✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एलावेनिल व्हॅलॅरियन : भारताची नेमबाज सुवर्णकन्या

ड
डॉ सुहास म्हात्रे यांनी
Sat, 08/31/2019 - 11:34  ·  लेख
लेख


Elavenil Valarivan joins elite list with maiden senior Shooting World Cup gold in Rio





एलावेनिल व्हॅलॅरियन या भारताच्या नेमबाज कन्येने रिओ दि जनेरिओ (अर्जेंटिना) येथे नेमबाजीच्या जागतिक चषक स्पर्धेत (ISSF World Cup), २८ ऑगस्टला, १०मिटर एअर रायफल खुल्या गटात, सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रिय खेळ दिवसाला (#NationalSportsDay) हे पदक जिंकून तिने त्या दिवसाचा आनंद व्दिगुणित केला. या अगोदर एलावेनिलने जागतिक स्तरावरच्या नेमबाजीच्या कनिष्ठ (junior) गटांत अनेक पदके मिळवलेली आहेत. खुल्या गटातील तिचे हे सुवर्णपदार्पण सर्व भारतियांना आनंदाचे आणि अभिमानाचेच वाटेल !

तीन जिगरबाज कन्यांनी गेल्या आठवड्यात भारतावर "हॅट ट्रिक सुवर्णवर्षाव" केला आहे !

१. मानसी नयना जोशी : बासल् (स्विटझरलंड) येथिल बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत, दिव्यांग स्त्री गटात, सुवर्णपदक : २४ ऑगस्ट २०१९. २. पि व्ही सिंधू : बासल् (स्विटझरलंड) येथिल बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत, खुल्या स्त्री गटात, सुवर्णपदक : २५ ऑगस्ट २०१९. ३. एलावेनिल व्हॅलॅरियन : रिओ दि जनेरिओ (अर्जेंटिना) येथिल १०मिटर एअर रायफल नेमबाजी, खुल्या गटात, सुवर्णपदक : २८ ऑगस्ट २०१९.

या सर्व जिगरबाज भारतकन्यांचे जगज्जेत्या कामगिरीसाठी मनःपूर्वक अभिनंदन !



 मानसी जोशी (सर्व चित्रे जालावरून साभार)

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
अभिनंदन
बातमी

प्रतिक्रिया द्या
5213 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

मस्त बातमी एक्का काका...ठ्यांकू

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 08/31/2019 - 11:53 नवीन
भारताच्या या तिनही गुणवान सुवर्णकन्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा! छानच! अभिनंदन!

यशोधरा
Sat, 08/31/2019 - 12:03 नवीन
वा! छानच! अभिनंदन!
  • Log in or register to post comments

तिन्ही चॅम्पिअन्सचे अभिनंदन ...

सुधीर कांदळकर
Sat, 08/31/2019 - 12:12 नवीन
तिन्ही चॅम्पिअन्सचे अभिनंदन आणि बातमीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

यो. तिघींचे मन:पूर्वक अभिनंदन

जॉनविक्क
Sat, 08/31/2019 - 12:21 नवीन
त्याच्या यशाचा आलेख असाच कायम राहो, आणी या पुन्हा पुन्हा भारताला यश मिळवत राहोत.
  • Log in or register to post comments

वा !

हेमंतकुमार
Sat, 08/31/2019 - 12:33 नवीन
छानच, अभिनंदन!
  • Log in or register to post comments

आजच पेपर मध्ये पाहिले भारत

उपेक्षित
Sat, 08/31/2019 - 20:36 नवीन
आजच पेपर मध्ये पाहिले भारत गुणतालिकेत अव्वल आहे नेमबाजांच्या. अभिनंदन ...
  • Log in or register to post comments

वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 09/01/2019 - 11:43 नवीन
वरच्या तीन सुवर्णकन्यांमध्ये अजून भर पडली आहे... Shooting World Cup: Yashaswini Deswal wins 10m Air Pistol gold, secures Olympic quota रिओ द जनरिओमध्ये चालू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत, जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या ओलेन कोस्तेविचला मागे टाकत, भारताच्या यशस्विनी देसवालने "१० मिटर एअर पिस्तल (स्त्रीया)" मध्ये सुवर्णपदक पटकावले. यशस्विनी या गटातील कनिष्ठ (ज्युनिअर) स्तरावरची भूतपूर्व जगज्जेती आहे. या विजयाने यशस्विनिने येत्या "२०२० टोक्यो ऑलिंपिक्स"मधले स्थान पक्के केले आहे. Image removed.

या स्पर्धेत भारतिय नेमबाजांनी अजून दोन पदके पटकावली आहेत... १. अभिषेक वर्मा : १० मीटर एअर पिस्तल : सुवर्णपदक. २. सौरभ चौधरी : १० मीटर एअर पिस्तल : कास्यपदक. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा