श्रावण आला गं सखे
----------------------------
श्रावण आला गं सखे
माहेराची सय आली
हाती जरी किती कामं
त्या साऱ्याला लय आली
परसात एक आड
अंगणात किती झाडं
त्या झोक्यांची याद आली
प्रेमळ गं भाऊराया
वहिनी करिते माया
भेटायची इच्छा झाली
देवासमान गं पिता
देवासमान गं माता
पानं गळायला आली
आताच जायला हवं
त्यांना पहायला हवं
चिंता इथे भय घाली
------------------------
बिपीन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3946
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहज साधी शब्दरचना. आवडली.
बस काही जुन्या आठवणी जाग्या
हिच्या मामाच्या घरी अजूनही
पद्मावति
खिलजी
छान. पु.ले.शु.
राघव , आभारी आहे .
सुरेख. साधी, सहज, सुंदर.