आजच्या लोकसत्ता मधली बातमी......
**************************************************************************
काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधानही त्यांनी केले आहे. मोदी सरकारने संविधानातील ३७० कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेढण्याचा हरऐक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे. इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय कारण नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये संचारबंदीची स्थिती आहे. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल. हा प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे. काश्मीरची डेमोग्राफी बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जात आहे. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही जग आज गप्प आहे.
**************************************************************************** गेल्या काही वर्षांपासून जगभर फिरून मोदींनी मुलतत्ववादी दशहतवादा विरुद्ध केलेली जनजागृती ईस्लामीक दशहतवादाचा समर्थ आणि रोकठोक विरोधक आणी निर्दालक अशी उभी राहिलेली त्यांची प्रतिमा. सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे त्या प्रतिमेवर इम्रान खान ने वर केलेले शिक्कामोर्तब...रीव्हयुड अँड ऍप्रूव्हड बाय इम्रान खान..... जर्मनी ,फ्रान्स , बेल्जीयम आणी ईतर ईस्लामी मुलतत्ववादी बाधित देश नरेंद्र मोदींना मूकसंमती देत असतील का? , कारण जगातल्या कोणत्याही देशाने भारतावर अजूनतरी दोषारोपण केलेलं नाही. नरेंद्र भाई.... चलने दो.....तुमने कुछ किया नही और हमने कुछ देखा नही असं गालातल्या गालात हसत हे सगळे देश म्हणत असतील का
वाचने
4704
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
इम्रानच्या बाबतीत हिट विकेट म्हणायला पाहिजे सेल्फ गोल नाही
अन त्ये म्या पयला ऱ्हाइलंच कि
In reply to इम्रानच्या बाबतीत हिट विकेट म्हणायला पाहिजे सेल्फ गोल नाही by चामुंडराय
इम्रान खान ला त्याच्या
बाय द वे.
दुसर्याचे ते कार्टे दुसर्
मला नाही तसं वाटत.
इम्रानची