Skip to main content

दूरदेशीचा फकीर कोणी

लेखक आरती रानडे यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


दूरदेशीचा फकीर कोणी




दूरदेशीचा फकीर कोणी वाटा अनवट चालत राही आयुष्याचे गूढ चित्र अन सावल्यांतुनी रेखीत जाई।।
भकास माळावरती एका जीर्ण एकले मंदिर पाही कोनाड्यातील पागोळीगत उरात फडफड, काहूर काही।।
कळसावरचा अंध पिंगळा दु:ख मुक्याने साहत राही कानी पडते आर्त साद जी उगम तयाचा उमगत नाही।।
माथ्यावरती सूर्य तळपतो तप्त दाह अन लाही लाही खुळ्या स्मृतींचा मंद गारवा परि जिवाला शमवत राही।।
दूरदेशीचा फकीर कोणी वाटा अनवट चालत राही….

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 5748
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कानी पडते आर्त साद जी उगम तयाचा उमगत नाही खुळ्या स्मृतींचा मंद गारवा परि जिवाला शमवत राही - आवडल्या या ओळी आपण तसे सगळेच फकीर कुठले ना कुठले प्रवास डोईवर घेऊन निघालेलो; नाही का? थांबलोय असे दिसले तरी आत खोलवर वाटा शोधत राहतो. आपल्या शब्दांनी एक चित्र रेखाटून दाखवलं.

कानी पडते आर्त साद जी उगम तयाचा उमगत नाही।। दूरदेशीचा फकीर कोणी वाटा अनवट चालत राही….
If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away. Henry David Thoreau

काव्य आवडले .. खास करून ...माथ्यावरती ... पुढच्या चार ओळी . पण फकीर याचा जो रूढ अर्थ आपल्याला महीत आहे त्याला प्रवासी ,भटक्या, पान्थस्थ असा वास आहेच का ? की याचक , साधू असा वास आहे ..... ?

अर्थवाहि कविता आवडली पैजारबुवा,

कविता मनाला भिडली. तसं म्हंटलं तर आपण सगळेच तो फकीर, आयुष्याची अनवट वाट चालत रहाणारे तप्त दाह अन लाहीलाही मध्ये खुळ्या स्मृतींच्या गारव्यावर हायसं होणारे...