निरोप

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

निरोप

तुझा निरोप घेऊन निघाल्यावर
मनाच्या कोपर्‍यातली
'तू' परत परत
डोके वर काढतच राहतेस
.
काल रात्रीचीच गोष्ट
तुझा बदामी डोळ्यांचा
चेहरा माझ्या ओंजळीत
भरून घेतल्यावर
सुख हातात आल्यासारखे
वाटले ...
.
एक आनंदाश्रू नकळत
निसटला जेव्हा त्या डोळ्यांतून
तेव्हा क्षणात ते सुख
दवभरल्या गुलाबात
परावर्तित झाले
.
भरून आलेला कंठ
आवरत नजर फिरवली
समोरच्या भव्य रक्तवर्णी
गुलमोहराने भानावर आणले
हातातले सुख निसटले
.
कधी कधी वाटते
मी त्या गुलमोहरासारखाच आहे
एकाकी पडल्यामुळे
रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा
माथ्यावर भडक, पण आतून हिरवा
.
आतला हिरवा कोवळेपणा
जाणवल्यावर, तिथे परत
'तू' डोकावतेस..
.
ही अशीच 'तू'
परत परत डोकावून जातेस
निरोप घेऊन आल्यावर
.
अन् मी मग त्या गुलमोहराला
वाईटसाइट बोलत
त्याच्या इतक्याच रक्तवर्णी डोळ्याने
पहात बसतो..
.
'तू' परत डोकावण्याची वाट पहात.
नाही,
निसटलेल्या सुखाची वाट पहात..

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

मस्त लिहिलेय. बऱ्याच दिवसांनी वाचले मिका तुझे लिखाण.

चाणक्य's picture

28 Oct 2019 - 4:03 pm | चाणक्य

मस्त. मिका टच.

गवि's picture

28 Oct 2019 - 4:29 pm | गवि

मिका, लै भारी रे.. !!

पद्मावति's picture

28 Oct 2019 - 11:50 pm | पद्मावति

वाह...सुंदर

मिका टच.

असेच म्हणते.

मनिष's picture

30 Oct 2019 - 2:55 pm | मनिष

मस्त मिकाजी.

कधी कधी वाटते
मी त्या गुलमोहरासारखाच आहे
एकाकी पडल्यामुळे
रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा
माथ्यावर भडक, पण आतून हिरवा

इनिगोय's picture

30 Oct 2019 - 10:42 pm | इनिगोय

:)

फिझा's picture

31 Oct 2019 - 4:15 pm | फिझा

मस्तय कविता .....

भावना , नेमक्या आणि अचूक कशा व्यक्त करायच्या तुमच्याकडून शिकायला हवं .....

कधी कधी वाटते
मी त्या गुलमोहरासारखाच आहे
एकाकी पडल्यामुळे
रक्तवर्णी धुमारे फुटल्यासारखा
माथ्यावर भडक, पण आतून हिरवा

------------------हे मस्त ....... सगळेच एकटे असतात .... असो .

कविता छान !

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:57 pm | श्वेता२४

काल रात्रीचीच गोष्ट
तुझा बदामी डोळ्यांचा
चेहरा माझ्या ओंजळीत
भरून घेतल्यावर
सुख हातात आल्यासारखे
वाटले ...

क्या बात....

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2019 - 12:28 pm | ज्ञानोबाचे पैजार

फारच सुरेख
आवडली
पैजारबुवा,

तुषार काळभोर's picture

9 Nov 2019 - 1:50 pm | तुषार काळभोर

मी मग त्या गुलमोहराला
वाईटसाइट बोलत
त्याच्या इतक्याच रक्तवर्णी डोळ्याने
पहात बसतो..

गुलामोहराच्या रुपकाचा वापर आवडला. छान.