अरे आमच्या फणसाच्या भाजीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा रे!
===============================
तात्या हा तर सरळ - सरळ आचारसंहीतेचा भंग आहे.
तमसो मा ज्योर्तिगमय
फणसाचीच भाजी... !
ती ही भरपूर ओलं खोबरं, दाणे घालून केलेली.
आणि एका पेक्षा जास्ती पर्याय हवे असतील तर.. मग मटकीची उसळ, कांदा फ्लॉवरचा रस्सा!
मग, तळणीची मिरची दही, लसूण चटणी.. सगळंच चालेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
टोमॅटो-फ्लॉवर - बटाटा रस्सा बरोबर एक चपाती
फणसाची भाजी बरोबर एक चपाती
बटाट्याची भाजी बरोबर एक चपाती
ओल्या वाटाण्याची उसळ बरोबर एक चपाती
असं खाणार..
आणी तोंडी लावायला फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं.
अहाहा आता कसं बरं वाटतय.. :)
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
इतके सारे (शेवटचा पर्याय सोडून) एकसे बढकर एक पदार्थ उपलब्ध असताना, एकच निवडायचा म्हणजे 'गाढवाला गुळाची चव काय' अशी गत व्हायची. माझा गाढव होण्यास नकार. मतदान करणार नाही.
ऑर्डरच द्यायची असेल तर -
मी कोकण/गोव्यात असेन तर फणसाची भाजी, तिथंच मावसबहिणीकडं असेन तर केळफुलाची भाजी. पुण्यात असेन तर (काय पण ठिकाण आहे सालं, खाण्याबाबत एकदम भोटम्) मटकी किंवा ओल्या वाटाण्याची उसळ (अट्टल बामणी उसळ). एखाद्या शेतकऱ्याच्या घरी असेन तर फ्लॉवर-बटाटा वगैरेची रस्सा भाजी, आई किंवा मोठी बहीण करून घालणार असेल तर बटाट्याची भाजी, मीच करून घ्यायचं असेल तर फोडणीची मिरची वगैरेचा पर्याय. तोही लई भारी असतो, आपला आपण करण्यात मजा. हवं तितकं तिखट, लसूण वगैरे घेता येतं. हाच पर्याय एका परिचित शेतकऱ्याच्या घरीही करता येतो.
निषेध. असे पर्याय समोर ठेवून चिथावणी दिल्याबद्दल!!! हे म्हणजे संगीत महोत्सवात कुणा एकाचं सादरीकरण ऐकणार का असं विचारण्यासारखं झालं...
राजे - अशा चिथावणीबद्दल आय.टी.अॅक्टमध्ये काय तरतुदी आहेत त्या सांगा जरा.
तुमच्या फणसाच्या भाजी मत दिलंय..!! :D फणसाची भाजी आणि पोळी म्हणजे लय झ्याक जोडी हाय..!! :D
अवांतरः उन्हाळा आलाय तर... खालील पर्याय दिले असते तर अजुन मजा आली असती...
१. कैरीचं लोणचं
२. आमरस..त्यात ताजं कढवलेलं तुप
'यदाकदाचित' स्टाईलमधे, "मीच ती, मीच ती, मीच ती". हे वाक्य मी पहिली त्यातली असं वाचावं!
(तुपाशी/उपाशी मधली) अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
बटाटा भाजी+वाटाणा उसळ+मटकीची उसळ्+फ्लॉवरचा रस्सा+चटणी असे सर्व खाईन मी. एकच का म्हणून. कोणी मला अधाशी म्हणालं तर टारझन कडे कंप्लेंट करण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल. =))
भुकेल्या माणसाला काहीही चालतं! हंगर इज द बेस्ट पिकल् ! तेंव्हा कुठलीही भाजी हेच उत्तर बरोबर वाटतं.
त्याशिवाय ३_१४ शी पण सहमत. अरे, गोड खाल्ल्याशिवाय का कधी जेवण पूर्ण होतं?
(पेशवाई सवयी असलेला) तिरशिंगराव
माझ्यासाठी १ ते ७ सर्व पदार्थ चालतील...
जास्त पसंती फणसाच्या भाजीला कारण ती आपल्याला सॉलिड आवडते. :)
सर्वात कमी पसंती केळफुलाची भाजीला कारण ती मी अजुन खाल्लीच नाही!!! (कशी असेल बरं चवीला ?) :?
उसळ आणि रस्सा खायला मला जास्त विचार करावा लागत नाही...
फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं इत्यादी! हे तर हवचं...
(खादाड )
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
आम्ही पण मटकी उसळ वाले
आणि हो नुसती नाही घरतुन बाहेर पडनार घराजवळ्च चोरगे मिसळ(कोल्हापुरात ही पण फेमस आहे) वाले राह्तात
त्यांच्याकडुन कट( अस्सल शब्द पातळ भाजी)आणणार
मग घरगुती मिसळ करणार
की मग आहेच की मए माझा हात माझे तोंड आणि ती मिसळ
..........................
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......विनायक पाचलग
अजून पर्यंत तरी आमची मटकीचीच उसळ पुढे आहे!!!!
हाहाहाहाहा. कौल थांबणार किती वाजता हे कुठं जाहीर आहे? त्यामुळे तुमचा हा आनंद क्षणभंगूर ठरू शकतो बिका. कारण मुळात निवडणूक आयोगानंच अमूक एका पक्षाला विजयी करा असं आधीच म्हणून ठेवलंय.
बर्याच विचाराअंती, माझे मत फणसाच्या भाजीला, परवाच रत्नांग्रीला गेलो होतो आणी वयनीने ओले काजू घालून केली होती ही भाजी. एकदम आऊट ऑफ धिस वर्ल्ड झाली होती. इथे मुंबैला आई करते ती मात्र दाणे घालून करते हो. ती पण छान लागते.
तशी केळफूलाची भाजी पण छान लागते. दोन्हि भाज्याना मात्र लाल मिरची आणी लसणाची फोडणी मस्ट. साधारणतः बायका ह्या भाज्या करायला तयार नसतात. लय मेहनत लागते चिरायला.
- चंबा
गो प्राजु,
अगो आमच्याकडे कोकणात फणसाच्या भाजीत ओलां खोबरां घालतत पण भरपूर मात्र नाय.दुसरां म्हणजे फणसाच्या भाजीत शेंगदाणे मुळीच घालणंत नाय हां!.
फणसाची कुवरी असली तर त्या भाजीत काळे वाटाणे घालतत.
अर्धो कच्चो अर्धो पिक्या फणसाच्या भाजीक हिंगाची फोडणी देतत.हिंग कसलो पावडर हिंग नाय खडो हिंग.
आणि ही भाजी उकड्या तांदळ्याच्या पेजे बरोबर मस्त लागता.कोणीसां लिवलां ही भाजी पोळी बरोबर खातत म्हणून ,शी गे बाये! कोकणात फणसाची भाजी रोजचीच.पोळी कधितरी सणावाराक करतत.नाय तर पेज नाय तर भात रोजचो असतां.
आतां तुम्ही बाबडे पोळी बरोबर खाल्यात तर माझा काय जाणां नाय म्हणा.आणि शेंगदाणे घातल्यात तरी काय माझा काय नाय.मी आपली कोकणातली पद्धत सांगितली.
वायट वाटांन घेव नको हां!
माझां चुकलां तर होयां तर यशोधरेक विचार.तां तुकां उज्जू सांगताला.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अहो प्राजुचा जांव दे आणि तात्याचो कौल पण जावंदे...
पण तुम्ही या प्रतिसादान माझ्या तोंडात पाणी जमा केल्यात की!!!!
आता एकदम ऑफिसातून उठून खंय जांव अर्धपिक्या फणसाची भाजी आन पेज खावंक?
:)
अहो प्राजुचा जांव दे आणि तात्याचो कौल पण जावंदे...
पण तुम्ही या प्रतिसादान माझ्या तोंडात पाणी जमा केल्यात की!!!!
डांबिसाशी सहमत आसा. सामंतकाकांनी मस्तच लिवला आसा! :)
दुपारपासून अजूनही प्रतिक्रिया मिळत आहेत?
तात्यांनी आतापर्यंत भाजीसोबत चपात्या संपविल्याही असतील आणि पचल्याही असतील. ;)
असो. तात्या, मी तरी मटकीची उसळ निवडली खायला, आताच जेवणात कोबीचे कोफ्ते (की भजी, जे म्हणतात ते) खाउन आलोय तरी .
तूप+काकवी+पोळी ह्या काँबिनेशनचा भोक्ता आहे! त्यामुळे पर्याय निवडायला अंमळ जड गेले पण तरीही 'ओल्या वाटाण्यांची उसळ' हा फर्मास पर्याय निवडलाय - ओलं खोबरं, आलं-लसूण लावलेल्या ताज्या मसाल्यातली दाट ग्रेवी असलेली हिरव्यागार वाटाण्यांची उसळ अहाहा काय रम्य कल्पना! आत्ता जेवण झालेलं असूनही =P~ =P~
चतुरंग
माझी तर टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा हीच पसंत राहील. गरम गरम रश्यात पोळ्या / भाकरी जे काही असेल ते कुस्करुन यथेच्छ आडवा हात मारुन आडवे होण्यात जी मजा आहे ती बाकी कशात नाही. होस्टेलला असताता असाच उभा आडवा हात मारुन आडवा झाल्याने दुपारच्या बर्याच लेक्चरला दांडी मारावी लागली आहे. उसळ मी रात्रीच खातो. दुपारी खाल्ली की बाकिच्यांना त्रास होतो असे लोक सांगतात.
सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
पण खूप कमी लोकाना आवडते म्हणजे कमाल आहे.ही उसळ कोकणातच जास्त होते बहुदा. ह्या वर शेव/खोबरे टाकुन ब्रेड बरोबर खायची.मुम्बैत खायची असेल(आणि घरी बायको करत नसेल) तर पणशीकर नाहितर शिवाजी पार्क चे आस्वाद नाहितर प्रकाश.
भेन्डि(बेन्गळुरु)
तात्या, येवढी तोन्डीलावणी अस्ताना जे हाताला लागेल ते घेऊन त्याबरोबर चपात्या हाणून पोटाची आग शमवायचे सोडून, कौल घेत बसलात?????
तर मग नुस्त्या चपात्यान्चे दोन्ही हातानी तुकडे तोडून, तोन्डात कोम्बुन, (जमल तर चावुन अन मिळाल तर पाण्याबरोबर) गिळण्याचीच तुमची योग्यता! :D नव्हे नव्हे, शम्बरटक्के खात्रीने सान्गतो, तुम्ही आधी तसेच हादडणार! अन मग चपातीभरल्या पोटाने असले कौल लावणार!
तुम्हाला हवीत कशाला तोन्डीलावणी??? कौल लावायलाच ना?????
आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P
आपली बाई अशीच ह्य क्रमाने खायची आवड आहे, असे सगळे मेनू समोर असतील आणि चार चपात्या अश्या संपवू,
१) फणसाची भाजी + २ चपाती
२) डाळिबांची उसळ + १ चपाती
३) केळफुलाची भाजी + १ चपाती
४)मटकीची उसळ (नुसती उसळ मजेने खावू कांदा ,लिंबू द्या ना). संपल्या ना चार चपात्या.
बाकी पदार्थ ऑरडीनरी आहेत. कोण पण कधी पण करु शकते . :)
बाकी सर्व अमान्य
बाकी तात्या॑ना काही काम नाही हा, सकाळपासुन नुसती खाई-खाई सुटली आहे.ईथे बेग॑लोरमधे "मटकी"म्हटलकी लोक्स तो॑डाकडे बघत रहातात..
बटाट्याची भाजी (डोक्यात आधीच आहेत)
फणसाची भाजी (आख्खा फणस कोण उ च ल णा र)
केळफुलाची भाजी (काय असते ते माहीत नाही)
ओल्या वाटाण्याची उसळ (हे चालेल पण चपाती बरोबर वाटाणे खाताना ईकडे तिकडे पळतात, वाटाणे हो)
टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा (तीन का चागल्या दहा भाज्या एकत्र करुन खाऊ की )
फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं इत्यादी! (ह्याच्या बरोबर बाजरीची भाकर हवी !!!)
वांगी बटाट्याचा रस्सा. (नो वा॑गीस प्लीज)
डाळिंब्यांची (कडवे वाल) उसळ. (हे चालेल पण पर्याय एकच आहे ना !!)
वरीलपैकी काहीही नाही. मी चपात्या नुसत्याच खाईन! :)
सुहास..
(द गुड)
मी मात्र योग्य असा "कंपु" निवडेन, जिथे मला सर्व "रसान्चा" स्वाद घेता येईल (या अनुस्वाराच्या तर! :|). पुण्यचा सर्व हाटेलात असेच करीत होतो.
पण तात्या काय आता बामणी खानावळ काढायचा विचार आहे कि काय? जनमत घेताय? ;)
(सदा भुकेला)Nile.
अरे आमच्या
In reply to अरे आमच्या by विसोबा खेचर
अरे आमच्या
In reply to अरे आमच्या by श्री
फणसाचीच
In reply to फणसाचीच by प्राजु
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१
In reply to अरे आमच्या by विसोबा खेचर
मी तर
(फुसका) निषेध
In reply to (फुसका) निषेध by ३_१४ विक्षिप्त अदिती
कोणताच गोड
In reply to कोणताच गोड by विसोबा खेचर
मग माझं
In reply to मग माझं by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुप गुळ
ओल्या वाटाण्याची उसळ
In reply to ओल्या वाटाण्याची उसळ by सहज
+१
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
ओल्या वाटाण्याची उसळ
वरिलपैकि
मटकी
In reply to मटकी by बिपिन कार्यकर्ते
+१
फणसाची
एकेका
In reply to एकेका by अवलिया
हा पर्याय सगळ्यांत उत्तम.
फोडणीची
आमचं मत..
फणसाच्या
फोटु
नामंजूर
वरीलपैकी..
In reply to वरीलपैकी.. by मुक्ता २०
अहो,
फणसाची भाजी
शेवटच्या
In reply to शेवटच्या by विसोबा खेचर
'यदाकदाचित'
In reply to 'यदाकदाचित' by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाला
कौल बदलता येईल का ?
केळफुलाची भाजी कोणालाच नको
अर्थातच मटकीची उसळ!
मी फणसाला
भूक
माझ्यासाठ
हीहाहाहा!!!
In reply to हीहाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
माझीबी
हाहाहाहाहा
In reply to हाहाहाहाहा by श्रावण मोडक
अजूनही...
In reply to अजूनही... by बिपिन कार्यकर्ते
+१
In reply to अजूनही... by बिपिन कार्यकर्ते
निकाल कधी?
In reply to निकाल कधी? by श्रावण मोडक
हो ना...
In reply to हो ना... by बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्षा
फणसाची भाजी
मिपा सदस्य
In reply to मिपा सदस्य by चिरोटा
+१
अर्धो कच्चो आणि अर्धो पिको फणस
भाजी..
फणसाचीच!
फणसाची भाजी आणि पोळी शि गे बाये!
In reply to फणसाची भाजी आणि पोळी शि गे बाये! by श्रीकृष्ण सामंत
सामंतांनु,
In reply to सामंतांनु, by पिवळा डांबिस
अहो
अरे वा.....
मी सध्या
ऑल टाईम फेवरिट
टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा
डाळिंब्यांची (कडवे वाल) उसळ.
नुस्त्या चपात्या गिळेल
आपली बाई
मटकीची उसळ
ऐव्हाना
मी मात्र