बटर गार्लिक मश्रुम प्राँस

गणपा's picture
गणपा in पाककृती
22 Nov 2019 - 3:20 pm

नमस्कार मंडळी,
कसे आहात सगळे? खाता पिताय ना?
बरेच दिवसांनी हजेरी लावतोय. काही चुकलं माकलं तरी आपलं मानुन घ्या.

साहित्य :

1 लसुण बारीक चिरून
1½ इंच आलं बारीक चिरून
1 चमचा चिली फलेक्स
1-2 चमचे ड्राय हर्बस्
2 चीज क्युब/ सालाईस
1-2 चमचे सोया साॅस
1 मोठी वाटी फुल क्रीम/ साय
बटर/लोणी
चवीनुसार मीठ.

आवडत असल्यास मश्रुमचे काप करून.
स्वच्छ केलेली ताजी कोलंबी.

कृती :

कोलंबीला लसुण आलं सोयासॅस चिलीफ्लेक्स लावून 15 मि. मुरत ठेवावं.

पॅन तापवून त्यात बटर टाकून त्यात लसुण आणि आल्याचे तुकडे खरपुस परतुन घ्यावेत.
मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.

आता त्याच पॅनमधे राहीलेल्या बटरवर मश्रुमचे तुकडे मध्यम आचेवर (2-3 मि.) शिजवू घ्यावे. चवीनुसार मीठ टाकावं.
मश्रुम शिजले की त्यात क्रीम, चीज, राहिलेले फ्लेक्स, हर्बज् टाकून त्याचा साॅस करावा.

त्यातच शिजवुन बाजुला ठेवलेली कोलंबी टाकुन सगळं नीट एकत्र करावं.

पास्ता न्युडल्स आवडत असतील तर ते वेगळे शिजवून यात टाकू शकतो, किंवा हे असच लच्छा पराठा किंवा अगदी पोळीसोबतही छान लागतं.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

22 Nov 2019 - 3:36 pm | कंजूस

तुमचं नाव ऐकून होतो - पाककृतीचा बादशहा.
खरय.
----------
प्रॅान्सना माझा पास, पण रेडमी नोट ८ प्रो'चे भारी फोटो!!

गवि's picture

22 Nov 2019 - 11:29 pm | गवि

तुमचं नाव ऐकून होतो - पाककृतीचा बादशहा.
खरय.

अगदी योग्य वर्णन.

सध्या हा बादशहा हायबरनेशन मोडमधे असतो. आज त्याला जागा झालेला बघून आनंद जाहला.

श्वेता२४'s picture

22 Nov 2019 - 5:48 pm | श्वेता२४

पक्की शाकाहारी असले तरी फोटो काय सुरेख आलेत. मस्तच.

आता राजमा अधिक मशरुमची एखादी पाककृती येणार बहुतेक.

श्वेता२४'s picture

22 Nov 2019 - 5:54 pm | श्वेता२४

बिरडे पण चालतील.

राजमा शिजल्यावर प्रॉन्ससारखाच दिसतो आणि अमच्या ओफिस कँटीनमध्ये अय्यर फसला होता.
मग रविवारी टिटवाळा महागणपतीला जाऊन आला.

जॉनविक्क's picture

22 Nov 2019 - 6:26 pm | जॉनविक्क

धाग्यावर प्रतिसादाच्या उड्या पडूदेत.

आवडाबाई's picture

22 Nov 2019 - 8:24 pm | आवडाबाई

सगळ्यात आधी वेलकम बॅक
बाकी गणेशा झालाय

गवि's picture

22 Nov 2019 - 8:49 pm | गवि

वाह गणपा वाह.. लाजवाब पाककृती आणि लाजवाब प्रेझेंटेशन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2019 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी हो गणपा सेठ.

-दिलीप बिरुटे

जालिम लोशन's picture

22 Nov 2019 - 10:32 pm | जालिम लोशन

सुरेख

मुक्त विहारि's picture

22 Nov 2019 - 10:34 pm | मुक्त विहारि

पण मला ... मासे किंवा इतर मांसाहारी पदार्थ झणझणीतच आवडतात

नूतन सावंत's picture

24 Nov 2019 - 9:37 pm | नूतन सावंत

मुवि,कोलंबी या गोडसर चवीतही भारीच लागते.

चंबा मुतनाळ's picture

23 Nov 2019 - 7:33 am | चंबा मुतनाळ

वेलकम बॅक गणपासेठ

प्रचेतस's picture

23 Nov 2019 - 9:36 am | प्रचेतस

ही पाकृ प्रॉन्स न घालता कशी करावी?

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 10:44 pm | मुक्त विहारि

आणि मश्रूम आवडत नसतील तर. ..बटाटे. ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Nov 2019 - 9:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सेम कृती केल्यास मला वाटतं, मजा येईल.
गंपाकडे क्लास लावा तुम्ही.

-दिलीप बिरुटे
(गंपाच्या शाळेतला वाट्सअ‍ॅप विद्यार्थी)

सुमो's picture

24 Nov 2019 - 3:58 pm | सुमो

आनि वेल्कम ब्याक असं या ठिकानी म्हनतो.

मुरवलेली कोलंबी मोठ्या आचेवर एक दिड मिनीट परतुन लगेच बाहेर काढावी.

ह्या असल्या टिपा देतायसा म्हनुन कळतया आम्हास्नी. न्हाईतर कितिबी चांगली बघुन आनल्याली कोळंबी चिवट्ट व्होत हुति.

पुन्हा या पुन्हा या आणि मी येणार मी येणार मी येणार अन रेशिपी देणार असं म्हणा.

मश्रुम विथ प्रॉन्स? अजाबात खायला नाही आवडणार

आवडत असल्यास मश्रुमचे काप करून.

पुढे अस का लिहलय?
प्रॉन्स मश्रुम घालून खाणे म्हणजे बटाटा घालून बनवलेले मटण खाण्यासारखे वाटते! बटर गार्लिक प्राँस अशे नाव देऊन पुढे आवडत असल्यास मश्रुमचे काप करून घाला असे लिहले असते तर बरे झाले असते! रेसीपी आवडली पण मश्रुम घालून नाय बनवणार.

नावातकायआहे's picture

24 Nov 2019 - 8:40 pm | नावातकायआहे

काही चुकलं माकलं तरी आपलं मानुन घ्या.

आयला आता हे काय नवीन??

वेलकम बॅक!!

नूतन सावंत's picture

24 Nov 2019 - 9:41 pm | नूतन सावंत

गणपभौ, नेहमीप्रमाणेच कातिल फोटो .पाककृती तर झकास असणार यात वाद नाही.

इरसाल's picture

25 Nov 2019 - 11:45 am | इरसाल

कोण हे गणपा? नवीन सदस्य दिसताय.
आल्या आल्याच पाकृ पासुन सुरुवात. फोटो पाहुन वाटतय खरं की ठीक्ठीक बनलेल असावं. उगाच लोकं तारीफ नाही करणार.
आणी हो असं पण गणपा नाव पाहिले की मी धागा उघडुनही पहात नाही.(कशाला उगाच स्वतःचा जीव जाळा) ना मी धागा उघडला ना मी कोलंब्या पाहिल्या, ना मी मशरुम पाहिले ना मी सजावट पाहिली ना मी प्रतिसाद दिला.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Dec 2019 - 2:32 pm | अत्रुप्त आत्मा

आले.आले . आद्य खाद्य साहित्यिक गम्पू पैलवान आले!
ही पा कृती नुसत्या मशरूम ची करणार ! (आणि खायला पांडू आणि आगोबाला बोलीवणार! पण ते नै येणार https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif म्हणून मग मीच खाणार.)

तुषार काळभोर's picture

5 Dec 2019 - 6:31 pm | तुषार काळभोर

कोळंबी ला पर्याय काय घेता येईल?

विशाखा राऊत's picture

28 Feb 2020 - 6:29 pm | विशाखा राऊत

यम्म्मी रेसेपी :)

नरेश माने's picture

29 Feb 2020 - 11:20 am | नरेश माने

एकदम तोंपासु झालंय फोटो पाहून.