✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

झरोके

ज
जव्हेरगंज यांनी
Sun, 07/08/2018 - 13:09  ·  लेख
लेख
"मला एक गुलाम विकत घ्यायचा आहे." टेबलावर हजाराचे पुडके ठेवत मी म्हणालो. हॅट एका बाजूला कलवली. आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. "कसला पायजे? काळा, गोरा, रानटी? की आपला साधाच?" मुंडी वर न उचलता तो मनुष्य पैसे मोजण्यात गर्क होता. "पुरुष की बाई?" या वेळी मात्र त्याने वर पाहिले. भिवया थोड्या ताणलेल्या. "तुमच्याकडचा अव्हेलेबल स्टॉक तरी दाखवा" बियरच्या बॉटलचं झाकण काढावं तसं मी विचारलं. "तसं दाखवता येत नाही इथं. माल बाहेरून मागवावा लागतो. बरीच लफडी आहेत. तुम्ही रिक्वायरमेंट कळवा" एव्हाना त्यानं चौथं बंडल मोजून संपवलं होतं. काय? तुम्ही त्यांच्याशी नडता. ज्यांना घ्यायची सवय आहे. अशाने हा बियरबार उध्वस्त होईल. "ये पिंट्या, सायेबांना आत घेऊन जा" अतिशय कळकट अंधार. चार पुरुष उभे होते आणि एक बाई. "हा दगडं फोडतो.." एकजणाकडे बोट दाखवत पिंट्या म्हणाला. "आणि हा रस्ते झाडतो" "हू.." "हिकडची दोघं काय कामाची नाहीत. डोक्यातनं गेलेत.." "बरं.." "आणि ही बाई. हीच काय माहीत नाही. कालंच आलीय. सैपाक पाणी तरी जमत आसंल म्हणा. ये, जमत का गं?" "येस, आय कॅन डू दॅट" खिडकीजवळची ती बाई खुदकन हसत म्हणाली. "ही इंग्लिश बोलते?" "व्हय व्हय , कालपस्न कटकट लावलीय." ***** "तुझं नाव काय?" घोडागाडीत बसल्यावर मी तिला विचारलं. "लिली" एवढंच ती म्हणाली. मग बाकीचा प्रवास आम्ही जुनाट पडक्या इमारती बघत सुरु केला. एक गाठोडं होतं तिच्यापाशी कसलंतरी. पण मी विचारलं नाही. तपकीरी कुरळे तिचे केस वाऱ्यावरती उडत होते. फारच मोहक. "तू हे बिस्कीट खाणार का?" कोकोनट बिस्कीटाचा आख्खा पुडा फोडत मी म्हणालो. तिच्या तोंडाला शब्दशः पाणी सुटले होते. मला राहावले नाही. संपूर्ण पुडा मी तिच्या स्वाधीन केला. एका उध्वस्त इमारतीच्या तळमजल्यावर आम्ही उतरलो. रॉकेटहल्ल्यात तिची बरीच पडझड झाली होती. आणि तिचे दरवाजे चोरीला गेले होते. आत शब्दशः काहीच नव्हते. "आज इथेच मुक्काम ठोकूया" घोडागाडीवाला निघून गेल्यावर मी म्हणालो. ***** "तुला मी आख्खा बिस्किटाचा पुडा दिला आहे. तेव्हा तुला आज काही खायप्यायची गरज नसावी." जमीनीवर उपरणे अंधरत मी म्हणालो. अंधार गुडुप पडला होता. शब्दशः काळा. "पण एक छोटासा पावाचा तुकडा मिळाल्यास फार उपकार होतील सरकार" कोपऱ्यात ती बहुदा अजून बसूनच असावी. "तू अजून जिवंत आहेस याचं तुला आश्चर्य नाही वाटंत? मी अजून तुला साधा स्पर्शही नाही केला हे काय कमी नाही?" त्या घनघोर अंधारात खरंतर मच्छरांचा भरपूर त्रास होता. अर्धवट पडलेल्या भिंतीच्या बाहेर बघत झोपेला शरण जाणे क्रमप्राप्त होते. या लिली नावाच्या बाईला पळून जाणे केव्हाही सहज शक्य होते. आणि असे झाले तर माझे दहा हजार रूपये पाण्यात जाणार होते. मी खिशातले पिस्तूल लोडेड करून ठेवले. मध्यानरात्र ओलांडून पहाटेचा गार वारा चांगलाच झोंबू लागला. थंडीची हुडहुडी शरीरभर पसरली. आणि तीव्र विजेच्या झोताने अचानक आख्खी खोली व्यापून टाकली. "उठा.... उठा..." बंदूकीची नळी ताणून धरत हवालदार जोरात ओरडत होता. आजूबाजूने अजून तिघे चौघे आत आले. मी पडल्या पडल्याच हात वर केले. "शो मी युवर येलो कार्ड. क्विक!" मी वरच्या खिशात ठेवलेले येल्लो कार्ड त्याच्यासमोर नाचवले. त्याने ते हातात घेऊन व्यवस्थित बघितले. मग सरळ ताठ उभा राहत म्हणाला, "ओह आय एम सॉरी सर, फॉर ब्रेकींग युवर प्रायव्हसी." "इट्स ओके" कार्ड परत घेत मी म्हणालो. "बाय द वे, हू इज शी? मे आय हॅव हर येलो कार्ड प्लीज" तो लिलीकडे बघत म्हणाला. थँक गॉड ती पळून गेली नव्हती! "माफ करा ऑफिसर, पण ती माझी धर्मपत्नी आहे. काल दुपारीच खरेदी केली. हे त्याचं बिल." मी कागद त्याच्यासमोर नाचवत म्हणालो. "नो.." ऑफिसर हॅट काढत म्हणाला. "मला ते बघायचंसुद्धा नाही." हातात एक छडी घेऊन तो लिलीकडे सरसावला. तिच्या चेहऱ्यावर टॉर्च मारून खाली झुकत पुन्हा म्हणाला. "यू बेटर नो, धिस इज इल्लीगल इन आवर कंट्री." मी अगदी शांत राहायचं ठरवलं. "कुरळ्या केसांची बाई, आपली धर्मपत्नी का सर?" मिश्किलपणे हसत तो माझ्याकडे वळता झाला. एव्हाना माझ्या कपाळावर घाम जमा झाला होता. "आय वॉर्न यू.. चोवीस तासांच्या आत तिला जिथून आणली तिथे परत सोड. तुझा यलो कार्ड नंबर आहेच आमच्याकडे. गुडबाय.." आणि ते त्यांचे बूट वाजवत तडक निघून गेले. पुन्हा शब्दशः काळा अंधार पसरला. पण एक गोष्ट अशी होती की लिली कोपऱ्यातंच बसून होती. बहुदा रात्रभर ती तशीच बसली असावी. ती झोपली होती की नाही हे सांगणे बरेच अवघड आहे. "तू घाबरलीस?" "नाही" एवढंच ती बोलली. मी उपरण्यावर पुन्हा अंग टाकले. "अशा लोकांना घाबरून खरंच काही फायदा नाही" मी तिला म्हणालो. "तू आता झोप. उद्या आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे." क्रमशः
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
10549 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

उत्सुकता वाढविण्यात यशस्वी

सोमनाथ खांदवे
Sun, 07/08/2018 - 22:25 नवीन
उत्सुकता वाढविण्यात यशस्वी झालात , छान लिहले आहे .
  • Log in or register to post comments

उत्सुकता आहे... कारण थांग

ज्योति अळवणी
Mon, 07/09/2018 - 08:51 नवीन
उत्सुकता आहे... कारण थांग नाही लागला... बऱ्याच दिवसांनी तुमचं लेखन आलंय... मस्त!
  • Log in or register to post comments

हे धत्तर... तत्तर

चांदणे संदीप
Mon, 07/09/2018 - 09:41 नवीन
जव्हेरभाऊ आले कायबाय लिहायले लोकाईले नाय समजायले तरीबी ते वाचायले! ;) पुभाप्र! Sandy
  • Log in or register to post comments

;)

तुषार काळभोर
Tue, 07/10/2018 - 07:40 नवीन
खरंय. पण मज्जा येते असलं क्रिप्टिक वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

काळ... वेळ...स्थळ...

संजय पाटिल
Mon, 07/09/2018 - 09:55 नवीन
काळ... वेळ...स्थळ... काही अंदाज लागत नाही.... म्हणुन पुभाप्र.....
  • Log in or register to post comments

वाह! जबरदस्त सुरूवात..

पुंबा
Mon, 07/09/2018 - 11:45 नवीन
वाह! जबरदस्त सुरूवात.. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्तय जव्हेरगंज साहेब ,,

खिलजि
Mon, 07/09/2018 - 18:51 नवीन
मस्तय जव्हेरगंज साहेब ,, उत्कंठा वाढलीय राव . हे असलं गुलामीचे वाचलं कि एक येगळीच नशा येतेय बघा. लग्नाआधी पण गुलाम होतो तिचे आणि आताही आहोत गुलाम तिचे . ती आहेच तशी बनलेली म्हणून हे सारे , नाहीतर या बादशहाचे स्वतःचेच आहेत स्वप्नांचे बगीचे .... पुभाप्र सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

खास जव्हेरजंग स्टाईमध्ये

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 07/09/2018 - 22:10 नवीन
खास जव्हेरजंग स्टाईमध्ये कथेने स्पागेटीस्टाईलने वेढे घेत घेत वाचकांना, "आँ, कुठे चाललो आहोत आपण ?" आणि "पोचलोय तरी कुठे ?" अश्या दुहेरी संभ्रमांत टाकले आहे. आणि तरीही, "नाय म्हटले तरी मज्जा येतेय" असेच त्यांना वाटते आहे ! =)) पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्त सुरुवात.

प्रचेतस
Tue, 07/10/2018 - 09:01 नवीन
मस्त सुरुवात.
  • Log in or register to post comments

जब्बर!

जेम्स वांड
गुरुवार, 07/12/2018 - 10:27 नवीन
गुर्जी गुर्जी गुर्जी, पाय कुठाय तुमचे हो _/\_
  • Log in or register to post comments

वाचतोय

अमरेंद्र बाहुबली
Sun, 07/15/2018 - 00:21 नवीन
वाचतोय
  • Log in or register to post comments

कडक

वरुण मोहिते
Sun, 07/15/2018 - 05:29 नवीन
पुढच्या भागाची वाट पाहतोय
  • Log in or register to post comments

जुने

नाखु
Mon, 07/16/2018 - 12:52 नवीन
जव्हेरगंज आले म्हणायचं वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

पुभा लवकर येऊदे

श्वेता२४
Mon, 07/16/2018 - 16:48 नवीन
भाग जरा मोठे टाकावेत,ही वि.
  • Log in or register to post comments

छान!

एमी
Tue, 07/17/2018 - 10:09 नवीन
छान! पण बाई तर चाळीस हजारात मिळते ना? apocalyptic time असल्याने स्वस्त झाली असेल ;)
  • Log in or register to post comments

जव्हेरभय आले...!

जावई
Mon, 09/03/2018 - 08:40 नवीन
जव्हेरभय आले...अन् उत्सुकता टांगून गेले.
  • Log in or register to post comments

फुडला भाग?

चांदणे संदीप
Mon, 07/01/2019 - 13:02 नवीन
कधी? Sandy
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक

मृणालिनी
Mon, 07/22/2019 - 08:30 नवीन
लिखाणशैली आवडली. तुमचे इथले सर्व लिखाण वाचते आहे. सुंदर... सु.शिं.चा प्रभाव वाटतो. छान. पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

Next part

मृणालिनी
गुरुवार, 08/22/2019 - 09:50 नवीन
Next part कधी??
  • Log in or register to post comments

जव्हेरभाऊ पुढचा भाग ?

उपेक्षित
गुरुवार, 08/22/2019 - 12:56 नवीन
जव्हेरभाऊ पुढचा भाग ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा