दुपार
तिच्या पैंजनाची गाज,
त्यात रेंगाळे दुपार,
विसावल्या सतारीची
जणू छेडियली तार,
तिच्या कपाळी जी बट
त्याला कुंकवाची तीट,
लाल रेशमी लडीची,
तिच्या गालाशी लगट
तिच्या पाठीची पन्हाळ
त्यात घामाचा पाझर,
तिच्या नाजूक कटीला,
शोभे नाजूकसा भार..
तिच्या बाहूंचा मांडव,
लावी मदनाला वेड,
तिची महकती काया
तिचे ओझे अवघड..
सुस्त दुपारच्या वेळी,
ती येते का सामोरी,
मन हलते हलते,
त्याला सांभाळावे कोणी?
- शैलेंद्र.
सुरेख!!
नाही, कुंकवाची तीट योग्य आहे.
अर्रर्रर्रर्र, परत शाळेत
नॉस्टॅल्जिक केले ना राव.
दुपारच्या झोपेची आठवण झाली का
सुरेख
सुरेख लिहिलंय!
सु रे ख
सगळ्यांचे आभार
आहा...सुरेख.
खुपच छान!
+1
+1
वाहवा!!
जियो!!
उत्कट आणि उत्कृष्ट
मस्त कविता
मस्त
(No subject)
वाह मस्तंच. सुंदर टिझर.
भारी!! :-)
एकदम सुरेख..
सुरेख.