।। वाळूचे विरहगीत ।।
उन्हात चमके साज रुपेरी,
खेचत नेई ओढ ना टळे।
पसरुनी चमचम धरतीवरती,
पाहुनी रात्री चांदही चळे।
उधाण घेऊनी नायक येई,
भिजवुनी जाई अंगही बळे।
राग न यावा यात तिलाही,
सरसर लाटेमागुनी पळे ।
अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी,
निरोपांचे शंखशिंपले ।
जीव मोहरे येता भरती,
युगायुगांचा नवस फळे।
सुना किनारा होता ओहोटी,
मुकी वेदना गात्रं छळे ।
सोडुनी जाई घाव जिव्हारी,
त्या लाटांना हे न कळे ।
वाहत येई गाळ सुगंधी,
ज्या वासाचे तिस लळे ।
खेळ मांडला पृथ्वीवरती,
खेळणी वाळू सागर सगळे ।
रित्या नद्या होत तरीही,
गोड होई खारे सगळे ।
अजाण सागर याच रहस्यी,
वाळूमधुनी विरह ओघळे ।
पाय आपले जात रुतुनी,
मन होई मोकळे मोकळे ।
दिसात होती दोनच भेटी,
अन् दोनदाच विरे सगळे।
मिसळुनी जाई कणाकणाने,
सदेह मुक्ती उगा न मिळे ।
- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4173
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह, छान. सुरेख ! आवडली.
मी अभिजीत श्रीहरी जोगळेकर,
In reply to वाह, छान. सुरेख ! आवडली. by चौथा कोनाडा
मस्तं आहे कविता. आवडली.
हुरूप दिल्याबद्दल आभार...
In reply to मस्तं आहे कविता. आवडली. by पद्मावति
आवडली. छान आहे. काही ठिकाणी
कोण जाणकार संगीतकार जवळपास
In reply to आवडली. छान आहे. काही ठिकाणी by राघव
कोण जाणकार संगीतकार जवळपास
In reply to आवडली. छान आहे. काही ठिकाणी by राघव
कोण जाणकार संगीतकार जवळपास
In reply to आवडली. छान आहे. काही ठिकाणी by राघव
अप्रतिम लिहिलीये कविता..
आपल्या सर्वांच्या शुभेच्छा
In reply to अप्रतिम लिहिलीये कविता.. by मन्या ऽ