महापूर
महापूर
वरुणराजाच्या अंतरी आले |
काळे मेघ जमा केले |
अचानक बरसु लागले |
भूमीवरी ||1||
पाऊस पडला मुसळधार |
तंव नद्यांना आला पूर |
बुडाली खेडी आणि शहरं |
तयांमध्ये ||2||
सांगली आणि कोल्हापूर |
तेथे आला महापूर |
कित्येकांचे घर संसार |
वाहून गेले ||3||
पाण्याची पातळी वाढता |
लोकांची वाढली चिंता |
पुढे काय होईल आता |
कळेना काही ||4||
पुराचे पाणीजेंव्हा वाढले |
लोकं घरात अडकुन पडले |
कोणी गच्चीवरती चढले |
भिती पोटी ||5||
मिडियांनी खबर घेतली |
बातमी लोकांसमोर आणली |
सरकारी यंत्रनाही धावली |
मदतीला ||6||
एनडीआरएफ़चे जवान आले|
बचाव कार्य सुरु झाले |
जीव धोक्यात घालून गेले|
पाण्यामध्ये ||7||
तेंव्हा नौसेनेचे ही जवान |
आले मदतीला धाऊन |
नौका दरोदरी नेऊन |
मदत केली ||8||
सृष्टीमधील एक भूत |
खवळले ते अकस्मात |
त्याने एवढी वाताहात |
होऊन गेली ||9||
आप तत्व खवळले |
त्याने खूप नुकसान केले|
संसार पुरात वाहून गेले |
कित्येकांचे ||10||
घरे गेली पाण्याखाली |
पिकांची नासाडी झाली |
जनावरे वाहुन गेली |
पुरासंगे ||11||
मदतीचे हात आले |
सर्वांनी सहकार्य केले |
जात पात विसरले |
आपत काळी ||12||
डॉक्टरांची टीम गेली |
निकःम सेवा केली |
गोळ्या औषधे दिली |
विनामूल्य ||13||
अहंकार ताठा गर्व |
विसरुन गेले सर्व |
तेथे माणुसकीचे पर्व |
दिसून आले ||14||
महासंकट समोर ठाले |
एकमेकां सहाय्य केले |
डोळ्यांमध्ये अश्रु आले |
तये वेळी ||15||
बी.डी.ळ 22/08/19
छान.
हेच म्हणतो लिहीत रहा. तुमची
छान लिहीले आहे
वाचकांचे आभार व प्रतिसाद
तळमळ पोचली. पुलेशु