डोक्याला शॉट [प्रतिपदा]

Primary tabs

गड्डा झब्बू's picture
गड्डा झब्बू in जनातलं, मनातलं
12 Jul 2019 - 11:32 am

चिन्मय बेडवरुन उठला बेसिन जवळ जाऊन वोश घेतला...
दाढी आणि अंघोळ करायचा कंटाळा आल्याने तोंड पुसून केस विंचरून
वरचे कपडे उतरवून तसाच घराबाहेर पडला....
वरचे कपडे उतरवून म्हणजे रात्री झोपताना थंडी वाजत होती म्हणून
हाफ टी शर्टवर फुल टीशर्ट आणि थ्रीफोर्थ वर जीन्स चढवली होती ते वरचे कपडे उतरवून...

तर सांगायचा मुद्दा काय कि चिन्मय कपडे उतरवून घराबाहेर पडला
आई काशी यात्रेला गेली होती ल्लोळत पडायचा कंटाळा आला म्हणून पडली स्वारी घराबाहेर ...
फ्ल्याटला कुलूप लावत असताना मागनं बनियान थोडा वर आणि अंडरपँट थोडी खाली करून
आपल्या माकड हाडाच्या आजूबाजूचा आणि खालचा वरचा परिसर दोन्ही हातांनी कराकरा खाजवीत शेजारचे तेंडुलकर बुवा बाहेर आले...

चिन्मयला पाहून त्यांना जिवा शिवाचे मिलन झाल्या सारखे वाटले त्याच्या जवळ येऊन
आपल्या गजकर्ण खाजवून खाजवून स्वच्छ केलेल्या हातांनी त्याचा चेहरा कुरवाळत त्यांनी प्रश्न केला ...
कुठे नाहीसा झाला होतास रे बाळा इतके दिवस ? तुझ्या आईचे जानकीचे हाल बघवत नव्हते आम्हाला
तू चल आधी माझ्या घरी आपण चहा घेऊ असे म्हणत त्याचा हात ध्रुन ओढत त्यांनी बायकोला बाहेरूनंच आवाज दिला...
सुंनंदा चहा आण दोन कप शेजारचा तन्मय आलाय

कुठे नाहीसा झाला होतास रे बाळा इतके दिवस ? काय उत्तर देणार बुवांच्या या प्रश्नाला ?/

----------

चिन्मय चारच दिवसांपूर्वी ब्रह्मांड लोकातून पारत आला होता आला कसला त्याला तिथून हाकलूनच दिला होता...

फेसबुकवर प्रोफाईल बघून जिच्या प्रेमात पडला होता ति कामिनी अचानक त्याला कॉफी हाउस मधे भेटल्यानंतर
तिची डेट वर जायची इच्छा पूर्ण करायला तो तिला घरी घेऊन आला होता...
मावशीकडे गेलेली त्याची आई दुसऱ्या दिवशी येणार असल्याने त्यांना रान मोकळे होते

चन्द्र राहू च्या कक्षेतून बाहेर आल्याचा तो ५-६ दिवसाचा काळ संपताना कामिनी जेव्हा मर्त्य लोकातून
ब्रह्मांड लोकात जायला निघाली तेव्हा तिच्यासोबत तो पण तिचा हात घट्ट पकडत डोळे मिटून ब्रह्मांड लोकात गेला होता...
काही दिवस बरे गेले कामिनीच्या सहवासात पण एकितच रमेल तो चिन्मय कसला?
ब्रह्मांड लोकात फिरताना दिसेल त्या तरुणीला तो आलिंगन देऊन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करत सुटला...
काहीजणी शिवीगाळ करीत तर काही चपलेने थोबाडून काढत पण पठ्ठया काही थांबत नव्हता
त्या दिवशी तर त्याने कहरच केला होता साक्षात ब्रह्मांड लोकाच्या राजकन्येला आलिंगन देऊन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला...

तक्रार राजापर्यंत गेली राजा संतापला राजाने चिन्मय आणि त्याला इथे घेऊन येणारी कामिनी दोघांच्या अटकेचे फर्मान काढले
राजदरबारात दोहांना मुसक्या बांधून आणल्यावर न्यायाधीशांनी दोघांना त्यांच्यावरचे आरोप वाचून दाखवले आणि कबुली विचारली...
चिन्मयने आपला गुन्हा नाकबूल केला आणि तो निर्दोष असून त्याच्यावरचा आरोप खोटा असल्याचा युक्तिवाद केला
पण त्याच्या विरोधात ब्रह्मांड लोकातील साडेतीन हजार अत्याचारग्रस्त तरुणींनी साक्ष दिल्याने न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरवून कठोरात कठोर अशी...
मर्त्य लोकात हाकलून देण्याची शिक्षा फर्मावली आणि मंगळोदयाच्या समयी शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा आदेश कोतवालाला दिला

कामिनीने गुन्हा कबुल करून आपला हा पहिलाच अपराध असल्याचे सांगत क्षमा याचना केली....
तिच्या बचावासाठी अखिल ब्रह्मांड महिला आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून अक्युमन ची दैवी देणगी लाभलेल्या वकील दामिनी युक्तिवादासाठी पुढे आल्या
हा गुन्हा नसून ५४० वर्षांनंतर एकदा मिळणारे ५-६ दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगताना तिच्याकडून कोवळ्या वयात झालेली हि छोटीशी चूक आहे...
दामिनीचा हा युक्तिवाद न्यायाधीशांना पटला आणि त्यांनी "व्रात्यस्तोम" विधी करून कामिनीला शुद्ध करून घेण्याचा आदेश
अखिल ब्रह्मांड महिला आयोगाला दिला...
निकाल ऐकून कामिनीच्या चेहर्यावर सायुज्य भाव अवतरले आनंदाच्या भरात कामिनीने धावत जाऊन दामिनीला घाट मिठी मारली

मंगळोदयाला थोडावेळ बाकी असताना चिन्मयला मर्त्य लोकात उघडणाऱ्या दरवाजा समोर आणून उभे करण्यात आले...
कोतवालाने त्याला शेवटची इच्छा विचारली असता चिन्मयने कामिनीला बाहुपाशात घेऊन तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करायचा आहे असे सांगितले
त्याची हि इच्छा ऐकून कोतवालाने मंगळोदयाची वाट न बघता दरवाजा उघडून चिन्मयच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला मर्त्य लोकात ढकलून दिले...
अवकाशाच्या पोकळीत तरंगत तरंगत गूढ अश्या सोनेरी रंगाच्या ऊर्जेच्या धारांमधून वाहात तो मर्त्य लोकातिल कॉफी हाऊस मधे अवतीर्ण झाला

कोतवालाने रागाने मंगळोदयाच्या थोडे आधीच त्याला ढकलून दिल्याने तो त्याच्या घरी न पोचता घरी येण्याच्या आधी ज्या ठिकाणी त्याची
कामिनीशी भेट झाली होती त्याच कॉफी हाउस मधे त्याच टेबलला त्याच खुर्चीवर येऊन टपकला...
समोरच्या टेबलाला पोलीस आफिसर संग्राम सूर्यवंशी आणि सकपाळ म्याडम कॉफी पित बसल्या होत्या
सकपाळ म्याडमशी नजरानजर होताच त्यांच्या चेहऱ्यावर ओळख पटल्याचे भाव उमटले आणि त्या उठून चिन्मय च्या टेबल जवळ आल्या आणि...
तू चिन्मय ना ? असे त्यांनी विचारले चिन्मयने हो म्हणाला आणि त्याच्या डोक्यात काही गोड कल्पना येण्या आधीच सकपाळ म्याडमनी त्याची
मानगूट पकडून त्याला उठवले आणि कुठली उकिरडी फुंकायला गेला होतास रे मुडद्या इतके दिवस आईच्या जीवाला घोर लावून? असे विचारत...
खाडकन त्याच्या मुस्काटात भडकावली नंतर संग्राम सूर्यवंशी आणि सकपाळ म्याडम त्याला जीप मध्ये टाकून पोलीस स्टेशनला घेऊन आले

दोन तास संग्राम सूर्यवंशी आणि सकपाळ म्याडम सारखा एकच प्रश्न विचारत होत्या कुठे गेला होतास रे मुडद्या इतके दिवस?
काय उत्तर देणार? कुठल्या तोंडानी सांगणार आपले प्रताप?...

मी कधी गेलो कसा गेलो कुठे गेलो आणि आत्ता कॉफी हाऊस मधे कसा आलो यातलं मला काहीच आठवत नाही हेच उत्तर तो प्रत्येकवेळी देत होता...
सकपाळ म्याडमनी त्याच्या आईला पोलीस स्टेशनला बोलवून घेतले होते थोड्या वेळात जानकी आणि आप्पा राशिंनकर दोघे आले
दोनचार कागदांवर जानकीची सही घेतल्यानंतर तन्मयला तिच्या ताब्यात देताना चिन्मयचा कान जोरात पिळून त्या म्हणाल्या...
आता पुन्हा कुठे मिसिंग झालास तर तंगड्या तोंडीन तुझ्या सांगून ठेवते घेऊन जा हो मावशी याला आणि लक्ष ठेवा याच्यावर

सात महिन्यांनी पोरगं सापडल्याच्या आनंदात जानकीने पोलीस स्टेशन मधे पेढे वाटले मग दोघे घरी आले...
तन्मयला आवडते म्हणून तिने उसळीसाठाइ वाटण घाटण करून बिरड्याची उसळ पेरूची कोशिंबीर गरमागरम पोळी केली
चिन्मय सापडला कि लगेच काशी यात्रा करिन असा बोललेला नवस फेडायला जानकी लगेच पुढलया दोन दिवसांनी काशी यात्रा करायला काशीला गेल्या...
----------

अरे बोल ना बाळा कुठे नाहीसा झाला होतास इतके दिवस ? बुवांनि पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने तो भानावर आला...
सुंदर काकूंनी आनुन्डीलेला चहा गार्गुत्त झाला होता
कपातील गार झालेला चहा एका घोटात संपवत चिन्मय उत्तरला अहो बुवा मला नाही माहित हो मला खरंच काही आठवत नाहीये...
बरं बरं आठवलं कि मला नक्की सांग अस गजकर्ण खाजवता खाजवता बुवा म्हणाले तसा वैतागून तन्मय उठला आणि बुवांच्या घरातून बाहेर पडला
मनातल्या मनात बुवांना शिव्या घालत तो चौथ्या मजल्यावरून खाली जायला जिन्याची पहिली पायरी उतरला आणि समोर...
अर्धमेल्या अवस्थेत वरती येणारे त्याच्या समोरच्या फ्ल्याट मधे राहणारे देशपांडे काका उर्फ चॉकलेट काका दिसले

त्यांची दाढी खूप वाढलेली पायजमा आणि शर्ट बऱ्याच ठिकाणी फाटलेला अंगावर ठीक ठिकाणी माराच्या खुणा दिसत होत्या...
त्यांचे दोन्ही खांदे धरून चॉकलेट काका काय झाले तुम्हाला? असे त्याने विचारले आणि

चॉकलेट हा शब्द त्याच्या तोंडून ऐकताक्षणीच देशपांडे काका बेशुद्ध होऊन त्याच्या अंगावर कोसळले......

क्रमशः
----------

विशेष सूचना- सदर लेखन वाचून खरोखरीच कोणाच्या डोक्याला शॉट लागल्यास लेखकाचा उत्तरदायित्वास नकार लागू :P

अतिविशेष सूचना- कथा वाचताना काही अगम्य शब्द, नावांची अदलाबदली, विचित्र वाक्य रचना खटकल्यास, किंवा संदर्भ न लागणे तसेच काही प्रश्न पडल्यास आपले वाचन कमी आहे असे समजून हा ज्ञानकोश (अकुपिडीया) वाचावा. आपल्या सर्व शंकांचे समाधान तेथे सापडेल.

विशेष सवलत- सदर ज्ञानकोशाचा आवाका बराच मोठा असल्याने या भागातल्या नेमक्या हव्या त्याच प्रश्नाचे उत्तर/संदर्भ त्यात शोधणे हे गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या पेक्षाही कठीण असल्याने वाचकांच्या सोयीसाठी तीन दुवे देण्यात येत आहेत. या सवलतीचा लाभ (स्वतःच्या जवाबदारीवर) घ्यावा हि नम्र विनंती :-))

दुवा क्र. १     दुवा क्र. २     दुवा क्र. ३

विडंबनविनोदमिसळप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 11:54 am | गड्डा झब्बू

गुरुवर्य श्री.श्री. अकु यांच्या चरणी अर्पण.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2019 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

(नशिबाची 'पाने' उलटी पडली आणि) अकुंना त्यांच्याच खेळात 'गड्डा झब्बू' मिळाला. =))

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 1:28 pm | गड्डा झब्बू

(नशिबाची 'पाने' उलटी पडली आणि) अकुंना त्यांच्याच खेळात 'गड्डा झब्बू' मिळाला. =))

LOL :-)) :-)) :-))

इरामयी's picture

12 Jul 2019 - 2:26 pm | इरामयी

अगदी हेच म्हणायचं होतं... गड्डेरी झब्बू!!

मधेच तन्मय, जानकी आणि आप्पा राशिंनकर आणून सॉलिड इफेक्ट आणलाय !

___/\___

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 1:39 pm | जॉनविक्क

प्रगती आहे... लवकरच अक्युमानची दैवी देणगी तुम्ही प्राप्त कराल अजून जरा प्रयत्न आवश्यक आहे म्हणजे एंटर कि आणू शिष्द्द लेकणाचा दर्जा प्राप्त व्हायला थोडा वेळ आहे

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 1:51 pm | गड्डा झब्बू

अक्युमन ची दैवी देणगी प्राप्त होणे हि कुंडलिनी जागृत होण्यापेक्षा कठीण गोष्ट आहे, तो पल्ला गाठायला हा जन्म कमी पडेल.
एंटर कि आणू शिष्द्द लेकणाचा दर्जा प्राप्त कारणे आन्खीन थ्वोड्या पर्यात्नानी शाक्य आहे, साध्या त्यावर फोकास कर्तो.

आता अक्युमन ची दैवी देणगी या विषयावर एक लेख येऊद्यात!

आम्हास तो अधिकार अजून प्राप्त झालेला नाही :-))

नाखु's picture

12 Jul 2019 - 2:05 pm | नाखु

आता त्या खिलजी महाराजाला न्यूनगंड निर्माण होईल त्याचे काय??
त्याच्याच गुरूने परस्पर दुसर्याच शिष्याला गुरुज्ञान दिले म्हणून!!
या एकलव्याला कलियुगात पण अंगठाच???

अकु महाभारतीय रामायणाच्या पंचतंत्र अंगाने जाणार्या काकोडकरीय बालवांङमयाचा दशकीय साक्षीदार वाचकांची पत्रेवाला नाखु

आणि गड्डा महाराज कथादीक्षित असल्याने एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.

जॉनविक्क's picture

12 Jul 2019 - 3:05 pm | जॉनविक्क

एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ

एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही शिष्यांवर गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.

'काव्यपंथी साधू' आणि 'कथादीक्षित' हे शब्दप्रयोग वाचून हसू थांबत नाहीये :-))

एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको.

इथे एकाच लक्षाकडे चालणाऱ्या या दोन्ही शिष्यांवर गुरुदेवांचा लोभ आणि कृपा समानच आहे यात शँका नको असावे असे मि गृहीत धरतो :-))

खिलजि's picture

12 Jul 2019 - 5:53 pm | खिलजि

आमचे गुरुदेव दयाळू आहेत कृपावंत आहेत .. त्यांची कृपा आम्हा पारंभक्तांवर कायम राहणार .. जो गुरुवचन वाचणार , तोच लिहिणार ..

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2019 - 5:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

जो गुरुवचन वाचणार , तोच लिहिणार ..

नाय, नाय, त्ये... जो गुरुवचन वाचणार, तोच वाचणार... आसे हावे. ;) ;)

खिलजि's picture

12 Jul 2019 - 7:03 pm | खिलजि

ठीक आहे जशी आपली आज्ञा गुरुदेव .. आपण पण आम्हाला गुरुसमानच आहात. आम्ही अद्न्य बालक बापुडे , कुठे ते गुरुत्वाचा आणि आमचे फुकाचे बुडबुडे

खिलजि's picture

12 Jul 2019 - 7:06 pm | खिलजि

गुरुत्वाचा ऐवजी " गुरुवचन " वाचावे गुरुदेव , हा टंकलेखक आमच्या पहिल्या गुरुदेवांकडूनच प्राप्त झालेला आहे , अद्भुत आहे . कधीकधी स्वतःच स्वतःच टंकतो ...

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 2:20 pm | गड्डा झब्बू

अकु महाभारतीय रामायणाच्या पंचतंत्र अंगाने जाणार्या काकोडकरीय बालवांङमयाचा दशकीय साक्षीदार वाचकांची पत्रेवाला नाखु

खत्री.... :-))

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jul 2019 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

जमतय जमतय...
तेवढे शुध्दलेखनाचे मनावर घ्या... फारच शुध्द लेखन होतय.
बाकी..... तुमच्यावर गुरुवर्यांची कृपा अशीच राहो ही प्रार्थना.
पैजारबुवा,

गड्डा झब्बू's picture

12 Jul 2019 - 2:47 pm | गड्डा झब्बू

पैजारबुवा आषाढी एकादशीच्या शुभेच्छा! जय हरी विठ्ठल! __/\__

तेवढे शुध्दलेखनाचे मनावर घ्या... फारच शुध्द लेखन होतय.

चालू हायेत त्यासाठी पर्यत्न, मिलेल यश. म्हन्त्तात ना पर्यत्नांती पर्मेश्वर.

व याधाग्यातील स्कोप बद्दल मौल्यवाण मौन पालिळे म्हणूं बुवांचा निषेध.

उगा काहितरीच's picture

12 Jul 2019 - 3:26 pm | उगा काहितरीच

बस ! आता बस करा राव !! अती झालं अन् हसु आलं.

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 2:45 am | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 3:58 pm | जालिम लोशन

जय जय रामकृष्ण हरी ।।

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 2:44 am | गड्डा झब्बू

।। जय जय रामकृष्ण हरी ।।

बाकी गुरुबंधू , एकदम झ्याक लिवलंय .

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 2:42 am | गड्डा झब्बू

आभारी आहे गुरुबंधू __/\__
तुम्ही पण एक फर्मास कविता लिहा आता!

कंजूस's picture

14 Jul 2019 - 2:55 am | कंजूस

खिक्क.
अकुपंथीय लेखकांचे स्वागत.

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 3:03 am | गड्डा झब्बू

:-)) :-)) :-))

अथांग आकाश's picture

15 Jul 2019 - 9:30 am | अथांग आकाश

कोतवालाने मंगळोदयाची वाट न बघता चिन्मयच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला मर्त्य लोकात ढकलून दिले... ;)
kick

सुंदर काकूंनी आनुन्डीलेला चहा गार्गुत्त झाला होता

लै भारी

मास्टरमाईन्ड's picture

19 Jul 2019 - 9:31 pm | मास्टरमाईन्ड

गार्गुत्त झालो :)) :))