"कारण"मिमांसा
आज आपण जे काही शिक्षण घेतो, जे काही करतो, जे काही महत्वाचे वैश्विक ज्ञान आपण मिळवले आहे, ते सगळे आपल्या चिकित्सक वृत्ती आणि कारणमीमांसा यामुळे आहे. प्रत्येक विचारी मनुष्य आपले कार्य एका आधारस्थंभावर करत असतो, तो आधारस्थंभ म्हणजे एक गृहीतक (presumption) आहे- प्रत्येक गोष्टीची प्रत्येक स्तिथी जशी आहे, ती तशी असण्याला काहीतरी कारण आहे. प्रत्येक गोष्टीचे कारण आपल्याला माहित नाही, पण ते शोधणे कायम चालूच असते.
एखाद्या गोष्टीचे कारण सापडले, तर त्या कारणाचे कारण शोधणे सुरु होते, त्यानंतर त्यानंतर त्या कारणाच्या कारणाचे कारण and so on.
त्यापुढे, काही कारणं हि तात्पुरती (शोध असलेल्या गोष्टीपुरतीच) असतात,तर काही कारणं आणखी व्यापक असतात (प्रश्नाचे केंद्र नसणाऱ्या संबंधित किंवा असंबंधित गोष्टींची उत्तरे सुद्धा मिळतात).
उदा.-
Carcinogenic गोष्टीच्या सेवनाने कर्करोग होतो, हे कर्करोगाच्या अनेक कारणांपैकी एक आहे. हे का होतं ? तर ह्या गोष्टी पेशींमध्ये mutation घडवून आणते. हे mutation पेशीविभाजनास सतत हिरवा कंदिल देत राहते आणि पेशींची त्यामुळे अनियंत्रित वाढ होते. हे mutation का होतं, तर (उदा.) सिगरेट मध्ये असलेल्या निकोटिन, टार सारख्या घटकांमुळे. निकोटीन मुळे हे का होतं ? तर त्याच्या रासायनिक रचनेमुळे आणि पेशींमधले घटक आणि निकोटिन मधले घटक ह्यामध्ये होणाऱ्या प्रक्रियांमुळे. याही पुढे गेल्यावर आपल्याला मुख्य कारण सापडेल ते म्हणजे निकोटिन आणि त्या गटातील रसायनांचे वागणे. आणि हि वागणूक केवळ कर्करोगापर्यंत नाही, तर इतर गोष्टींचे सुद्धा स्पष्टीकरण देते (उदा- निकोटिन मुळे मिळणारी आनंददायी संवेदना).
जर हे एका tree diagram मध्ये काढले तर सिगारेट ओढणे हीं सर्वात खालची शाखा असेल, पेशींचे mutation त्यावर, आणि निकोटीनचे गुणधर्म त्यावर असेल. पेशींच्या mutation मधून इतरही शाखा निघतील (उदा.- उत्क्रांतीमध्ये होणारे बदल). तसेच, निकोटिन आणि समान रसायनांच्या गुणधर्मातून सुद्धा परिणामांच्या अनेक शाखा निघतील. (उदा- निकोटिन मूळे मिळणारी आनंददायी संवेदना).
आता मुख्य मुद्द्यावर. जर प्रत्येक कारणांच्यावर कारणे असतील तर खालील दोन शक्यता आहेत:
1) अंतिम सत्य- वरील उदाहरणात दाखवल्या प्रमाणे, पुढील कारणे हि आधीच्या कारणांपेक्शा अधिक व्यापक आहेत. प्रश्नाचा केंद्रबिंदू सोडून आणखी बऱ्याच गोष्टींचे हे कारण आहेत. त्यामानाने खालील शाखांची कारणे प्रश्नाचा केंद्र सोडून भटकत नाहीत. तस जर असेल, सर्व कारणांमागे एक किंवा अनेक (finite) अंतिम कारणे आहेत, ज्याच्या पुढे काही कारण नाही, आणि ते dictated आहे. थोडक्यात, ते अंतिम सत्य आहे. हे एकच असेल असे नाही, तर अनेकही असू शकतात. या अंतिम सत्यांच्या परस्पर संबंधातून सम्पूर्ण tree structure बनते.
पण जर हे असे असेल, तरी आपलं presumption कि प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे हे खोटं ठरलं. तर मग विज्ञानाचे क्षेत्र केवळ या अंतिम सत्यांमध्ये खेळून भौतिक फायदा करून घेणे इतपतच मर्यादित राहील. ज्ञानपिपासू विज्ञान अर्थहीन होऊन जाईल.
2) अनंत कारणांची शिडी-
यात अंतिम सत्य नाही. प्रत्येक गोष्टीमागे कारण असणारच. पण हे असे जग आपल्याला तर बुवा imagine करता येत नाही.
तुम्हाला काय वाटत ?
याद्या
11475
प्रतिक्रिया
26
वर्गीकरण
मिसळपाव
आम्हाला काय वाटतं
To bide our time
In reply to आम्हाला काय वाटतं by जॉनविक्क
मग ठिकाय मी पण करतो थोडा विषय अंतिम सत्य।
In reply to To bide our time by शा वि कु
"...वरना पुरजे बदलते तो आदमी बदल जाता"
In reply to मग ठिकाय मी पण करतो थोडा विषय अंतिम सत्य। by जॉनविक्क
मनोरंजन म्हणून वाचलेल्या गोष्टी समजायचा अट्टहासच नको
In reply to "...वरना पुरजे बदलते तो आदमी बदल जाता" by शा वि कु
अध्यात्म
In reply to मनोरंजन म्हणून वाचलेल्या गोष्टी समजायचा अट्टहासच नको by जॉनविक्क
चर्चा भौतिकतेचिच आहे
In reply to अध्यात्म by शा वि कु
ती पण उत्तेजनाच नव्हे का ?
In reply to मनोरंजन म्हणून वाचलेल्या गोष्टी समजायचा अट्टहासच नको by जॉनविक्क
नाही.
In reply to ती पण उत्तेजनाच नव्हे का ? by शा वि कु
दिर्घ काळ आणि तात्कालिक
In reply to नाही. by जॉनविक्क
तात्कालिक च्या विरोधात आपण दिर्घ अर्थ घेतलात
In reply to दिर्घ काळ आणि तात्कालिक by शा वि कु
ते तर खरेच
In reply to तात्कालिक च्या विरोधात आपण दिर्घ अर्थ घेतलात by जॉनविक्क
ऋत्विक रोशन आवडतो काय ? नसेल तर त्याला उदा म्हणून घ्या
In reply to ते तर खरेच by शा वि कु
हाऊसफुल्ल 4 पण आहेच की
In reply to ऋत्विक रोशन आवडतो काय ? नसेल तर त्याला उदा म्हणून घ्या by जॉनविक्क
प्रॉब्लेम आनंद घेण्यात नाही
In reply to हाऊसफुल्ल 4 पण आहेच की by शा वि कु
एक चित्रपट
In reply to ऋत्विक रोशन आवडतो काय ? नसेल तर त्याला उदा म्हणून घ्या by जॉनविक्क
चित्रपट बदलत राहतो
In reply to एक चित्रपट by शा वि कु
चित्रपटाने खरेच आंनद मिळाला असता
In reply to चित्रपट बदलत राहतो by जॉनविक्क
पुन्हा पुन्हा चित्रपट तुम्ही आंनद न्हवे
In reply to चित्रपटाने खरेच आंनद मिळाला असता by जॉनविक्क
कारण जेजे द्वैत म्हणून माझ्या
In reply to मग ठिकाय मी पण करतो थोडा विषय अंतिम सत्य। by जॉनविक्क
ट्री सट्रक्चरनंतर एकदम हा
अंतिम सत्य
In reply to ट्री सट्रक्चरनंतर एकदम हा by सोत्रि
आपलं गृहीतक होतं की प्रत्येक गोष्टीला कारण आहे...
In reply to अंतिम सत्य by शा वि कु
अंतिम सत्य आणि प्रत्येक गोष्टीला कारण ?
In reply to आपलं गृहीतक होतं की प्रत्येक गोष्टीला कारण आहे... by अर्धवटराव
आपण अंतीम सत्याला भिडतच नाहि.
In reply to अंतिम सत्य आणि प्रत्येक गोष्टीला कारण ? by शा वि कु
जॉनविक्क यांचे प्रतिसाद