Skip to main content

गुन्हेगार!

लेखक फिझा यांनी बुधवार, 30/10/2019 05:35 या दिवशी प्रकाशित केले.
गुन्हेगार! एकेका श्वासाचा हिशोब मांडून केलेले आरोप ती आरोपी असल्याचे सिद्ध करत होते ..ते ! "तिचं जगणं " हाच कसा गुन्हा असू शकतो… नेहमीच ? पण गीतेवर हात ठेवून तिनेही मान्य केले की जगण्याचे विशेष असे काही कारण नाहीये! " तो मर क्यो नहीं जाती ?" तटस्थ लोकांनी प्रश्न विचारला! नेहमीसारखाच ! "हवं तर मृत्युदंड देऊन टाका, खूप हत्या केल्या आहेत मी ! एक ना अनेक इच्छा, आकांक्षा मारल्या आहेत कित्येक वर्ष , अगदी चपखलपणे…! कुणाला कसलाच सुगावा न लागू देता!" ती हे बोलून हसू लागली, नेहमीसारखीच ! तिच्या 'असण्या'चा गुन्हा सिद्ध झाला आणि जन्मठेप ठोठावण्यात आली, "हट्टच असेल जगण्याचा तर जगू शकते ती ... पण अस्तित्व मागू नाही शकत या जगात! असेच जगावे लागेल तिला, असून नसल्यासारखे ! लपवावे लागेल स्वतःला काळोखात, लोकांच्या गर्दी मध्ये बोलता नाही येणार रोज अविरत काम करावे लागेल , मोबदला मागता नाही येणार, थोडा सुद्धा आवाज नाही होता कामा, कुणाची गैरसोय होणार नाही याची पण काळजी घ्यावी लागेल! अदृश्य होऊन जगता आलं तर अजून चांगले !" तिचे 'हसणे ' अजून लोभस होत गेले ........ नेहमीसारखेच ! "मृत्युदंड दिला असता, तर शेवटची इच्छा विचारावी लागली असती ना ! " गर्दी मध्ये कुजबुजत होते काही ! -------फिझा .
लेखनविषय:

वाचने 2231
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

शेवटच्या ओळीसाठी सलाम.

क्या बात!
तिचे 'हसणे ' अजून लोभस होत गेले ........ नेहमीसारखेच !
हे भन्नाट आहे.

शेवटची ओळ भन्नाट आहे.

कडक!!