Skip to main content

एक अचानक, ऍब्सट्रॅक्ट स्पर्धा.. :)

प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 2318
प्रतिक्रिया 63

अरे आमच्या फणसाच्या भाजीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा रे! :)

In reply to by विसोबा खेचर

अरे आमच्या फणसाच्या भाजीला प्रचंड बहुमतांनी विजयी करा रे! =============================== तात्या हा तर सरळ - सरळ आचारसंहीतेचा भंग आहे. तमसो मा ज्योर्तिगमय

In reply to by श्री

फणसाचीच भाजी... ! ती ही भरपूर ओलं खोबरं, दाणे घालून केलेली. आणि एका पेक्षा जास्ती पर्याय हवे असतील तर.. मग मटकीची उसळ, कांदा फ्लॉवरचा रस्सा! मग, तळणीची मिरची दही, लसूण चटणी.. सगळंच चालेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

हेच म्हणतो ! प्राजुताई तुमचा प्रतिसाद वाचूनच भूक लागली. :-)

In reply to by मुक्तसुनीत

मुक्त रावांचा प्रतिसाद वाचुन मलाही भूक लागली. (गवताच्या पेंडीचा पर्याय नाही का?) बैल

In reply to by विसोबा खेचर

टोमॅटो-फ्लॉवर - बटाटा रस्सा बरोबर एक चपाती फणसाची भाजी बरोबर एक चपाती बटाट्याची भाजी बरोबर एक चपाती ओल्या वाटाण्याची उसळ बरोबर एक चपाती असं खाणार.. आणी तोंडी लावायला फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं. अहाहा आता कसं बरं वाटतय.. :) आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

तूप-गूळ-पोळी खाण्याचा पर्याय का नाही? (गोडघाशी) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणताच गोड पदार्थ ठेवलेला नाही. आहेत त्या पैकी निवड करा नायतर उप्पाशी रहा! :)

In reply to by विसोबा खेचर

मग माझं खाईन तर तुपाशी ... ! :-) तश्शाच खाईन, पण भाजी खाणार नाही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुप गुळ पोळी खाउन लै दिवस झाले... मस्तच आठवण केलीत.... उद्या खावच म्हणतो मी

In reply to by सहज

ओल्या वाटाण्याची उसळ बरेच दिवसात खाल्ली नाही म्हणुन :) (ओल्या वाटाण्याच्या उसळीच्या कंपुतला) टिंग्या

वरिलपैकि काहिच नाहि....खाइन तर तुपाशि नाहितर उपाशि :)

अटक मटक मटकी चटक... बिपिन कार्यकर्ते

फणसाची भाजी आणि मटकीची उसळ मध्ये काय निवड करु सुचत नाहिये. दोन्ही भयंकर आवडतात.

एकेका घासाला वेगळी भाजी नाही चालणार का‍? --अवलिया

फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं इत्यादी! काहि तरी झणझणीत खायची इछ्छा आहे...

मटकीच्या उसळीला! :) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

फणसाच्या भाजीचा विजय असो ! :) फणसाची भाजी केव्हाही मस्त !!!! -- लिखाळ.

फोटु ? तात्या फोटु दिले असतेत तर पदार्थांची कंडीशन बघुन सुचवु शकलो असतो. आपले मत बाटाट्याची भाजी बॉ ! पराटा ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

इतके सारे (शेवटचा पर्याय सोडून) एकसे बढकर एक पदार्थ उपलब्ध असताना, एकच निवडायचा म्हणजे 'गाढवाला गुळाची चव काय' अशी गत व्हायची. माझा गाढव होण्यास नकार. मतदान करणार नाही. ऑर्डरच द्यायची असेल तर - मी कोकण/गोव्यात असेन तर फणसाची भाजी, तिथंच मावसबहिणीकडं असेन तर केळफुलाची भाजी. पुण्यात असेन तर (काय पण ठिकाण आहे सालं, खाण्याबाबत एकदम भोटम्) मटकी किंवा ओल्या वाटाण्याची उसळ (अट्टल बामणी उसळ). एखाद्या शेतकऱ्याच्या घरी असेन तर फ्लॉवर-बटाटा वगैरेची रस्सा भाजी, आई किंवा मोठी बहीण करून घालणार असेल तर बटाट्याची भाजी, मीच करून घ्यायचं असेल तर फोडणीची मिरची वगैरेचा पर्याय. तोही लई भारी असतो, आपला आपण करण्यात मजा. हवं तितकं तिखट, लसूण वगैरे घेता येतं. हाच पर्याय एका परिचित शेतकऱ्याच्या घरीही करता येतो. निषेध. असे पर्याय समोर ठेवून चिथावणी दिल्याबद्दल!!! हे म्हणजे संगीत महोत्सवात कुणा एकाचं सादरीकरण ऐकणार का असं विचारण्यासारखं झालं... राजे - अशा चिथावणीबद्दल आय.टी.अॅक्टमध्ये काय तरतुदी आहेत त्या सांगा जरा.

तुमच्या फणसाच्या भाजी मत दिलंय..!! :D फणसाची भाजी आणि पोळी म्हणजे लय झ्याक जोडी हाय..!! :D अवांतरः उन्हाळा आलाय तर... खालील पर्याय दिले असते तर अजुन मजा आली असती... १. कैरीचं लोणचं २. आमरस..त्यात ताजं कढवलेलं तुप

In reply to by मुक्ता २०

मुळात दिलेत ते पर्याय नाहीत. उपलब्ध पदार्थ आहेत. विसोबांनी गुगली टाकलाय तो.

शेवटच्या पर्यायाला मत देणारी ही मुजोर मंडळी कोण आहेत? :)

In reply to by विसोबा खेचर

'यदाकदाचित' स्टाईलमधे, "मीच ती, मीच ती, मीच ती". हे वाक्य मी पहिली त्यातली असं वाचावं! (तुपाशी/उपाशी मधली) अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला तात्यान्नी विक्षीप्त पणा बद्दल तुप कोण्त्याहि पदार्था बरोबर फुकट दिल असत.;) आपला तुप प्रेमी, (ईतरही गोष्टी खाणारा) Nile.

बटाटा भाजी+वाटाणा उसळ+मटकीची उसळ्+फ्लॉवरचा रस्सा+चटणी असे सर्व खाईन मी. एकच का म्हणून. कोणी मला अधाशी म्हणालं तर टारझन कडे कंप्लेंट करण्यात येईल व योग्य ती कारवाई करण्यात येईल. =))

मी फणसाला मत दिलेय, पण मला केळफुलाचीही भाजी काळे वाटाणे घालून हवीय! एकच का निवडायची म्हणे? तात्या, असा कौल टाकल्याबद्दल तुमचा निषेध! :)

भुकेल्या माणसाला काहीही चालतं! हंगर इज द बेस्ट पिकल् ! तेंव्हा कुठलीही भाजी हेच उत्तर बरोबर वाटतं. त्याशिवाय ३_१४ शी पण सहमत. अरे, गोड खाल्ल्याशिवाय का कधी जेवण पूर्ण होतं? (पेशवाई सवयी असलेला) तिरशिंगराव

माझ्यासाठी १ ते ७ सर्व पदार्थ चालतील... जास्त पसंती फणसाच्या भाजीला कारण ती आपल्याला सॉलिड आवडते. :) सर्वात कमी पसंती केळफुलाची भाजीला कारण ती मी अजुन खाल्लीच नाही!!! (कशी असेल बरं चवीला ?) :? उसळ आणि रस्सा खायला मला जास्त विचार करावा लागत नाही... फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं इत्यादी! हे तर हवचं... (खादाड ) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

हीहाहाहा!!! अजून पर्यंत तरी आमची मटकीचीच उसळ पुढे आहे!!!! ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आम्ही पण मटकी उसळ वाले आणि हो नुसती नाही घरतुन बाहेर पडनार घराजवळ्च चोरगे मिसळ(कोल्हापुरात ही पण फेमस आहे) वाले राह्तात त्यांच्याकडुन कट( अस्सल शब्द पातळ भाजी)आणणार मग घरगुती मिसळ करणार की मग आहेच की मए माझा हात माझे तोंड आणि ती मिसळ .......................... स्वार्थाचा लवलेशही नसावा गर्वाचा स्पर्शही नसावा असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा...... विनायक पाचलग

अजून पर्यंत तरी आमची मटकीचीच उसळ पुढे आहे!!!! हाहाहाहाहा. कौल थांबणार किती वाजता हे कुठं जाहीर आहे? त्यामुळे तुमचा हा आनंद क्षणभंगूर ठरू शकतो बिका. कारण मुळात निवडणूक आयोगानंच अमूक एका पक्षाला विजयी करा असं आधीच म्हणून ठेवलंय.

In reply to by श्रावण मोडक

रात्र झाली... अजून तरी... मटकीदेवीच पुढे आहेत. मटकीदेवींच्चा... विज्जय्य अस्सो..... :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणते मटकीदेवींच्चा... विज्जय्य अस्सो..... :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका, निकाल कधीये? कौलकार काहीही बोलत नाहीत. मटकीदेवी पुढंच आहे.

In reply to by श्रावण मोडक

हो ना.... कौलकार काहीच बोलत नाहीयेत. :) पण अजून एकदा होऊन जाऊ दे.... मटकीदेवींच्चा... विज्जय्य अस्सो!!!!!!!!!!!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कौलकार बहुतेक फणसाची भाजी पुढे येण्याची वाट पाहत आहेत बहुतेक :W :SS :W :SS :W

बर्‍याच विचाराअंती, माझे मत फणसाच्या भाजीला, परवाच रत्नांग्रीला गेलो होतो आणी वयनीने ओले काजू घालून केली होती ही भाजी. एकदम आऊट ऑफ धिस वर्ल्ड झाली होती. इथे मुंबैला आई करते ती मात्र दाणे घालून करते हो. ती पण छान लागते. तशी केळफूलाची भाजी पण छान लागते. दोन्हि भाज्याना मात्र लाल मिरची आणी लसणाची फोडणी मस्ट. साधारणतः बायका ह्या भाज्या करायला तयार नसतात. लय मेहनत लागते चिरायला. - चंबा

टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा निवड्णारे रोज खानावळीत जेवत असावेत. चपात्या नुसत्याच खाईन निवडणारे-खानावळीत जावुन कन्टाळलेले.

माका फणसाची भाजी आणि उकड्या तांदळाची पेज मिळाली तर आणखीन शिरामारला काय नको.आणि ती फणसाची भाजी झंय फणस अर्धो पिको अर्धो कच्चो आसा अशा फणसाची चलात. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

भाजीत भाजी फणसाची आणि केळफुलाचीही.. १०-२०-३०-- करायला लागणार.. फणस+डाळिंब्या किवा केळफुल +डाळिंब्या.. नुसत्याच बशा भरुन खाईन.. पोळ्या खाऊन भाजी कमी कशाला खा?:) स्वाती

फणसाची भाजी झिंदाबाद! मस्त लागते एकदम.. भरपूर ओलं खोबरे आणि दाणे.. अहाहा! ही भाजी असताना इतर पदार्थांकडे बघायलाही नको. :) --शाल्मली.

गो प्राजु, अगो आमच्याकडे कोकणात फणसाच्या भाजीत ओलां खोबरां घालतत पण भरपूर मात्र नाय.दुसरां म्हणजे फणसाच्या भाजीत शेंगदाणे मुळीच घालणंत नाय हां!. फणसाची कुवरी असली तर त्या भाजीत काळे वाटाणे घालतत. अर्धो कच्चो अर्धो पिक्या फणसाच्या भाजीक हिंगाची फोडणी देतत.हिंग कसलो पावडर हिंग नाय खडो हिंग. आणि ही भाजी उकड्या तांदळ्याच्या पेजे बरोबर मस्त लागता.कोणीसां लिवलां ही भाजी पोळी बरोबर खातत म्हणून ,शी गे बाये! कोकणात फणसाची भाजी रोजचीच.पोळी कधितरी सणावाराक करतत.नाय तर पेज नाय तर भात रोजचो असतां. आतां तुम्ही बाबडे पोळी बरोबर खाल्यात तर माझा काय जाणां नाय म्हणा.आणि शेंगदाणे घातल्यात तरी काय माझा काय नाय.मी आपली कोकणातली पद्धत सांगितली. वायट वाटांन घेव नको हां! माझां चुकलां तर होयां तर यशोधरेक विचार.तां तुकां उज्जू सांगताला. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहो प्राजुचा जांव दे आणि तात्याचो कौल पण जावंदे... पण तुम्ही या प्रतिसादान माझ्या तोंडात पाणी जमा केल्यात की!!!! आता एकदम ऑफिसातून उठून खंय जांव अर्धपिक्या फणसाची भाजी आन पेज खावंक? :)

In reply to by पिवळा डांबिस

अहो प्राजुचा जांव दे आणि तात्याचो कौल पण जावंदे... पण तुम्ही या प्रतिसादान माझ्या तोंडात पाणी जमा केल्यात की!!!! डांबिसाशी सहमत आसा. सामंतकाकांनी मस्तच लिवला आसा! :)

दुपारपासून अजूनही प्रतिक्रिया मिळत आहेत? तात्यांनी आतापर्यंत भाजीसोबत चपात्या संपविल्याही असतील आणि पचल्याही असतील. ;) असो. तात्या, मी तरी मटकीची उसळ निवडली खायला, आताच जेवणात कोबीचे कोफ्ते (की भजी, जे म्हणतात ते) खाउन आलोय तरी .

तूप+काकवी+पोळी ह्या काँबिनेशनचा भोक्ता आहे! त्यामुळे पर्याय निवडायला अंमळ जड गेले पण तरीही 'ओल्या वाटाण्यांची उसळ' हा फर्मास पर्याय निवडलाय - ओलं खोबरं, आलं-लसूण लावलेल्या ताज्या मसाल्यातली दाट ग्रेवी असलेली हिरव्यागार वाटाण्यांची उसळ अहाहा काय रम्य कल्पना! आत्ता जेवण झालेलं असूनही =P~ =P~ चतुरंग

माझी तर टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा हीच पसंत राहील. गरम गरम रश्यात पोळ्या / भाकरी जे काही असेल ते कुस्करुन यथेच्छ आडवा हात मारुन आडवे होण्यात जी मजा आहे ती बाकी कशात नाही. होस्टेलला असताता असाच उभा आडवा हात मारुन आडवा झाल्याने दुपारच्या बर्‍याच लेक्चरला दांडी मारावी लागली आहे. उसळ मी रात्रीच खातो. दुपारी खाल्ली की बाकिच्यांना त्रास होतो असे लोक सांगतात. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

पण खूप कमी लोकाना आवडते म्हणजे कमाल आहे.ही उसळ कोकणातच जास्त होते बहुदा. ह्या वर शेव/खोबरे टाकुन ब्रेड बरोबर खायची.मुम्बैत खायची असेल(आणि घरी बायको करत नसेल) तर पणशीकर नाहितर शिवाजी पार्क चे आस्वाद नाहितर प्रकाश. भेन्डि(बेन्गळुरु)

तात्या, येवढी तोन्डीलावणी अस्ताना जे हाताला लागेल ते घेऊन त्याबरोबर चपात्या हाणून पोटाची आग शमवायचे सोडून, कौल घेत बसलात????? तर मग नुस्त्या चपात्यान्चे दोन्ही हातानी तुकडे तोडून, तोन्डात कोम्बुन, (जमल तर चावुन अन मिळाल तर पाण्याबरोबर) गिळण्याचीच तुमची योग्यता! :D नव्हे नव्हे, शम्बरटक्के खात्रीने सान्गतो, तुम्ही आधी तसेच हादडणार! अन मग चपातीभरल्या पोटाने असले कौल लावणार! तुम्हाला हवीत कशाला तोन्डीलावणी??? कौल लावायलाच ना????? आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

आपली बाई अशीच ह्य क्रमाने खायची आवड आहे, असे सगळे मेनू समोर असतील आणि चार चपात्या अश्या संपवू, १) फणसाची भाजी + २ चपाती २) डाळिबांची उसळ + १ चपाती ३) केळफुलाची भाजी + १ चपाती ४)मटकीची उसळ (नुसती उसळ मजेने खावू कांदा ,लिंबू द्या ना). संपल्या ना चार चपात्या. बाकी पदार्थ ऑरडीनरी आहेत. कोण पण कधी पण करु शकते . :)

बाकी सर्व अमान्य बाकी तात्या॑ना काही काम नाही हा, सकाळपासुन नुसती खाई-खाई सुटली आहे.ईथे बेग॑लोरमधे "मटकी"म्हटलकी लोक्स तो॑डाकडे बघत रहातात.. बटाट्याची भाजी (डोक्यात आधीच आहेत) फणसाची भाजी (आख्खा फणस कोण उ च ल णा र) केळफुलाची भाजी (काय असते ते माहीत नाही) ओल्या वाटाण्याची उसळ (हे चालेल पण चपाती बरोबर वाटाणे खाताना ईकडे तिकडे पळतात, वाटाणे हो) टोमॅटो-फ्लॉवर-बटाटा रस्सा (तीन का चागल्या दहा भाज्या एकत्र करुन खाऊ की ) फोडणीची मिरची-लसूण चटणी-लोणचं इत्यादी! (ह्याच्या बरोबर बाजरीची भाकर हवी !!!) वांगी बटाट्याचा रस्सा. (नो वा॑गीस प्लीज) डाळिंब्यांची (कडवे वाल) उसळ. (हे चालेल पण पर्याय एकच आहे ना !!) वरीलपैकी काहीही नाही. मी चपात्या नुसत्याच खाईन! :) सुहास.. (द गुड)

मी मात्र योग्य असा "कंपु" निवडेन, जिथे मला सर्व "रसान्चा" स्वाद घेता येईल (या अनुस्वाराच्या तर! :|). पुण्यचा सर्व हाटेलात असेच करीत होतो. पण तात्या काय आता बामणी खानावळ काढायचा विचार आहे कि काय? जनमत घेताय? ;) (सदा भुकेला)Nile.