Skip to main content

बटर गार्लिक मश्रुम प्राँस

लेखक गणपा
Published on शुक्रवार, 22/11/2019
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खाता पिताय ना? बरेच दिवसांनी हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तरी आपलं मानुन घ्या.
 साहित्य :
 1 लसुण बारीक चिरून 1½ इंच आलं बारीक चिरून 1 चमचा चिली फलेक्स 1-2 चमचे ड्राय हर्बस् 2 चीज क्युब/ सालाईस 1-2 चमचे सोया साॅस 1 मोठी वाटी फुल क्रीम/ साय बटर/लोणी चवीनुसार मीठ.  आवडत असल्यास मश्रुमचे काप करून. स्वच्छ केलेली ताजी कोलंबी. कृती :  कोलंबीला लसुण आलं सोयासॅस चिलीफ्लेक्स लावून 15 मि. मुरत ठेवावं.   पॅन तापवून त्यात बटर टाकून त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे खरपुस परतुन घ्यावेत. मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.   आता त्याच पॅनमधे राहीलेल्या बटरवर मश्रुमचे तुकडे मध्यम आचेवर (2-3 मि.) शिजवू घ्यावे. चवीनुसार मीठ टाकावं. मश्रुम शिजले की त्यात क्रीम, चीज, राहिलेले फ्लेक्स, हर्बज् टाकून त्याचा साॅस करावा.  त्यातच शिजवुन बाजुला ठेवलेली कोलंबी टाकुन सगळं नीट एकत्र करावं. पास्ता न्युडल्स आवडत असतील तर ते वेगळे शिजवून यात टाकू शकतो, किंवा हे असच लच्छा पराठा किंवा अगदी पोळीसोबतही छान लागतं.

याद्या 21630
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

तुमचं नाव ऐकून होतो - पाककृतीचा बादशहा. खरय. ---------- प्रॅान्सना माझा पास, पण रेडमी नोट ८ प्रो'चे भारी फोटो!!

In reply to by कंजूस

तुमचं नाव ऐकून होतो - पाककृतीचा बादशहा. खरय.
अगदी योग्य वर्णन. सध्या हा बादशहा हायबरनेशन मोडमधे असतो. आज त्याला जागा झालेला बघून आनंद जाहला.

पक्की शाकाहारी असले तरी फोटो काय सुरेख आलेत. मस्तच.

In reply to by श्वेता२४

राजमा शिजल्यावर प्रॉन्ससारखाच दिसतो आणि अमच्या ओफिस कँटीनमध्ये अय्यर फसला होता. मग रविवारी टिटवाळा महागणपतीला जाऊन आला.

सगळ्यात आधी वेलकम बॅक बाकी गणेशा झालाय

सुरेख

पण मला ... मासे किंवा इतर मांसाहारी पदार्थ झणझणीतच आवडतात

In reply to by प्रचेतस

सेम कृती केल्यास मला वाटतं, मजा येईल. गंपाकडे क्लास लावा तुम्ही. -दिलीप बिरुटे (गंपाच्या शाळेतला वाट्सअ‍ॅप विद्यार्थी)

आनि वेल्कम ब्याक असं या ठिकानी म्हनतो.
मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.
ह्या असल्या टिपा देतायसा म्हनुन कळतया आम्हास्नी. न्हाईतर कितिबी चांगली बघुन आनल्याली कोळंबी चिवट्ट व्होत हुति. पुन्हा या पुन्हा या आणि मी येणार मी येणार मी येणार अन रेशिपी देणार असं म्हणा.

मश्रुम विथ प्रॉन्स? अजाबात खायला नाही आवडणार
आवडत असल्यास मश्रुमचे काप करून.
पुढे अस का लिहलय? प्रॉन्स मश्रुम घालून खाणे म्हणजे बटाटा घालून बनवलेले मटण खाण्यासारखे वाटते! बटर गार्लिक प्राँस अशे नाव देऊन पुढे आवडत असल्यास मश्रुमचे काप करून घाला असे लिहले असते तर बरे झाले असते! रेसीपी आवडली पण मश्रुम घालून नाय बनवणार.

कोण हे गणपा? नवीन सदस्य दिसताय. आल्या आल्याच पाकृ पासुन सुरुवात. फोटो पाहुन वाटतय खरं की ठीक्ठीक बनलेल असावं. उगाच लोकं तारीफ नाही करणार. आणी हो असं पण गणपा नाव पाहिले की मी धागा उघडुनही पहात नाही.(कशाला उगाच स्वतःचा जीव जाळा) ना मी धागा उघडला ना मी कोलंब्या पाहिल्या, ना मी मशरुम पाहिले ना मी सजावट पाहिली ना मी प्रतिसाद दिला.

आले.आले . आद्य खाद्य साहित्यिक गम्पू पैलवान आले! ही पा कृती नुसत्या मशरूम ची करणार ! (आणि खायला पांडू आणि आगोबाला बोलीवणार! पण ते नै येणार https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif म्हणून मग मीच खाणार.)

कोळंबी ला पर्याय काय घेता येईल?