हस्तर धागा विरोधी पक्ष खूपच गळपटले कि ईच्छा शक्ती नाही ?

हस्तर's picture
हस्तर in काथ्याकूट
17 Sep 2019 - 12:35 pm
गाभा: 

नुकतीच नवीन वाहतूक नियमावली जाहीर झाली ,दंड बराच वाढवला
पण माननीय सरकारला एवढीच लोकांची काळजी आहे तर रस्ते खड्डाहीन का केले नाही ?

एवढा सादा मुद्दा अजून कोणी मोठ्या प्रमाणावर उचलला नाही

बरेच मुद्दे विरोधी पक्षांनी हटटाऊन जाऊ दिले

फक्त काँग्रेस नाही पण राष्ट्रवादी सपा मनसे पण कडाडून विरोध करू शकतात आंदोलन करू शकतात

जे काही आंदोलन झाले कुठेतरी रास्ता रोको असे फुटकळ झाले

व्यापम मुद्दा किंवा चिक्की घोटाळा ,असे मुद्दे तर कोणीच काढत नाहीये ज्यात छुपा छुपी तरी आहे ,फक्त राफेल वर विषय

नेमका कारण काय असेल ?

माझ्या मते विरोधी फक्त मुद्दाम शांत आहे
पुढचे ५ वर्षे किंवा १० वर्षे झाल्यावर anti incumbency ( ह्याचा मराठी प्रतिशब्द कृपया सुचवा ) येईल तेव्हा जिंकू असा विश्वास?
कारण ९९ साली काँग्रेस चे पानिपत झाले तेव्हा पण सोनिया गांधी हेच म्हणाल्या होत्या कि आम्ही विरोधी बाकावर बसू पण लढू आणि २००४ ला जिंकल्या

तुमचे काय मत आहे ?

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

17 Sep 2019 - 1:33 pm | आनन्दा

चक्क एव्हढे शब्द धाग्यात? बाकी कुठे कुठे विरामचिन्हे पण दिसतायत..

धागा विषयाला माझा पास. आपल्याला त्यातलं काय कळत नाय ब्वा.

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 1:48 pm | जॉनविक्क

नुकतीच नवीन वाहतूक नियमावली जाहीर झाली ,दंड बराच वाढवला

एवढा सादा मुद्दा अजून कोणी मोठ्या प्रमाणावर उचलला नाही

खरंय. आणी जो कोणी उचलेल तो तसाही आधीच नाकावर आपटलेला असल्याने... मोदी विरोधक ठरायची शक्यताच जास्त आहे कारण 370 एका रेट्यात अत्यन्त कुशलतेने विना डॅमेज हाटवणारे मोदीसरकार कोणत्याही बाबतीत चुकीचा निर्णय घेतिलच कसे बरे आपणासही ठाऊक आहेच आपण किती नियम पाळतो ते आणी आपल्या या बेशिस्तपणा बद्दल मुलांच्याच लाडक्या प्राचार्य विरोधात तक्रार करायची तरी कोणाकडे ? पुन्हा आपटायची वेळ येईल... ज्यातुन अजूनही सावरणे झालेलं नाही

जॉनविक्क's picture

17 Sep 2019 - 1:51 pm | जॉनविक्क

हस्तर धागा विरोधी पक्ष नावाचा कोणताही राजकीय पक्ष माझ्या माहितीत नाही.

राजे १०७'s picture

17 Sep 2019 - 2:14 pm | राजे १०७

होईल लवकरच बदल. अर्थव्यवस्थेची वाट लागली की मग डोळे उघडतील.

रविकिरण फडके's picture

17 Sep 2019 - 2:28 pm | रविकिरण फडके

रस्ते खड्डेमुक्त का केले नाहीत? आणि त्याबद्दल कुणीच कसे बोलत नाही?
उत्तर सोपे आहे. झाडून सर्व पक्ष - त्यात भाजपा आला - त्यासाठी जबाबदार आहेत, आणि हे ते जाणून आहेत. कुणी कुणाविरुद्ध बोलायचे?
सगळ्यांनी मलिदा खाल्ला आहे मग बोट कुणाकडे कुणी दाखवायचे?

पण आता ५ वर्षे झाली आहेत ,भाजपा ने पण हेंच गोष्टींना बोटे दाखवून मते मिळवली व बाकी पक्षानं मध्ये बरेच नवीन चेहरे आहेत ते हा मुद्दा उठू शकतात
तसेच दंड वाढ भाजपा ने केलेली आहे ,बाकी पक्षांनी नाही

रविकिरण फडके's picture

17 Sep 2019 - 5:13 pm | रविकिरण फडके

दंड वाढ आणि रस्त्यातील खड्डे हे दोन वेगळे मुद्दे आहेत.
फक्त दंड वाढवून जर रस्त्यांवरचे अपघात आणि जीवितहानी कमी करता आली असती तर कित्ती सोप्प होतं ना!
पण हा विषय (नितिन गडकरींसकट) कुणालाही समजलेला नाही.