आर्य की याम्नाया-पशुपालक ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
21 Nov 2017 - 11:50 am

धागा लेखास कारण sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?' अशा अर्थाचा एक लेख आला आहे. लेखास त्यांनी जनुकीय, पुरातत्वीय अनुवंशशास्त्र असा टॅग लावल्याचे दिसते. ब्रुस बॉवर यांचा हा लेख कोपनहेगन विद्यापीठातील विलर्स्लेव आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डेव्हीड रीच यांच्या अलिकडील संशोधनावर अधिक अवलंबून दिसतो.

प्रारंभीच स्पष्ट करतो की या ज्या विवीध विषयात रूची आहे त्या विषयात याचा उत्सुकतेपोटी समावेश होत असला तरी मी स्वतःस यातला जाणकार म्हणवू शकत नाही. दुसर्‍या धाग्यावर याम्नाया पशुपालकांबद्दलच्या नव्या संशोधन वृत्ता बद्दल छोटी पोस्ट टाकली पण विषयात रूची असलेल्या सर्वांचे त्या धाग्याकडे लक्ष जाणार नाही म्हणून हा वेगळा धागा.

पृथ्वीवर - आशियात - दक्षिण आशियात - भारतात, मानवी वसाहतीकरण कसे झाले असावे ? हा मोठ्या जिज्ञासेचा, उत्सुकतेचा आणि अभ्यासाचा विषय राहीलेला आहे. भारतीय आणि युरोपीय भाषातील भाषिक साम्य एका विशेष कुतुहलाचा विषय राहीलेला आहे.

प्रस्तुत लेखातून मला कळलेल्या माहितीनुसार पश्चिम आशियातील भटक्या पशुपालकांना याम्नाया म्हटले जात असे. पुरातत्ववेत्त्यांचे त्यांच्याकडे पुर्वीही लक्ष गेले असले तरी जनुकीय संशोधनाचा फारसा आधार उपलब्ध नव्हता -जो आता २०१५ नंतरच्या अभ्यासातून पुढे येऊ लागला आहे आणि यापुर्वी त्यांचा सांस्कृतीक अंडर एस्टीमेटेड राहीला असण्याची शक्यता म्हणून या दिशेने अधिक अभ्यासाच्या दिशा हा लेख तपासताना दिसतो.

ताम्र युगात (ईस पूर्व ५००० ते ३०००) या कालावधीत आशियायी विकासातील २०० ते ३०० वर्षांच्या key period वर याम्नाया पशुपालकांच्या भटकंतीचा प्रभाव राहीला असल्याचे संशोधकांचे म्हणणे दिसते. मृतांना पुरण्याच्या पद्धतीतील साम्य आणि जनुकीय साम्य यावर बहुधा ते आधारीत असावे. या संशोधनात याम्नाया पशुपालकांचा जनुकीय प्रसार युरोप आणि आशियात झाला असल्याचे म्हटले आहे.

त्या प्रस्तुत लेखात केवळ त्यांचा इंडो युरोपीयन भाषिक देवाण घेवाणीवरील प्रभावाची शक्यता वर्तवली आहे. माझी व्यक्तीगत पुस्ती: त्या लेखात विचार न केले गेलेले , भारतीय आणि युरोपीय भाषात साम्य जाणवते तसे इंडो युरोपीय भाषांसोबत पश्चिम अशियायी भाषांचेही एक अत्यल्प पण अंशिक साम्य दिसते. जसे अंबर हा शब्द भारत आणि पश्चिम अशिया दोन्हीत दिसतो Indo-Semitic languages अशी सुद्धा एक थेअरीसुद्धा दिसते . सेमेटीक ते भारतीय भाषातील देवाण घेवाण व्यापाराच्या निमीत्तानेही झालेली असू शकते. पण सोबतीला ह्या याम्नाह मंडळींची काही स्थलांतरे दक्षीण आशियाच्या दिशेने झाली असली तर त्यांचाही प्रभाव भारतीय भाषांवर पडलेला असू शकेल का ?

मी सदर संशोधनाचा मिपा धाग्यात उल्लेख केला तेव्हा मिपासदस्य अमित दादांनी दोन शंका विचारल्या त्यातील एक शंका मी उल्लेखलेल्या लेखात भारताचा उल्लेख नाही, वस्तुतः Southern exposure या स्वतंत्र विभागात दक्षिण आशिया southern asia असा
भारतीय उपखंडाच्या दृष्टीने वेगळा उल्लेख येतो. त्या कडे त्यांचे लक्ष गेले नसावे.

अमितदादांची दुसरी शंका आर्य शब्दाचा उल्लेख त्या लेखात कुठेही दिसत नाही. आणि त्यांची शंका बरोबर असली तरीही विभाग / लेख शीर्षकात आर्य की याम्नाया शीर्षकात आर्य शब्द मी जाणीव पूर्वक यासाठी वापरला की मानवी स्थलांतरांबाबत 'आर्य' शब्दा भोवती या किंवा त्या बाजूने पण एकरेषिय एकल दृष्टीकोणाने भारतीय विचारधारा प्रभावीत दिसतात. पण मानवी स्थलांतरण भारतात एका पेक्षा अधिक वेळा एका पेक्षा अधिक दिशांनी आणि एका पेक्षा अधिक समुहांनी केले असण्याच्या शक्यता दुर्लक्षील्या जाताना दिसतात.

वस्तुतः युद्धतील पराभव-दुष्काळ-वाळवंटीकरण अशी कारणे मानवी स्थलांतरांना जशी कारणीभूत होऊ शकतात तसे शिकार - पशूपालन - व्यापार ही सुद्धा मानवी स्थलांतराची कारणे लक्षात घेणे गरजेचे असावे किंवा कसे. त्या सदर संशोधन लेखात विशीष्ट काळातील विशीष्ट पशूपालकांचा जनुकीय विचार केला गेला असला तरी पशुपालन हे मानवी स्थलांतराचे कारण त्या पेक्षाही अधिक अदिम आणि त्या नंतरही राहिलेले असू शकते. किंबहुना पर्वतरांगा पार करण्यासाठी घाटवाटांची माहिती पशुपालकांना अधिक सहजतेने होणे संभवत असावे म्हणून हि नवी संशोधन दिशा उल्लेखनीय वाटते.

भारतीय युरोपीय भाषासाम्या बद्दल त्या लेखातील एक उद्धरण खालील प्रमाणे आहे.

...Heggarty of the Max Planck Institute for the Science of Human History in Jena, Germany. Indo-European speakers past and present display a variety of genetic patterns over a huge geographic area, raising doubts about any simple explanation for the spread of this language family, Heggarty holds....

त्या लेखाची नोंद घेताना मी चुकलो असू शकतो किंवा कमतरता असू शकतात म्हणून मूळ लेख वाचून मग चर्चा सहभाग श्रेयस्कर असावा . तर एकुण भाषा अभ्यासक आणि मानवी स्थलांतरांबाबत जिज्ञासू लोकांसाठी एका वेगळ्या संशोधन वाटेची माहिती उपयूक्त वाटू शकेल म्हणून हा पंक्ती प्रपंच.

* sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?'

* Yamna culture इंग्रजी विकिपीडियावरील लेख पण यात वर नमुद लेखातील संशोधन संदर्भाचा समावेश झाला असेलच असे नाही.
* हे सुद्धा पहा : Sintashta culture ईंग्रजी विकिपीडिया लेख

संस्कृतीसमाजलेख

प्रतिक्रिया

अमितदादा's picture

21 Nov 2017 - 4:33 pm | अमितदादा

लेखाच्या मराठी संरांश बद्दल आणि शंका ना उत्तरे दिल्याबद्दल आभार. काही मुद्दे
१.

वस्तुतः Southern exposure या स्वतंत्र विभागात दक्षिण आशिया southern asia असा
भारतीय उपखंडाच्या दृष्टीने वेगळा उल्लेख येतो. त्या कडे त्यांचे लक्ष गेले नसावे.

मुळात एवढ्या मोठ्या लेखात दक्षिण आशिया चा उल्लेख फक्त दोन वेळा आहे, पूर्ण लेखाचा भर हा मध्य, पूर्व, उत्तर युरोप आणि पश्चिम आशिया/चीन हा आहे. तुम्ही दिलेल्या section मधील हा paragraph काय म्हणतो ते पहा
But a second wave of influence came from the south, at the same time or perhaps a bit earlier. Related Indo-European languages spread via farmers moving out of Mediterranean areas and Anatolia (now Turkey) to lower parts of Europe and to southern Asia. Those cultivators had nothing to do with the Yamnaya’s big move and rarely mated with the herders.
याचा अर्थ असा मला समजला कि, मध्य समुद्राच्या आसपास राहणारे शेतकरी दक्षिण युरोप आणि दक्षिण आशिया मध्ये स्थलांतरित झाले, यांचा आणि याम्नाया यांचा संबंध नाही. बरोबर न_?
२. जेवढा लेख वाचला तेवढ्यात ह्या लोकांचा आणि दक्षिण आशिया तील स्थलांतर याचा संबध जोडणारे, किंवा आर्यांशी संबंध जोडणारे कोणतेही वाक्य आढळून आले नाही, म्हणून दोन शंका विचारलेल्या.
३.

पण मानवी स्थलांतरण भारतात एका पेक्षा अधिक वेळा एका पेक्षा अधिक दिशांनी आणि एका पेक्षा अधिक समुहांनी केले असण्याच्या शक्यता दुर्लक्षील्या जाताना दिसतात.

नक्कीच असे असू शकते, जाणकार भर घालतीलच. म्हणूनच शीर्षक खटकल, कि मूळ लेख याम्नाया वर असल्याने आर्यांना तुम्ही कशाला लेखात टाकले म्हणून.

माहितगार's picture

21 Nov 2017 - 5:36 pm | माहितगार

१) चांगला मुद्दा आहे. आपण म्हणता तसे समजून घेण्यात माझी अल्पशी गल्लत झालेली असावी. पण किमानपक्षी इंडोयुरोपीय भाषा समुहावरील प्रभावाचा उल्लेख त्या लेखात आहे असे म्हणता येऊ शकेल का .

Yamna_culture#Central_and_South_Asia या इंग्रजी विकिपीडिया लेखातही साउथ एशियाचा येणारा उल्लेख असाच जरासा कन्फ्युजींग आहे.

यातून माझ्या शंका तयार होतात त्या म्हणजे पश्चिम आशिययी पशू पालक बाहेर पडले ते काही विशीष्ट दिशांनीच का आणि एवढ्या सगळ्या दिशा निवडल्या जाऊन भारतीय दिशा निवडली जाणे राहीले असे शक्य असू शकते का या बद्दल साशंकता वाटते. इंग्रजी
विकिपीडिया लेख विभागातून मला जे समजू शकल ते साउथ एशियाच्या बाबत अजून काँप्रेहेन्सीव स्टडी होणे कदाचित बाकी असावे चुभूदेघे.

भयी केहना नक्की केहना क्या चाहते हो

पैसा's picture

25 Nov 2017 - 11:34 am | पैसा

इंटरेस्टिंग मुद्दे आहेत. अधिक वाचावे लागेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Nov 2017 - 9:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखात उद्धृत केलेल्या लेखातील संशोधनाचा भर मुख्यतः युरोपकेंद्रित आहे... जसा बर्‍याच पाश्चिमात्य संशोशनांचा असतो, दुर्दैवाने. त्यात जो आशियायी प्रदेश उल्लेखलेला आहे तो केवळ बहुतेक सद्याच्या रशियाच्या आशियायी भागापुरताच सिमीत आहे.

हे संशोधन जनुकशास्त्राच्या पायावर आधारीत असल्याने त्याची विश्वासार्हता नक्कीच आहे. मात्र, वरील संशोधनात समावेश केलेल्या भूभागापेक्षा खूप जास्त भूभागावर अनेक सहस्र वर्षे मानवसंवाद (interactions) होत होता हे भाषाशास्त्राने सिद्ध होते. त्यामुळे, कमीत कमी, "मध्य आशियाचा उरलेला भूभाग" आणि "दक्षिण आशियाचा भूभाग", किंवा त्यापलिकडिल भूभाग, यांचा अशा संशोधनात समावेश केल्याशिवाय या विषयातील संशोधन अपूर्ण (विथ लिमिटेशन्स) राहील असेच म्हणावेसे वाटते.

हि लेख चर्चा झाल्या नंतरच्या काळात पुरातत्वीय अनुवंशशास्त्राबद्दलच्या भारताबोवतालच्या प्रदेशातील संशोधनाची दखल घेणारा प्रतिसाद कोणत्यातरी चालू घडामोडी धाग्यात दिला परत धुंडाळणे कठीण गेले कुणास मिळाला तर दुवा द्यावा. असो.

भारता भोवतालच्या प्रदेशातील पुरातत्त्वीय अनुवंशशास्त्र विषयक संशोधनाच्या प्रसिद्धीचा अर्ध्या हळकुंडाने पिवळा बँड वाजवूनही दुव्यातील मुख्य साखळी बाकी रहात होती ती म्हणजे प्रत्यक्ष सिंधू संस्कृतीकालीन किंवा अती प्राचीन सांगाड्यांवर आधारीत पुरातत्त्वीय अनुवंशशास्त्र संशोधन.

आता एक शीताची - सॉरी राखीगढी येथील एका सांगाड्याच्या डि एन ए च्या माहितीवर आधारीत एक संशोधन पेपर अखेरीस ५ सप्टे २०१९ ला सेल नावाच्या जर्नलवर प्रसिद्ध झाला आहे.

त्यावर आधारीत एक वार्तांकन लाईव्ह सायन्स डॉटकॉमवर वाचण्यात आले तर दुसरे वार्तांकन इकॉनॉमीक टाईम्स चे वाचण्यात आले.

केवळ एकाच सांगाड्याचा बहुधा स्त्री सँपल साईज म्हणजे शीतावरून खिचडीची परिक्षा करण्यासारखे झाले . पण आता पर्यंत असे सम्शोधनच उपलब्ध नव्हते त्यामुळे या एका शीतभर संशोधनाचे बरेच महत्व आहे

किमान संशोधीत डिएनए इतर समकालीन भारतेतर सांगाड्यांच्या डिएनएंशी मिळत नाही म्हणजे बहुतेक स्थानिक भारतीय वंशाचा म्हणता यावा. खरे म्हणजे यावर अधिक विसृत लिहावयास हवे. कोणी वेळ काढून वाचून इतर वाचकांपर्यंत पोहोचवू शकेल तर छान होईल