सिक्कीम बद्दल माहिती हवी आहे

रात्रीचे चांदणे's picture
रात्रीचे चांदणे in भटकंती
26 Aug 2019 - 5:30 pm

नमस्कार मंडळी.
पुढील महिण्यात ४-५ दिवसा साठी सिक्कीम ला जायचे नियोजन करत आहे. आम्ही एकूण 3 जोडपी आहोत.वय २५-30.
साधारणतः नियोजन असे आहे की २१ सप्टेंबर रोजी मुंबईतून विमानाने सिलिगुरी ला जायचे आणि 26 तारखेला माघारी यायचे.एखाद दुसरा दिवस कमी जा
स्त होऊ शकतो.
दार्जिलिंग आणि आसपासच्या परिसरासाठी एक दिवस आणि सिक्कीम मध्ये राहिलेले दिवस भटकणे असा विचार आहे. सिलिगुरी तुन टॅक्सी करून जायचा विचार आहे.
३-४ दिवस सिक्कीम ला फिरून शेवटचा एक दिवस दार्जिलिग मध्ये घालवायचया आणि शेवटी विमानाने मुंबई गाटायाची.
तर माझे काही प्रश्न आहेत तरी जाणकारांनी उत्तरे द्यावीत.
काही उपयुक्त सल्ले दिले तरी चालतील.
१. सिक्कीम मधील कोण कोणती ठिकाणे पहाण्यायोग्य आहेत.
आणि ती पहायची असतील तर मार्ग कोणता ठरवावा.
२. काही ठिकाणी परमिट काढावे लागते असे ऐकले आहे तरी ते किती दिवस आदी आणि कुठून मिळेल.
३ काही माहितीची हॉटेल्स ची नावे सांगावीत.
४- सप्टेंबर मध्ये तेथील वातावरण साधारणतः कसे असते.

प्रतिक्रिया

प्रवास करुन झाला कि कसा केला , कुठे अडचणी आल्या? कुठे मदत झाली ? कोणती होटेल्स राहण्यासाठी चान्गलि आहेत. ? कोणती रेस्तोरन्ट्स जेवणासाठी चान्गलि आहेत? बघण्यासारखी ठिकाणे कोणति? अवश्य सान्गा .

नोर्थ इस्ट मध्ये फिरण्यासाठी जरा फिट्नेस लागतो असे ऐकुन आहे. कारण चढ उतार अनेक आहेत तिथे.

प्रचेतस's picture

26 Aug 2019 - 6:38 pm | प्रचेतस

तुला मिपावर बघून छान वाटले. लिहीत रहा :)

तुम्ही काही माहिती जमवली असेल ती सांगा.

हरवलेला's picture

26 Aug 2019 - 8:41 pm | हरवलेला

तुम्हाला हवी असलेली माहिती इथे मिळेल.
https://www.youtube.com/playlist?list=PLxHSKe-bOElyYuT8uxZHdwpWuEehjNn7R

रात्रीचे चांदणे's picture

26 Aug 2019 - 9:41 pm | रात्रीचे चांदणे

सगळे videos बघून घेतो.

चारु राऊत's picture

26 Aug 2019 - 8:49 pm | चारु राऊत

मल फोन करा ९८२२११६५४५

चारु राऊत's picture

26 Aug 2019 - 8:53 pm | चारु राऊत

मि जाउन आलोय सिक्किमला पन मला सविस्तर लिहिता येत नाहि

रात्रीचे चांदणे's picture

26 Aug 2019 - 9:45 pm | रात्रीचे चांदणे

आत्ता प्रवासात आहे उद्या फोन करतो.

गोरगावलेकर's picture

27 Aug 2019 - 12:29 am | गोरगावलेकर

मी स्वत: सिक्कीमला गेले नाही परंतु दिवाळीनंतर जाण्याचे नक्की आहे. भटकंतीचे १० दिवस अधिक रेल्वे प्रवासाचे ४ दिवस अशी एकूण १४ दिवसांची सहल असणार आहे. यात दार्जिलिंगसहित सिक्कीम मधील बरीचशी प्रसिद्ध स्थळे पाहून होतील.

तुमचे जाण्या येण्याचे दिवस सोडले तर अवघे ४ दिवस हातात आहेत. त्यामुळे दार्जिलिंग बरोबर सिक्कीमचा फक्त काही भागच पाहू शकाल असे वाटते. दार्जिलिंगला जाताना किंवा येतांना एकदाच जा. सहलीचे वार विचारात घेतले तर आधी गंगटोकला जाणे सोईस्कर होईल असे वाटते.
खाली सहलीची एक साधारण रूपरेषा देत आहे. आपल्या सोयीने बदल करा.

दिवस १ ला २१/०९/१९ शनिवार
मुंबई ते सिलिगुडी
सिलिगुडी ते गंगटोक
गंगटोक येथे मुक्काम

दिवस २ रा २२/०९/१९ रविवार
नाथूला पास , त्सोमगो लेक,बाबा मंदिर
उंची १४००० फूट, गंगटोक पासून ७४किमी, एकूण प्रवास ६ तास
येथे जाण्यासाठी माउंटेनिअरिंग डिव्हिजन व पोलीस मुख्यालय गंगटोक यांचेकडून परवाना घ्यावा लागतो. परवाना आदल्या दिवशी तसेच नेमून दिलेल्या एजंट कडूनच मिळतो तसेच ठराविक प्रकारच्या गाड्यांमधूनच प्रवास करावा लागतो. तेव्हा गाडी ठरवताना स्थानिक एजंटची मदत घेतल्यास केव्हाही चांगले.
(नाथू-ला पास सोमवार व मंगळवार पर्यटकांसाठी बंद असतो )
रात्री गंगटोक येथे मुक्काम

दिवस तिसरा २३/०९/१९ सोमवार
गणेश टोक, झाकरी वॉटर फॉल, रांका मॉंटेसरी, तिबेटॉलॉजी, स्तूप, रोप वे, हस्तकला आणि फ्लॉवर शो.
रात्री गंगटोक येथे मुक्काम

दिवस ४ था २४/०९/१९ मंगळवार
गंगटोक ते दार्जिलिंग
पद्मजा नायडू झूआलॉजिकल पार्क, हिमालयीन माऊंटेनिअरिंग इन्स्टिटयूट, टी गार्डन (बाहेरूनच), तेनसिंग रॉक, तिबेटियन रेफुजी हेल्प सेंटर (रविवारी बंद असते), जॅपनीज टेम्पल, पीस पॅगोडा.
रात्री दार्जिलिंग येथे मुक्काम

दिवस ५ वा २५/०९/१९ बुधवार
पहाटेच ४ वा. निघून टायगर हिल येथून कांचनजंगा पर्वत शिखरांच्या मागून होणारा सूर्योदय पाहणे.
परत येतांना बतासिया लूप, घूम मॉंटेसरी
टॉय ट्रेनचाही अनुभव घेता येईल.
रात्री दार्जिलिंग येथे मुक्काम

दिवस ६ वा २६/०९/१९ गुरुवार
दार्जिलिंग ते सिलिगुडी
सिलिगुडी ते मुंबई

वेळ असल्यास
गगंगटोक जवळ पॅराग्लायडिंगचा अनुभव घेता येईल (प्रति व्यक्ती २५००/-)
रिव्हर राफ्टिंग : ५०००/- सहा ते सात व्यक्तींसाठी

जाण्याआधी शशिधर भावे यांचे "मनोभावे देशदर्शन सिक्कीम" राजहंस प्रकाशन, किंमत रु.९०/- हे पुस्तक जरूर वाचा.

गोरगावलेकर's picture

27 Aug 2019 - 8:24 am | गोरगावलेकर

उत्तर सिक्कीम बघायचे झाल्यास सहलीत कमीत कमी दोन दिवस तरी वाढवावे लागतील. यात आपण थांगू चोपटा व्हॅली, १७००० फूट उंचीवरील गुरुडोंगमर सरोवर , झिरो पॉईंट, युमेसमडोन्ग व्हॅली, गरम पाण्याचे झरे बघू शकाल.
यासाठी लाचेन व लाचुंग येथे एक एक दिवस तरी मुक्काम करावा लागेल.

किंवा

सहलीत एक किंवा दोन दिवस वाढवता आले तर दक्षिण सिक्कीम मधील नामची चारधाम , साम्द्रूपत्से बुद्ध पार्क रावांगला .पाहता येईल.
पेलिंगच्या आसपास स्काय वॉक, रिम्बी वॉटर फॉल,कांचनजंगा वॉटर फॉल, पेमयांगत्से मॉंटेसरी, रबडेन्त्से रुईन्स इ. पाहता येईल.
यासाठी पेलिंग येथे मुक्काम करता येईल.

रात्रीचे चांदणे's picture

29 Aug 2019 - 8:06 pm | रात्रीचे चांदणे

धन्यवाद गोरगावलेकर सविस्तर प्रतिसादाबद्दल
सध्या तरी तुम्ही दिलेल्या प्लॅन वरच विचार करतोय.

तिथे पाऊस केव्हा /कोणत्या महिन्यांत पडतो?

गोरगावलेकर's picture

27 Aug 2019 - 8:38 am | गोरगावलेकर

सप्टेंबर अखेर पावसाळा जवळपास संपलेला असतो. वातावरण ढगाळ असू शकते

प्रमोद देर्देकर's picture

27 Aug 2019 - 7:29 am | प्रमोद देर्देकर

वर गोरेगावकर यांनी सांगितलेली सर्व ठिकाणे माझ्या 2016 च्या ट्रीप मध्ये पाहून झाली आहेत. फक्त त्यात गंगटोक शहरातील रात्रीचं गांधी मार्केट पहायला विसरू नका.
असं वाटतं की इंग्लंड मधील रहदारीचा भागात फिरतोय की काय.

साबु's picture

27 Aug 2019 - 12:29 pm | साबु

ज्युवेल थीफ बघितल्यानन्तर गंगटोक फार जावस वाटलेले..

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2019 - 5:08 pm | चौथा कोनाडा

ज्वेल थीफ आता खुप जुना झाला (५२ वर्षांपुर्वीचा)
आता लेटेस्ट यारीयाँ पहा आणि धागा काढा.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा:
https://travelingnortheastindia.wordpress.com/2015/11/09/darjeeling-sikk...

वर्षातले सहा महिने ते उत्तरपूर्व भारतात मोटरसायकल वर भटकत असतात. (आता मिपावर आहेत की नाही ते माहीत नाही.)

http://yogeshalekari.blogspot.com/?m=1

हा ब्लॉग बघा.