इम्रान खान चा सेल्फ गोल ?

वडगावकर's picture
वडगावकर in काथ्याकूट
11 Aug 2019 - 11:42 pm
गाभा: 

आजच्या लोकसत्ता मधली बातमी......

**************************************************************************

काश्मीरप्रश्नी कोणत्याही देशांनी साथ न दिल्याने पाकची खळबळ अद्यापही सुरुच असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) आगपाखड केली आहे. आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय, असे विधानही त्यांनी केले आहे. मोदी सरकारने संविधानातील ३७० कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे लक्ष वेढण्याचा हरऐक प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.

इम्रान खान यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, आरएसएसच्या हिंदू वर्चस्ववादाच्या विचारसरणीची आपल्याला भीती वाटतेय कारण नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळे आज काश्मीरमध्ये संचारबंदीची स्थिती आहे. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिमांचे दमन होईल आणि शेवटी पाकिस्तानला लक्ष्य केले जाईल. हा प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची हिंदू आवृत्ती आहे. काश्मीरची डेमोग्राफी बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जात आहे. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही जग आज गप्प आहे.

****************************************************************************

गेल्या काही वर्षांपासून जगभर फिरून मोदींनी मुलतत्ववादी दशहतवादा विरुद्ध केलेली जनजागृती
ईस्लामीक दशहतवादाचा समर्थ आणि रोकठोक विरोधक आणी निर्दालक अशी उभी राहिलेली त्यांची प्रतिमा.

सगळ्यात गमतीचा भाग म्हणजे त्या प्रतिमेवर इम्रान खान ने वर केलेले शिक्कामोर्तब...रीव्हयुड अँड ऍप्रूव्हड बाय इम्रान खान.....

जर्मनी ,फ्रान्स , बेल्जीयम आणी ईतर ईस्लामी मुलतत्ववादी बाधित देश नरेंद्र मोदींना मूकसंमती देत असतील का? , कारण जगातल्या कोणत्याही देशाने भारतावर अजूनतरी दोषारोपण केलेलं नाही.

नरेंद्र भाई.... चलने दो.....तुमने कुछ किया नही और हमने कुछ देखा नही
असं गालातल्या गालात हसत हे सगळे देश म्हणत असतील का

प्रतिक्रिया

ते काही माहिती नाही.

परंतु इम्रानच्या बाबतीत हिट विकेट म्हणायला पाहिजे सेल्फ गोल नाही.
बाकी चालू द्या.

चामुंडराय's picture

12 Aug 2019 - 1:09 am | चामुंडराय

.

तमराज किल्विष's picture

12 Aug 2019 - 9:12 am | तमराज किल्विष

इम्रान खान ला त्याच्या देशाच्या लोकांनी वेड्यात काढले आहे. त्यांच्या समाधानासाठी वेड्यासारखा बरळतो आहे. बाकी काही नाही. भारताची सरशी झाली की पाकिस्तानी पंतप्रधानाची खुर्ची डळमळायला लागते. मुळात हि कलमं काढून काश्मिरी लोकांच्या जिविताला व मालमत्तेला कोणतीही हानी नाही व त्यांना कुणी हुसकावून लावत नाही. फक्त प्रशासकीय रचना बदलली आहे हे बाहेरील देशांना समजतंय. त्यामुळे पाकिस्तान ला कुणी विचारत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Aug 2019 - 9:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इम्रानखानला आपल्या देशात राजकारण करायला भारत आणि काश्मिर हा मुद्दा लागतो, तसं तर त्यांच्या कोणत्याही राजकीय कारकिर्द उभी करणार्‍या नेत्याला भारत देशातील विविध मुद्दे हवे असतात, इम्रानखान तेच करतोय पण त्यांना काही समर्थन मिळत नाही. कारण कायद्यातील बदल वगैरे हा आपला अंतर्गत मामला आहे, ते काहीही करु शकत नाही. हतबलपणे त्यांना हे पाहावे लागणार आहे. पाकिस्तानात पूर परिस्थिती गंभीर आहे, तरी तिकडे लक्ष देण्याऐवजी भारतातील घडामोडींवर त्यांच लक्ष असतं. फूटीवरवाद्यांना जोर चढावा यासाठी त्याला असेच काही करावे लागणार आहे. फूटीरवादी आझाद काश्मिरचे स्वप्न रंगवून काश्मिरी जनतेला उचकावयचे प्रयत्न करीत आहेत, करतील.

सारांश देशप्रेमाची गोळी सगळ्या आजारांवर प्रभावी ठरते ते तरी अपवाद कसे. इम्रानखानला तू तेरा देख हाच सल्ला सध्या उपयोगाचा आहे, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

12 Aug 2019 - 10:12 am | माहितगार

दुसर्‍याचे ते कार्टे दुसर्‍याचे पहावे वाकुन आणि करावेत आरोप बेफाम हा खेळ पाकीस्तान आणि तत्पुर्वी मुस्लीम लीगने काँग्रेस सोबतसुद्धा केलेला. नेहरुंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडीयात मुस्लीम लीगच्या या वृत्तीची दखल घेतलेली दिसते. इतरांपेक्षा अधिक सुविधा द्या म्हणायचे नाही म्हटले की द्विराष्ट्रवाद पाहीजे ही स्वातंत्र्य पुर्व भूमिका होती आता अधिकच्या सुविधा काढून घेतल्या की द्विराष्ट्रवाद कसा बरोबर होता. मुदलात सर्वांसोबत समानता स्विकारण्यात कोणत्याही बाजूस का अडचण असावी .

तत्वज्ञानांतील उणीवांना आव्हान नाही दिले की त्याचे समुहद्वेषात रुपांतरण होते समुहद्वेषावरील देशाचे अस्तीत्व स्विकारले दोन देशातील द्वेषात रुपांतरण होते. असो

राघव's picture

12 Aug 2019 - 1:50 pm | राघव

मला नाही तसं वाटत.
इम्रानखान किंवा त्याचे लोक्स उगाच नुसते बोंब मारत फिरणार नाहीत. कशाला ते सपोर्ट वगैरे मागत फिरत असतील? कारणं लावून बघण्याचा प्रयत्न केल्यास मला असं दिसतं -
१. काश्मीर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गाजवत ठेवणे ही एक महत्त्वाची बाब पाकिस्तान साठी होती/आहे. का? स्वतःसाठी सहानुभूती आणि भारतविरोधी वातावरण बनवत भारताचा बागुलबुवा निर्माण करणे. या "शत्रूराष्ट्राच्या" हालचालींविरोधात तयार राहण्यासाठीच्या भूमिकेतून पाकिस्तानने आजवर खूप मलई उकळली आहे. ती वापरली कुठे हा स्वतंत्र संशोधनाचा विषय असावा.
२. मोदींच्या पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या धोरणामुळे त्यांची आधीच गोची झालेली. अगदी संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या दूतानं "पाकिस्तानचे बोलणे प्रत्युत्तर द्यायच्या लायकीचे देखील नसल्याने आम्ही संयुक्त राष्ट्रसभेचा वेळ वाया घालवू इच्छित नाही" अशी टिप्पणी करण्यापर्यंत पाकिस्तान बेअब्रू झालेला होता. तरीही निर्लज्जपणे पुन्हा पुन्हा तेच तुणतुणं वाजवणं त्यानं सोडलं नव्हतं.
३. पण भारत ज्याला दिपक्षीय मुद्दा म्हणत असे आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय.. तो मुद्दाच आता भारताचा अंतर्गत मामला झाल्यामुळे पाकिस्तान आता रडणार कसे, कुठे, कोणाजवळ आणि कशाला? मग सहानुभूती आणि मलई [जी तशीही मिळणे बंद झालेले होते] मिळण्याची शक्यताच संपुष्टात आली. बाकी जे काही असो, सध्या पाकिस्तानला पैशाची फार गरज आहे. त्यात हे झाल्यानं त्यांची फारच अडचण झालेली आहे.
४. आता ३७० नंतर काय असा विचार पाकिस्तानच्या बाजूनं करून बघीतल्यास काय दिसतं? जर काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा झाला आणि ते आंतरराष्ट्रीय समुदायानं मान्य केलं तर यापुढे पाकिस्तानचं तुणतुणं नुसतंच बिनकामाचं नाही तर भारताच्या अंतर्गत मामल्यात ढवळाढवळ असे होईल आणि सहानुभूती भारताला मिळेल.
५. जर मामला आता भारताचा अंतर्गत झालाय तर पाकिस्ताननं बळकावलेला भाग हे भारताच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असं भारत म्हणू शकतो आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. किंबहुना मोदींचा इतिहास बघता लष्करी कार्रवाईची शक्यताही नाकारता येत नाही. अशा वेळेस आधीच जर भारत चुकीचं वागतोय/वागू शकतोय असं दाखवत राहिलं आणि भारतानं खरंच कोणती कार्रवाई केली तर, भारतविरोधात वातावरण निर्माण करणं तुलनेनं सोपं राहील असा एक कयासही असू शकतो.
६. पैशाची मदत कोणत्याही मार्गानं आणि कारणानं मिळणं ही पाकिस्तानची गरज आहे. त्यासाठीच वातावरण पेटतं ठेवण्याची त्यांची भूमिका आहे. भारतानं या भूमिकेला अत्यंत संयमी प्रतिक्रीया दिल्यानं पाकिस्तानचा हेतू साध्य होत नाही. भारताकडून एखादी चूक व्हावी अशीच त्याची अपेक्षा आहे आणि त्यासाठीच त्यांचा सर्व प्रयत्न आहे.

जर संयुक्त राष्ट्रसंघ हे मान्य करेल की हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि पाकिस्तानला त्यात नाक खुपसायचे काहीही कारण नाही, भौगोलिक दृष्ट्या भारताचा हा खूप मोठा विजय होईल. भौगोलिक दृष्ट्या यासाठी की यानंतर सिंधू पाणी वाटपाचे नॉर्म्स सुद्धा बदलू शकतात, भारत आपल्या भागात बांध घालण्यास व पाणी वळवण्यास मोकळा होऊ शकतो. पाकिस्तानची वाट लागण्याची ही सुरुवात नाही काय? मग ते गळा काढून रडत असतील तर ते बरोबरच आहे की. :-)

भंकस बाबा's picture

12 Aug 2019 - 6:29 pm | भंकस बाबा

अजुन एक गोची झाली आहे.
त्याने मारे राणा भीमादेवी थाटात पाकिस्तानच्या संसदेत घोषणा केली की आम्ही आता भारताबरोबर युद्ध करावे का? या बोलण्याने तेथील सांसद बाके बडवताना दिसले, पण भारताबरोबर युद्ध म्हणजे सैन्य दक्षिण दिशेला आणून मोर्चाबांधणी करणे, नेमके हेच ट्रम्पतात्याला नको आहे , त्याला पाकिस्तानचे लष्कर अफगानिस्तान सीमेवर पाहिजे आहे, असे असेल तर अमेरिकन निवडणुकापूर्वी यांकी अफगानिस्तान मधून बाहेर पडतील, पण खानचाचाने ट्रम्पला पण ऑक्सीजनवर आणून ठेवले. आता पुढील घडामोडीवर ट्रम्पचा पाकिस्तानला प्रतिसाद दरवाज्यावर बसलेल्या कुत्र्याला हाकलल्यासारखा असेल.