तु नसताना..... !
हा चंद्र फ़िका वाटतो.. गूढ भासतो..सखे.. तु नसताना....
विमनस्क नभी हिंड्तो... खुळा हासतो.. सखे.. तु नसताना...
हरपला ओठीचा सूर.. धडधडे उर.. मनी काहुर....
डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... सखे.. तु नसताना.... [१]
हा उदास वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो गंध बावरा... होई कावरा.. सखे.. तु नसताना... [२]
र्ह्दयात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश...
चालला रवि अस्तास... ओठी बिभास... सखे.. तु नसताना... [३]
निःशब्द निळ्या अंगणी.. बघ मुकी शुक्र चांदणी ....
व्याकुळ चंद्र मीलनी... कशी विरहिणी ... सखे.. तु नसताना... [४]
का जीवास लावि पिसे... सखे तु असे... होई ग हसे...
मनी तुझीच प्रतिमा वसे.. तुच तु दिसे...सखे.. तु नसताना.... [५]
- चंद्रशेखर.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2575
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
जागुतैंचा "पंच" अन महामुनींचा
In reply to छान. by जागु
<:P
सुरेख
सुरेख
तु नसताना..
In reply to सुरेख by विशाल कुलकर्णी
सुन्दर.
सुरेख.
आभार !
In reply to सुरेख. by प्राजु
बावरा ... कावरा
आभार !
In reply to बावरा ... कावरा by सुधीर कांदळकर