Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खिलजि on Sat, 07/20/2019 - 19:55
तृण वेचून खोपा बांधला वर्तीकेने इवलासा संसार थाटला शस्य शोधावया नर भ्रमणास जाई जननी आगंतुकांच्या सोहळ्याची वाट पाही कालानुपरत्वे सोहळे झाले खोप्यामध्ये इवलेशे जीव आले किलबिलाट उपवनी माजे काकांची मत्सरी ईर्ष्या जागे चिऊ सज्ज रक्षणास ठाकली झुंज नाही सोडली लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली निष्ठुर काक नि ती इवलीशी पिल्ले घरट्यावर त्यांनी सुरु केले ते हल्ले जननी उभी सरसावुनी चोच , चोचीला अशी काही धार जी चढली पडली धडपडली पण लढली अशी कि काकांवर जणू विद्द्युल्लता कडाडली पिल्लांच्या रक्षणास चिऊ सरसावली धूर्त नजरांस नजर भिडवुनी इवलेशे ते पंख फडकावूनी वीरांगना एकटी काकांसी भिडली लढली अशी कि ती जणू झुन्जीतच वाढली गलबला बहुत , समर चाले बहुत वेळ उपवनात समराची जणू लाली वाढली प्राणाहुनी प्रिय ती बाळे , लढत राहावे मिटेपर्यंत डोळे ऊर्जा तेथूनच तिने घेतली चोच तलवार बनुनी चालू लागली तगमग धडपड बघुनी साळुंकी धावली विरांगनेसहित लढू लागली धैर्य सामर्थ्य वाढता लढाई तुंबळ झाली अन काकांच्या रुधीराने शांत झाली लढली अशी कि जणू झुन्जीतच वाढली पण पिल्ले वाचवली . पिल्ले वाचवली {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }} ===================================== हा खरा घडलेला प्रसंग आहे .. याचिदेहीं याची डोळा मी पाहिलेला .. आमच्या सोसायटीत , एका चिमणीच्या घरट्यावर कावळ्यांनी हल्ला चढवला .. मी पण दगड मारून तिला मदत करत होतोच पण ते कावळे काही पाठ सोडायला तयार नव्हते .. काही साळुंक्या मदतीला धावून आल्या आणि ती पिल्ले बचावली ...

Submitted by हेमंतकुमार on Sat, 07/20/2019 - 20:10

Permalink

सुंदर !

छान रेखाटलेत.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 07/20/2019 - 20:45

Permalink

मस्तं चित्रदर्शी कविता !

मस्तं चित्रदर्शी कविता !
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Sat, 07/20/2019 - 20:51

Permalink

संघर्ष छान आहे, तुझ्या मनालाही स्पर्शून गेलेला दिसतो

पण लगेच त्यावर कविता ?
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 07/20/2019 - 20:51

Permalink

आवडली.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by इरामयी on Sun, 07/21/2019 - 15:23

Permalink

भावप्रधान काव्य. छान चित्रण

भावप्रधान काव्य. छान चित्रण आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Wed, 07/24/2019 - 11:57

Permalink

+1

छान
  • Log in or register to post comments

Submitted by श्वेता२४ on Wed, 07/24/2019 - 14:16

Permalink

सुंदर कविता

खूप आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Wed, 07/24/2019 - 20:40

Permalink

काक दृष्टीने ही

अत्यंत उत्तम अर्थ आणि चित्रदर्शी काव्य काकतालिय करामती पाहिलेला नाखु
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3697 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com