नाचणाऱ्या गाणाऱ्यांचा देश
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
एक समाज म्हणून आपण बरीच प्रगती केली आहे. मुलांवर संस्कार करताना छडी लगे छमछम असा सब घोडे बारटक्के पासून सुरु झालेला प्रवास आता मुलांचा कल बघून ऐच्छिक विषय शिकविण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. आता मुलांना 'मोठेपणी कोण होणार' हा प्रश्न विचारणे शिष्टसंम्मत राहिलेला नाही. मुलांना पॉकेटमनी देणे थोडेफार सर्वमान्य झाले असावे. 'आम्ही म्युनिसिपालिटीच्या दिव्याखाली अभ्यास केला, जुनी पुस्तकं वापरली, सायकलवर शाळा कॉलेजचे शिक्षण घेतले' असे सुनावणे बंद झाले असावे. शैक्षणिक प्रगती हेच एकमेव आयुष्यातील यशस्वी होण्याचे मापदंड आहे हि बाब अजूनही महत्व राखून आहे याचे कारण कला आणि खेळ यामध्ये यश मिळाले नाही तर जगण्याचा प्रवास अतिशय खडतर होऊ शकतो.
अशा या मोकळ्या ढाकळ्यापणाचे काही दृश्य परिणाम आता जाणवायला लागले आहेत.आता गणित किंवा इंग्लिशमध्ये विशेष प्राविण्य मिळवणे, स्कॉलरशिपची परीक्षा देणे यांचे फारसे पूर्वीइतके स्तोम राहिले नसावे. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वगैरे गोष्टी होतात पण त्याला दुर्मिळतेमुळे असणारी आदराची झालर कमी झालेली दिसते. अमक्या वडापाववाल्याचे किंवा चहाची टपरी चालविणाऱ्याचे दोन-तीन फ्लॅट्स आहेत अशा किश्शानमुळे 'विद्वान सर्वत्र पुजत्ये' हे केवळ भिंतीवर लिहिण्याचे वाक्य झाले आहे.
सहसा मुलांचे ऐच्छिक विषय आजकाल काय असतात याचा विचार केला तर नृत्य प्रकार बराच लोकप्रिय व्हायला लागला आहे असे दिसते. मध्यंतरी आमच्याजवळच्या शाळेमध्ये एक ऑडिशनचा कार्यक्रम झाला तर जवळपास तीनशे मीटरपर्यंत रांग लागली होती. डिसेंबर जानेवारीमध्ये शाळांच्या स्नेहसंमेलनामध्ये तर लोकप्रिय गाण्यांवर होणारे लहान मुलांचे नाच हाच बहुदा एकमेव कार्यक्रम असतो. सोसायट्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, नवीन उत्पादनाचे अवतरण, कार्यालयातील सहली आणि सहभोजन, विकेंड आणि इतर निमित्ताने होणाऱ्या पार्टीजमध्ये देखील नृत्य हि एकमेव गोष्ट झाली आहे. पूर्वी वक्तृत्व कलेचे जे महत्व होते ते आता नृत्यकलेला आले आहे. मराठी लग्नामध्ये देखील संगीत आणि मेहेंदी हि संस्कृती रुजायला लागली आहे.
फार वर्षांपूर्वी मराठीमध्ये कोळीगीतांचा इतका सुळसुळाट झाला होता कि अनंत काणेकरांनी गमतीने म्हटले होते कि जर कोणी महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तर मासेमारी हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय आहे असे त्यात लिहिले जाईल. आज नृत्याच्या लोकप्रियतेने नुसत्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारतालाच नाचणाऱ्या - गाणाऱ्यांचा देश अशी ओळख दिली आहे आणि ती फारशी आदरयुक्त भावनेने दिलेली नसून उद्वेगाने दिलेली आहे. कलाकारांना मिळणारी राजमान्यता, लोकप्रियता आणि पैसा आणि समाजातील इतर घटक यांना मिळणारी मान्यता यातील तफावत इतकी मोठी आहे कि त्यातून हि उद्विग्नता जन्माला आली आहे. अशीच गोष्ट खेळाडूंच्या बाबतीतही होते. मोठी स्पर्धा जिंकल्यानंतर मिळणारे कोट्यवधींची बक्षिसे, घरं यांचा सरकार आणि पुरस्कर्ते वर्षाव करतात. तर शास्त्रज्ञ आणि संशोधनावर काम करणाऱ्यांना निधी आणि उपकरणे यांच्या कमतरतेशी झगडावे लागते.
लेखक, विचारवंत, शास्त्रज्ञ हे भारतीयांना ललामभूत असण्याचा काळ आता मागे पडला आहे. ज्यावर्षी सचिनला भारतरत्न मिळाले त्यावर्षीच्या पदमपुरस्कारांच्या पहिल्या पायरीवर डॉ. मायदेव हि व्यक्ती होती. सुकाणू नसलेल्या जहाजासारखी हि समाजाची अवस्था आहे.
प्रतिक्रिया
छान, विचारप्रवर्तक लेख ...
+1
ओक्के.
लेखातले चित्र सद्य समाजाचे
अजून थोडे...
अजून एक निरिक्षण...
+१
इतर कोणत्याही गोष्टींइतकेच, शास्त्र आणि कला यांच्याबाबतीतले संतुलन जीवनात फार महत्वाचे आहे... त्यात वर-खाली काहीच नाही, प्रत्येकाचे आपले महत्वाचे स्थान आहे./code> +१चांद्र यानाने पाठवलेल्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"एका महत्वाच्या मताचा आढावा घ्यावा म्हणून हा प्रतिसाद
सहमत.