नाट्यसंवादातून मॅनेजमेंट शिक्षण.
बर्याच तपशीलवार संवादांना स्व-संपादनाची कात्री लागायला हवी होती असे वाटते. हा एका दीर्घभाषणाच्या बाबतीत माझा प्रयत्न -
> ती दुर्लक्ष का करते? सुरुवात कशी झाली?
>....... काय तर प्रोजेक्टमधे एस्टिमेशन घसरलं. कस्टमर रोज स्वतः उशीर करतो, मग संध्याकाळी उशीरा कोड जाणार. आणि वर परत रात्री अकराला तासभर तो छळणार - कोड क्वालिटी होपलेस आहे. सकाळी ही बया आमच्याच डोक्यावर मिऱ्या वाटणार - मी हे मुद्दाम करतो की काय? सोल्युशन द्यायचे सोड! कस्टमरच्या कोलांट्या त्या ऐकणार नाही, सगळं ओव्हर-बजेट माझ्यावरच ढकलून मोकळी...
> हे बघ, प्रोजेक्ट बजेट करताना, कस्टमरच्या उलट्या-सुलट्या उड्या तु फॅक्टर केल्यास की नाही?
शिवाय अशा संवादात एकाचे उत्तर देतच दुसरा सुरुवात करतो (निळी वाक्ये), आणि कथानक पुढे नेतो. तो थांबतो तेव्हा दुसरा तो धागा पकडतो. असे वाचायला बरे वाटते.
खरे तर कोणीच रोजव्यवहारात असे सुसूत्र बोलत नाही. पण मग रोजव्यवहारातल्या प्रत्येक संवादातून मॅनेजमेंटचा धडा तरी कुठे असतो? आपल्या जीवनात एकरेषीय कथासूत्र तर नसतेच. पण वास्तववादी लेखनात कुठेतरी नीट शेवट करायचा असतो.
तरी हा संक्षेप आणि सुसूत्रता बेमालूम लपवावी तर बरे. वाचणार्याला पत्ता लागायला नको, की हे रोजव्यवहारातल्या पाल्हाळापेक्षा खूपच बांधलेले आहे.
असो यात मी वाचकाच्या दृष्टीने लिहिले आहे. लेखकाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी भडकमकर मास्तरांचे तास लावले आहेत ना?

ह्या संवादाचा उपयोग मी ज्या कामासाठी करत आहे, त्यासाठी संपादन करतांना तुम्ही दिलेल्या सुचनांचा विचार करेन.
भडकमकर मास्तरांच्या तासांचा उपयोग नक्की होईल. तुमच्या टिकेबद्दल आभार!
प्रतिक्रिया
इस दुनिया मै..
वेगळाच आणि गमतीदार प्रयोग
खरे तर
नाट्यसंवादातून मॅनेजमेंट शिक्षण
नाट्यसंवा
नाट्यसंवा