Skip to main content

Amazing .. money transfer

लेखक मराठी कथालेखक यांनी मंगळवार, 02/07/2019 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल टीव्हीवर येणार्‍या अनेक जाहिरातींतून उत्पादन/सेवेच्या जाहिरातीसोबतच स्त्री-पुरुष समानतेला हलकेच स्पर्श केलेला असतो. मुली मुलांपेक्षा कमी नाहीत , कर्तृत्वात मागे नाहीत हे अधोरेखित करण्याची जणू स्पर्धा असते. अमेझॉन मनी ट्रान्सफरच्या जाहिरातीत मात्र एक मुलगी आपल्या मित्राला अर्थिक मदत करताना दिसते. स्मार्ट वॉचकरिता जमवलेले पैसे ती मित्राला विमानाच्या तिकिटाकरिता देते असं दाखवलंय. छान वाटली ही जाहिरात.. तुम्ही पाहिलीय का ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4288
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

दाखवली आहे अन आजकाल खूप मुली सहज इकडे तिकडे पैसे ट्रान्सफर करतात त्यात काही विशेष वाटलं नाही. म्हणजे अगदी अमूलच्या मेरो गाम काथा पारे वगैरेने जितकं फील झालं होतं तितकं नक्कीच नाही झालं.

In reply to by जेम्स वांड

बहूतेक मी मला काय म्हणायचं आहे ते नेमक्या शब्दात मांडलं नाही असं दिसंतंय.. मला ती मुलगी पैसे ट्रान्सफर करते त्याचं विशेष नाही वाटलं तर ती आपल्या साठवलेल्या पैशातुन एका मित्राला मदत करते याचं अप्रुप वाटलं. एखादी मुलगी एखाद्या मुलाला (ते ही मित्र .. भाऊ वा प्रियकर नाही) मदत करते ही मोठी गोष्ट वाटली.

फक्त त्यांची फ्रेंडशिप चांगली आहे असा वाटलं .. बाकी स्त्री-पुरुष असमानतेची मुळे एवढ्या खोलवर आहेत कि आपल्याला ह्या जाहिरातीचं कौतुक वाटतं..

In reply to by हर्मायनी

बाकी स्त्री-पुरुष असमानतेची मुळे एवढ्या खोलवर आहेत कि आपल्याला ह्या जाहिरातीचं कौतुक वाटतं..
बरोबर .. एखाद्या मित्राला मदत .. तेही खासकरुन अर्थिक मदत करणारी मुलगी दुर्मिळच .. त्यामुळेच जाहिरातीचं कौतुक ..

भारतीय रेल्वे खात्याने अ‍ॅमेझॉनवर मानहानीचा दावा दाखल करायला हवा आणि तोही तगड्या रकमेचा.