाले नाही हे पटत नाही.
- शरद पवारांनी स्वतःहून अजित पवारांना "ट्रोजन हॉर्स" सारखे पाठवले हे काही खरे वाटत नाही ( फार विचित्र असते ते आणि कदाचित गुन्हा पण)
- अजित पवारांनी जे केले त्यातील नैतिक भाग सोडून त्या पत्राचा वापर हे गुन्हा म्हणून नोंद होऊ शकता का? इतर काही देशातील लोकशाहीत नक्कीच काही तरी गंभीर कारवाई झाली असती अश्या वर्तणुकीवर
- फडणवीसांनी खरंतर अजित पवारांची पण घायला हजेरी पाहिजे पाहिजे होती राजीनामाच्या पत्रकार परिषदेत! का नाही घेतली? कारण त्यातून त्यांची चूक उघडली असती
आणि सर्वात मोठा प्रश्न कि कोणीही पत्रकार हे प्रश्न थेट अजित पवारांना आणि फडणवीसांना कधीतरी विचारेल? भारतीय " इन्वेस्टिगेटिव्ह जर्नालिसम" ची अवस्था बघता तसे कधी होईल असे वाटत नाही... एकतर आंधळी भक्ती किंवा अर्णब सारखी नुसती आरडाओरड दुर्दैव

मुक्त विहारि's picture

29 Nov 2019 - 9:33 am | मुक्त विहारि

राजकीय नेते , विशेषतः भारतातील, खूप मोठे जादूगार आहेत.

माझी एका रूपयात मिळणारी झुणका-भाकर पण अशीच गायब झाली.

Now you see me. ..हा सिनेमा चांगला आहे. ....

बोलघेवडा's picture

29 Nov 2019 - 7:14 am | बोलघेवडा

तो डाव कच्चा च होता. त्यात खूप काही खोल खेळी नव्हती हे आता भाजप समर्थकांनी पचनी पडून घेतल पाहिजे.
औट घटकेच्या सीएम कडे मोठे निर्णय घेण्याचे अधिकार नसतात.

नाखु's picture

30 Nov 2019 - 7:27 am | नाखु

तसही असेल।

दि. २३.११.१९ फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि धिंगाणा सुरु झाला.पण ही शपथ काही उगाच घेतली नव्हती त्या मागं एक खास कारण होतं. आधि बहुमत युतीकडून अल्यावर फडणविस निश्चिंत होते, पण शिवसेनेने पाठित खंजिर खुपसल्यावर मात्र एक प्रश्न निर्माण झाला.जे विकासकामे महाराष्ट्रात चालु होते त्याचा अतिरिक्त निधी संबंधीत खात्यात अधिच पडुन होता. तर दुसरीकडे शिवसेना व दोन्हि काँग्रेस नोटबंदि मुळे चांगलेच संकटात सापडले होते.त्यांचा पुर्ण डोळा ह्या निधीवर होता.ह्या निधीला मुख्यमंत्र्याच्या सहि शिवाय कोणिहि हात लावु शकत नव्हते.राज्यपाल सुद्धा नाहि.त्यामुळेच फडणविस ह्यांनि ही योजना आखली कि सरकारी कामकाजाच्या वेळेत किमान चार ४ तासांचा अवधि हा सर्व निधि पुन्हा केंद्र सरकारच्या खात्यात जमा करायचा.त्या योजने नुसार अजित पवारला त्याच्या सर्व गुन्ह्या मधुन मुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले.(ह्याच्या दोेन बाजु होत्या,एक जर अजित पवार सोबत अालेच तर विकास कामे चालु रहातिल व राष्ट्रवादि दुबळि होइल आणि शिवसेनेचा काटा काढता येइल,दुसरी अजित पवार सोबत नाहि थांबले तर ४ तासात हा निधि पुन्हा केंद्राकडे पाठवता येइल).हे सर्व माहित असणारे दोघंच विरोधि पक्षाकडे होते ते म्हणजे शरद पवार आणि प्रुथ्विराज चव्हाण. अजित पवार ह्यांनि शपथ घेतली हे ऐकुन ह्या तिन्हि पक्षांना घामच फुटला.आणि इकडे हा तमाशा चालु असतांना फडविसांनि त्यांचे काम व्यवस्थित पार पाडत हा निधी सुरक्षित पणे केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला.एकंदरित फडणविसांनि जनतेचा पैसा चुकिच्या हातात पडण्या पासुनच वाचवला.पण दुसरिकडे लोक शरद पवार ला राष्ट्रपती राजवट कशी अजित पवारला मुद्दामुन हे नाटक करुन उठवलि ही गरळ अोकतायेत. खरेतर फडणविसांनि शरद पवारचाच गेम केला त्याचे घर फोडुन.आता त्यांना निधि साठि वारंवार केंद्रा कडेच हात पसरावे लागतिल.

(Forwaeded)

राज्य आणि केंद्रात निधी वाटपाचे काही नियम आहेत त्या नुसार राज्याचा हिस्सा राज्याल मिळेलच .
केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाची सरकार असली म्हणून केंद्राला अडवणूक करता येणार नाही .
केंद्र सरकार भारताचे असते कोणत्या पक्षाचे नाही.
त्या प्रमाणे राज्यसरकार त्या राज्याचे असते पक्षाचे नाही

मावळती विधानसभा विसर्जीत होण्याआधी शेवटच्या दीवशी त्यांना हे करता आले असते. शीवसेनेने त्यावेळी सो कॉल्ड पाठित खंजिर खुपसलाच होता की.
Forwaeded आहे - कीती खरं किती खोट कुणास ठाउक

आचारसंहिता आणि काळजीवाहू ला मर्यादा असतात...
राष्ट्रपती राजवटीला नसतात, पण राष्ट्रपती राजवटीत केले असते प्रचंड आरडाओरडा झाला असता.

तरीही अजून मला हे कारण पटत नाहीये, अजून काहीतरी आहे.

काही ही कारण देतात 80 दिवसाच्या सरकार विषयी.
कोणत्याच स्वतःच्या डोक्याने विचार करणाऱ्या माणसाला पटणार नाही निधी परत पाठवला ही थाप.
उलट हसायला येतेय ती पोस्ट वाचून .
बकवास पोस्ट .
एका शब्दात

जॉनविक्क's picture

1 Dec 2019 - 10:06 pm | जॉनविक्क

यासाठीच पॉपकॉर्न एका हातात असुदे!

गणेशा's picture

2 Dec 2019 - 12:54 am | गणेशा

सारासार थाप आहे ही, आपली सत्तापिपासू वृत्ती लपवण्यासाठीची.

रमेश आठवले's picture

30 Nov 2019 - 6:39 am | रमेश आठवले

सगळं करून सावरून मोकळं झाल्यावर संजय राऊत हा आता उद्धवला मोदींचा धाकटा भाऊ म्हणतो. बाळासाहेबांचा भाजपाशी सम्पर्क मुख्यतः प्रमोद महाजन यांच्याद्वारा होता. प्रमोदना त्यांच्या धाकट्या भावाने काय केले त्याची आठवण झाली.

थोरल्यालाची आठवण विसरलात काय ?

रोचक आहेत हे नक्की.

फडणवीसांचे चार दिवसांचे सरकार एक चाल होती, भाजप खासदाराचा गाैप्यस्फोट
भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी सांगितले की, महाराष्ट्राला केंद्राने दिलेले ४० हजार कोटी रुपये वाचविण्यासाठी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचं नाट्य केलं असं देवेंद्र फडणवीसांचे नाव घेता सांगितले. आमचा माणूस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनला आणि राजीनामा दिला. पण हे नाट्य का केले गेलं? आमच्याकडे बहुमत नाही हे माहित असतानाही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, हा एक प्रश्न सगळेच विचारतात.

https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-made-cm-save-centra...

आनन्दा's picture

2 Dec 2019 - 7:55 pm | आनन्दा

अश्या गोष्टी चार चौघात सांगायच्या असतात?
Anyways, हे नेमके काय करतायत काहीच कळत नाही. फडणवीस सोडा हो, पण पवारांच्या बुडाखाली पण टाइम बॉम्ब लावून ठेवला ना.

माझे वयक्तिक मत असे होते कि, ही bjp itcell ची फेक न्यूज असेल आणि आम्ही कसे तोंडावर आपटत नाही वगैरे मोठेपणा सांगायचा आहे असे वाटत होते. अजूनही मला तसेच वाटते आहे म्हणा..
पण bjp खासदार असे स्टेटमेन्ट का देतोय हेच कळेना.. एक तर तो व्हाट्सअँप युनिव्हर्सिटी मध्ये पुन्हा शिक्षण घेत असेल किंवा आम्ही अजित पवार यांच्या फाईल बंद करतो आम्हाला हे पैसे खायचे (माघारी जातात का? )आहेत खाउद्या असे पण असू शकते..

भारत हा राज्यकर्त्यांनी भ्रष्टाचाराचा बाजार करून ठेवलाय असेच वाटते आहे आता...

जॉनविक्क's picture

2 Dec 2019 - 8:27 pm | जॉनविक्क

गिरे तो भी टांग उपर

Rajesh188's picture

2 Dec 2019 - 6:31 pm | Rajesh188
Rajesh188's picture

2 Dec 2019 - 6:32 pm | Rajesh188
हस्तर's picture

2 Dec 2019 - 7:29 pm | हस्तर

आता राहुलजी नी