Skip to main content

यातून मार्ग काय?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 25/06/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे. तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरीही तो खूष आहे.पंधराव्या वर्षी का होईना,त्याला पूर्ण पगार मिळेल... अशी उदाहरणं आजुबाजूला कितीतरी आहेत. तोंडावर कसलीच रया नसलेले पण आपण कोणीतरी आहोत असा समज करून जगणारे तरूण सगळीकडे दिसतात.तोंडात काहीतरी मचमच चालू असलेले... कोणी एम.ए.,कोणी बी.ए.,बी.एड.,डी.एड.तर कोणी पॉलिटेक्निक तर कोणी बी.ई.झालेले.असे तरूण गावोगाव शेकड्यांनी आहेत.अपवाद वगळले तर, सगळेच व्यसनाच्या आधिन.तंबाखु, गुटखा,सिगारेट,गांजा,दारू यातच यांचा दिवस जातो.ज्यांच्या बापांची आर्थिक स्थिती चांगली आहे,ती पोरं बापाच्या जीवावर मजा करताहेत... मजा म्हणजे काय तर हेच गुटखा,गांजा,दारू.... ही पोरं काहीच काम करीत नाहीत.या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यचं नाही.शेतीकडं यावं अशी स्थिती नाही.शिवाय इथं ढोर मेहनत करावी लागते. त्यामुळं ही पोरं आयुष्यभर अशीच जगतील...बेकार हा शिक्का कपाळी घेऊन मरतील.माझ्या समोर गावात तिशीच्या आतील सात-आठ तरूण दारू पिऊन मेली... ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय.ती चिंता विसरायला गांजा आणि दारू हेच औषध. ग्रामीण भागात शारीरिक कष्टाची कामं सोडली तर,दुसरी कुठलीच कामं नाहीत.या पोरांची अशी कामं करण्याची क्षमता नाही, इच्छाशक्तीही नाही.ही पोरं म्हणजे बापांसाठी ब्याद आहेत.धरलं की चावतयं,सोडलं की पळतयं,अशी बापांची अवस्था आहे.सगळे बाप कदरून गेलेत.माझ्या एका मित्रानं, व्यसनी पोराच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी,त्याच्या खुनाचा घाट घातला होता.ऐनवेळी रिक्षावाला तयार झाला नाही म्हणून तो प्लान अंमलात आला नाही.मित्रानं स्वत: हा किस्सा सांगितला,तेव्हा मी हादरून गेलो.परिस्थितीनं गांजून गेला की, माणूस किती टोकाला जाऊ शकतो,यांचं हे उदाहरण. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी, पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड....आपण कोणीतरी आहोत...यात रमायला आहे मोबाईल डाटा आणि दारू,गांजा.तो यांना वास्तवाची कधीच जाणीव करून देत नाही.आपलं भवितव्य काय? यांचं कोणाकडंच उत्तर नाही.तरीही समाजात सगळं काही सुरळीत सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर,मी परवा पतसंस्थेतल्या त्या एम.कॉम.मित्राला सहज भेटलो.तो बोलला,बाकी काही असो बघा, देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. महारुद्र मंगनाळे ------------------------------------------------------ ------------------------------------------------------ आता यातल्या काही मुद्दयावर माझी मतं मांडतो.ती १००% बरोबरच आहेत असा दावा नाहीये. सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. एम कॉम होऊनही सात हजाराच्या वर पगार देऊ नये इतपत सदर इसमाची पात्रता असेल तर याला किती गोष्टी जबाबदार आहेत पहा. आपला कल कॉमर्सकडे नाही हे याला स्वत:लाही समजलं नाहीये.किंवा याला एम कॉम होईपर्यंत कुणी सांगितलेलंही दिसत नाही.किंवा सांगितलं असलं तरी याने दुर्लक्ष केलं.आता ते दुर्लक्ष का केलं? तर आपला कल नेमका कुठं आहे हे सांगणारी सक्षम यंत्रणा,सोय सदर व्यक्ती इयत्ता १० वी पास झाल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहचली नसावी किंवा हा त्या सुविधेपर्यंत पोहचला नसावा.खेडेगावातला १० वी झालेला मुलगा किंवा त्याचे पालक आपण पुढील करियरचा निर्णय कलचाचणी देऊन घ्यायला पाहिजे इतके जागृत असतात का? बरं कलचाचण्या तरी कितपत विश्वासार्ह असतात ते खालील लिंकमधे वाचा.त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहावं हा ही प्रश्न आहेच. https://www.loksatta.com/chaturang-news/aptitude-test-180674/lite/ या सगळ्यांना त्यांच्या डिग्रीप्रमाणं सरकारी नोकरी हवीय..ती मिळणं शक्यच नाही. मान्य! सरकारी नोकरी सगळ्यांना मिळणारंच नाही.पण सरकारी नोकरीत 'असं काहीतरी' नक्की असावं ज्यामुळे ही अपेक्षा होत असावी.नाही का? सरकारी नोकरी असली की लग्न पटकन होतं.(अपवाद क्षमस्व!) शासकीय नोकरीमुळे स्थिरता,आर्थिक सुरक्षितता त्या अनुषंगाने येणारं चांगलं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा फायदे आहेतच की! ते कसे नाकारणार? की चांगलं मानसिक स्वास्थ्य ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाहीये? खाजगी नोकरीत इतकं मानसिक स्वास्थ्य असतं का? सरकारी नोकरीइतकी सुरक्षितता,स्थिरता असते का?कधीही निरोप दिला जाण्याची शक्यता खाजगी नोकरीत अधिक नाही का? किमान वेजेसचा नियम कारखान्यांमधे पाळला जातो का? स्वत:चा व्यवसाय हा सुद्धा मार्ग आहे पण सुरु केलेला प्रत्येक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो का? व्यवसाय करणं इतकं सोपं असतं का? शिवाय लग्न हा मुद्दा लक्षात घेता छोट्या व्यवसायिकाच्या तुलनेत वरच्या पदावरचा सरकारी नोकरदार मुलीच्या आईवडिलांना जास्त भावला तर ते चूक कसं? खाजगी नोकरीतही किरकोळ पगाराच्या नोकर्‍या भरपूर उपलब्ध आहेत.पण चांगल्या किंवा जास्त पगाराची अपेक्षा ठेवणं हे चूक कसं? तितका पगार देण्याइतपत घेतलेल्या उच्च शिक्षणात 'दम' नसेल तर असे अभ्यासक्रम सुधारणं किंवा बंद करणं ही शासनाची जबाबदारी नाही का? हेच अभ्यासक्रम मोठ्या शहरातल्या टॉपच्या संस्थेतून पूर्ण केल्याने चांगल्या नोकरीची हमी मिळते.पण अशा संस्थांनाही विद्यार्थी संख्येचे बंधन असतेच.सगळेच तिथे शिकायला जाऊ शकत नाहीत.शिवाय काही धनदांडगे लोक पैशाच्या जोरावर आपल्या 'सुमार बुद्धीच्या' पाल्यासाठी सीटस विकत घेण्याची शक्यताही आहेच.सर्वांना हे शक्यही नाही आणि समाजविघातकही आहेच. मग यातून बोध काय घ्यावा? खेड्यातल्या,छोट्या शहरातल्या लोकांनी,गरीबांनी अशा दर्जेदार,नामांकित संस्थामधून शिक्षण घेण्याचा विचार सोडून द्यावा का?पण महागाई मात्र सगळ्यांना समान आहे.त्याचं काय करणार?महागाईला तोंड देऊन चार पैसे खिशात शिल्लक राहणं गरजेचं आहे.समाजाच्या दृष्टीने तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब या कॅटॅगिरीत गेलात की लग्नाबिग्नाचा विचार मनातून काढून टाकण्याशिवाय पर्याय राहत नाही.किंबहूना हेच वास्तव आहे. यावरुन नोकरी सरकारी असली तर चांगलीच पण खाजगी असली तरी ती भरपूर पगारवाली असणं किती गरजेचं आहे हे लक्षात येईल. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे,त्या मुलांची लग्न झालीत.त्यांना लेकरं झालीत...त्यांचं जीवीतकार्य संपलं.वंशाला दिवा लागला. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची त्यांची लग्न रखडलीत.लग्न हाच त्यांच्या चिंतेचा विषय. लग्न होणं हीच आयुष्याची 'इतिकर्तव्यता' आहे का? तर हो! बर्‍याचजणांबाबत ती निदान गरज तरी आहे हे तरीे नाकारता येणार नाही.शिवाय यात गैर असं काहीच नाही. सडकेवर पानटपरी वा बार परिसरात रेंगाळणाऱ्या कोणाही पोराला म्हणा,काहीतरी करायला हवं रे बाळ... तो म्हणतो,काय करू ते सांगा काका?...यांचं उत्तर ना माझ्याकडं आहे, बापाजवळ आहे ना आणखी कोणाकडं. छोट्या-छोट्या गावात पावलापावलावर चहाच्या टपऱ्या,पानपट्ट्या आहेत.त्यातील काहींचं बरं चाललंय.अनेकांना नीट रोजगारही मिळत नाही...अशा स्थितीत चहाची टपरी टाक असा सल्ला कसा द्यायचा? कोणत्याही व्यापाऱ्याला,दुकानदाराला बोला,तो म्हणतो,गिऱ्हाईकचं नाही.मालाला उठाव नाही.अनेकांनी नोकर कमी केलेत.नवा एकही रोजगार नाही.असं एकही क्षेत्र नाही,जिथं या पदवीधारकांना संधी आहे.. कारकुनी कामंच राहिली नाहीत.सगळीकडं ठप्प आहे. हे वाचल्यावर केवळ कष्टाची मनापासून तयारी असणं हे सुद्धा तितकं पुरेसं नाहीये हे नीट ध्यानात येईल.बाजारात कामही हवं. तरीही देशभरात दरवर्षी लाखो,करोडो मुलं दहावी,बारावी,पदवी,पदव्यूत्तर ची कागदं घेऊन बाहेर पडताहेत.सगळ्यांना माहित आहे,नोकरी मिळणार नाही.तरीही प्रत्येकजण नोकरीसाठीच शिकतोय.या शिक्षणातून त्याला कुठलं तंत्र अवगत होत नाही ,कुठली कला येत नाही की, व्यावहारिक शहाणपण. निर्माण होतो तो अहंगंड... शिक्षण घेणारे सगळे असेच होतात का स्वभावानं,वृत्तीनं? यात रमायला आहे मोबाईल डाटा. सध्या म्हणे युट्युब हा एक चांगला गुरु आहे.वापर कसा करायचा हे वापरकर्त्यावर अवलंबून आहे. देशाला मजबूत सरकार मिळालं ...तेवढं काश्मीरचं ३७० कलम हटविलं अन् समान नागरी कायदा आणला की,देशाची गाडी रूळावर येईल.मोदीला तेवढ्या साठीच तर मी मतदान केलोय... मी एका वाक्यानंही त्याचा प्रतिवाद केला नाही.त्याच्या आयुष्यात आता यापेक्षा अधिक चांगलं काही घडण्याची शक्यता नाही.काल्पनिक शत्रूंशी लढण्यातच तो अच्छे दिन चे अनुभव घेणार,असं दिसतयं.साक्षात ब्रम्हदेव त्याला समजावायला आला तरी,त्याच्या विचारात बदल होणार नाही.... देशाचं भवितव्य आता लिहलं गेलयं... सध्या फक्त वाट बघायची... लोक भावनेवरून भाकरीवर कधी येतात त्यांची.. यात लेखकानं आपला राजकीय द्वेष व्यक्त केलाय असं मला तरी वाटलं.सध्याच्या अवस्थेला केवळ ५ वर्षांपूर्वी आलेलं सरकारंच तेवढं जबाबदार कसं? हे काही समजलं नाही. शेवटचा राजकीय विद्वेष वगळला तरी परिस्थितीचं वर्णन बर्‍यापैकी वास्तव दर्शवणारं आहे.व्यसंनांचं समर्थन कदापि नाही.तो यातून बाहेर पडायचा मार्ग खचितच नव्हे. प्रत्येकाला पुणे-मुंबई-ठाणे गाठणं शक्य नाही.तिथल्या राहण्याच्या ठिकाणांची भाडी,घरांच्या किंमती पाहता ते कितपत 'परवडेल' हा प्रश्नच आहे.कारण मिळालेला सगळा पैसा घरावरच खर्च होणार असेल तर मुंपुठात येऊन फायदा काय? पण मग यातून मार्ग काय? तिढा सुटावा कसा? मांडा आपापले विचार,आपले अनुभव. _/\_

वाचने 55511
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

भारतीय जनतेने काठ-कसर हा प्रकार बंद करावा अथवा किमान ८०% नी कमी करावा, सगळ्या गोष्टी जुगाड करुन आणि/किंवा स्वस्त हवे आहे म्हणाल्यावर नोक-या पगार कुठुन मिळणार वरिल बदल होण्यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न करावे, पैसा खेळता राहिला तर सगळ्यांना काम मिळेलं, जनतेने देशांतर्गत पर्यटन करावे व सरकारने त्यास प्रोत्साहन आणि infrastructure & security पुरवावी या मुळेही प्रचंड जाॅब निर्माण होतीलं सध्या एवढचं बादवे, असे म्हणतात कि इतर देश बचत करतात व अमेरिकन जनता इत्यादी त्यावर चंगळ करतात.


In reply to by मदनबाण

धन्यु मदनबाण लिन्क साठी ! लेखात नमूद केलेली खालील विधाने बेरोजगारीवर योग्य प्रकाश टाकतात ! त्या श्रमिकवर्गात पांढरपेशी श्रमिक देखील आले. .... श्रमिक वर्गावर, बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने काय संकटे ओढवली असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो. राज्याच्या या स्थितीला अनेकांनी ‘जॉबलेस ग्रोथ’ – म्हणजे ‘रोजगारसंधींविना विकास’ असे म्हटले आहे. परंतु वास्तविक हे केवळ तेवढेच नसून हा ‘रोजगारसंधी कमी-कमी करणारा विकास’ किंवा ‘जॉब रिडय़ूसिंग ग्रोथ’ आहे. मानवी श्रमांवर कमीत कमी अवलंबित्व ठेवून, यंत्रे आणि उपकरणे यांवरच भिस्त ठेवणारा हा विकास आहे, ..... आर्थिक उत्पन्नही वाढले. पण म्हणून श्रमिकांना उत्पन्न मिळाले असे नाही; कारण श्रमशक्ती उपलब्ध असूनही तिला रोजगारच मिळालेला नाही. उलट बेरोजगारीचे प्रमाणच दर वर्षी आणखी आणखी वाढत राहिले.

खरेच !? अर्थसंकल्प सादर करण्याआधी २०१८च्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यातील अविवाहित पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. देशात आज ५४.४ टक्के पुरुष, तर ४४.८ टक्के महिला अविवाहित आहेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

In reply to by मदनबाण

हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे. कारण, भारतातील ५०% टक्के व्यक्तींचे वय २५ पेक्षा कमी आहे आणि ६५% व्यक्तींचे वय ३५ पेक्षा कमी आहे आणि सद्या विवाहचे वय सर्वसाधारणपणे वाढलेले आहे. म्हणून, जर लग्नासाठीच्या कायदेशीर किमान वयावरील सर्व व्यक्ती अविवाहित समजल्यास, वरील आकडे मिळणे शक्य आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच विचार मनात आले. शिवाय तो नोकऱ्या निर्माण करण्याचा एक मुद्दा. अधिकाधिक लोकांना काम मिळावं म्हणून तंत्रज्ञान कमी करुन मानवी श्रम अधिकाधिक वापरणाऱ्या नोकऱ्या तयार करण्याचा सूर अनेक ठिकाणी दिसतो. असं मत मांडणारे लोक कुठल्या लॉजिकने असं समजतात की व्हॅल्यू क्रिएशन नसलेले जॉब्स तयार करण्याने खरा रोजगार निर्माण होईल? मोबदला द्यायला निमित्त म्हणून व्हॅल्यूलेस रोजगार निर्माण करणं हे रोजगार निर्माण न करण्यासारखंच आहे. पन्नास टक्के बेरोजगारांना खड्डा खणण्याचं काम देऊन पगार दिला आणि उर्वरित पन्नास टक्के बेरोजगारांना तो खड्डा भरण्याचं काम देऊन पगार दिला तर पुष्कळ जॉब्ज निर्माण होतील. पण व्हॅल्यू क्रिएशन शून्य. (उदाहरण केवळ सुलभीकरणासाठी, सामान्यपणे दिलं जाणारंच उदाहरण आहे) "तो खड्डा बनावा हे तो माझी इच्छा" अशी वाढीव मागणी बाजारात कोणातरी मोबदला देऊन करत असेल तरच त्या पगाराला अर्थ आहे. एरवी टॅक्सपेयर्सच्या खिशातून पैसा त्या बेरोजगार लोकांना थेट अनुदान म्हणून देणे हाच प्रकार झाला. अशी कृत्रिम मागणी बनवून सरकारने स्वतःच बाजारात (टॅक्सपेयर्सच्या इच्छेविना पण त्यांच्या पैशांतून) स्युडो ग्राहक बनून उभे राहण्यापेक्षा थेट बेकारभत्ता द्यावा. नाटक कशाला?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

... म्हणून या आकड्यांची दोन-तीन दशके किंवा जास्त जुन्या आकड्यांशी (सामाजिक बदल सोडून) तुलना करता येणार नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हे ठरविण्यासाठी कोणता वयगट विचारात घेतला आहे हे फार महत्वाचे आहे. ह्म्म, हे मात्र खरंय ! बाकी मी जेव्हा आजुबाजुला बघतो तेव्हा माझे काही मित्र जे कॉलनीत,कंपनीत किंवा इतरत्र आहेत ते अविवाहित असल्याचे पाहतो. एक हापिसातला मित्र जॉबचा स्ट्रेस आणि लग्न न होण्याचे फस्ट्रेशन सहन न होउन देश सोडुन गेलेला आहे. पाणी, नोकरी आणि छोकरी हे गंभीर मुद्दे झालेले आहेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

ऑटोमेशन खूप प्रश्न निर्माण करेल . ड्रायव्हर सहज उपलब्ध असताना आणि आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असताना . सेल्फ drive car chi गरजच नाही त्या मुळे खूप लोकांच्या नोकऱ्या जातील . विविध वस्तूंचे प्रोडक्शन करणारे कारखाने माणसा चा उपयोग न करता यंत्राचा वापर केला तर खूप लोक बेरोजगार होतील . असे सर्वच क्षेत्रात बेरोजगारी वाढेल . लोक स्वतःच्या गरजा कमी करायला सुरावत करतील नोकरी नाही पैसे नाहीं तर ते कमीत कमी गरजेच्या वस्तू खरेदी करतील . मग जे विशाल प्रोडक्शन यंत्रा मार्फत केले जाईल ते खरेदी कोण करणार . आज समजा १०० साबण विकले जातात ते २५ च विकले जातील म्हणजे साबण उत्पादन बंद करावे लागेल . लोकांची purchasing power Kami झाल्यावर आर्थिक अर्थव्यवस्था कोलमडून पडेल हा सुद्धा धोका आहेच की . बेरोजगार लोक कसे ही सुखी भाकरी वर जागतिक नाही तर गुन्हेगारी कडे वळतील . असंख्य अस्वस्थ तरुण असलेल्या जगात कायदा सुव्यवस्था टिकवणे एक आव्हान बनेल . जगाच्या बऱ्याच भागात असुरक्षित वातावरण निर्माण होईल

In reply to by Rajesh188

चक्र वास्तवात याच्या बरोब्बर उलट्या दिशेत फिरतं. मुद्दे अगदी हेच. ते योग्य. पण परिणामांचा अंदाज उलट दिशेने केलेला दिसतो. यंत्राने केलेला साबण बनवायला जो पर युनिट खर्च येतो त्यानुसार तो स्वस्तात विकता येतो आणि अधिक लोक तो घेऊ शकतात. याउलट हाताने बनवलेले साबण लेबर कॉस्टने इतके महाग पर युनिट पडतात की ते फार कमी एलिट क्लासलाच परवडू शकतात. इथे साबण ऐवजी वस्त्र किंवा अन्य काही ठेवून पहा. अतिरेक अयोग्य, तारतम्य हवं हे सर्व मान्यच. पण मनुष्य श्रम बळेच वापरात आणायचे असं ठरवलं तर त्यात "व्हॅल्यू क्रिएशन" होत नाही. हा मुद्दा सहज चर्चेत नोंदवला जातच नाही आणि तोच मूलभूत आहे.

ऑटोमेशन मुळे आर्थिक मंदी येईल ही भीती निराधार आहे असे तुम्हाला सुचवायचे आहे का. वस्तू खरदी करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होणारच नाही ह्याला काय आधार आहे

How robots change the world We estimate up to 20 million manufacturing jobs are set to be lost to robots by 2030. In Middle of Trade War, America’s Busiest Port Gets Ready for Robots Exclusive: Amazon rolls out machines that pack orders and replace jobs

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

In reply to by मदनबाण

ही अतिरेकाची , एका टोकाची उदाहरणं असू शकतील. त्यामागेही काही हिशोब असेल. पण एकूणात एफिशियन्ट आणि वेगामुळे किफायतशीर उत्पादन पद्धती उपलब्ध असताना केवळ अधिक माणसांचे श्रम उपयोगात आणता यावेत म्हणून इनएफिशियन्ट मार्गाने उत्पादन करणं यातून तेजी किंवा कोणतीही प्रगती अजिबात होत नाही. प्रगती सोडा, खऱ्या अर्थाने "पगार"ही नसतो तो.

In reply to by गवि

तू (एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून हं मबाशेठ) कार, बस, रिक्षा, बाईक ऐवजी चार मजुरांनी उचललेल्या मेण्यातून / पालखीतून ऑफिसला जाशील का? त्यांना किमान रोजगाराच्या नियमानुसार समजा 300 रुपये प्रत्येकी रोज द्यायचा आहे. (किंवा 50 देतो, घेणार तर घे, असं म्हणून त्यांचं शोषण करणे हा दुसरा मार्ग) म्हणजे 1200 रुपये देऊन रोज ऑफिसला जाशील का? (अंतर जास्त असेल तर 10 - 10 किमीवर मजुरांची टीम बदलेल. त्यांना पुन्हा 1200 रुपये). ऑफिसात पोचायला सहा तास आणि परतायला सहा तास. आठ रोजगार उत्पन्न होतील. एकट्या तुझ्यासाठी. तुला 1200 रोज प्रवासाला परवडतील इतका उत्तम पगार तुला देणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात असेल ? तिथेही भरपूर मानवी श्रम वापरून उत्पादन होत असेल तर तू जे उत्पादन कंपनीसाठी करशील त्यातून ते 1200 वाढीव वसूल व्हावे लागतील. म्हणजे तुझ्या कंपनीची उत्पादने अगदीच गडगंज श्रीमंत अशा 2 टक्के लोकांसाठी असतील. सध्या ते विसरून जाऊ. आता हे काल्पनिक उदाहरण उलट बाजूने पाहू. हीच मेणा वाहतूक सर्व्हिस त्यातल्या एका मेणावाहक मजुराला खुद्द वापरायची आहे असं समजू. (आयुष्यात प्रगतीचं लक्षण म्हणून किंवा कधी गरज पडली म्हणून) तर तो 1200 रुपये देऊन ती घेऊ शकेल? नाही. (त्यातून तो 300 या न्याय्य रोजगाराऐवजी तुम्ही 50 रुपयांत पिळून घेतलेला मजूर असेल तर त्याला कोणतीच सेवा वस्तू परवडणार नाही.) इथे "चरखा, कापूस सूत, हातमाग, खादी" विरुद्ध "यंत्रमाग, कृत्रिम धागा रेयॉन, वेगवान उत्पादन" किंवा अन्य काहीही कल्पून बघ. वस्त्रनिर्मितीत जास्त मानवी श्रम वापरायचे (पगार देता येण्यासाठी) तर तो पगार इतक्या मजुरांना देऊन बनलेली खादी खुद्द त्या मजुरांनाच परवडणार नाही आणि सामान्य लोकांनाही. तिला मागणी कशी असेल. ही मंदीची केस बनते. यंत्रमागाने कमी लोकांना रोजगार मिळेल. पण कापड खूप मोठ्या लोकसंख्येला परवडेल अशा दरात मिळेल. त्याला मागणी असेल. असे व्यवसाय स्वतःसोबत अन्य रोजगार संधी उत्पन्न करतात. विषय गहन आहे.

योग्य त्या अर्थपूर्ण आणि सध्या असलेल्याच नोकऱ्या अर्धवेळ करणे, अधिक कर्मचारी नेमणे आणि पगार विभागून जास्त लोकांना देणे हा मार्ग त्यातल्या त्यात प्रभावी ठरु शकतो. जिथे पगार किमान गरजेच्या दुपटीहून जास्त आहेत तिथे हे शक्य आहे. किमान पुढील नवीन भरतीच्या वेळी. पण मग भरपूर पगार मिळवणारे लोक हे सहन करणार नाहीत. तिथे सामूहिक हित वगैरे विचार फालतू ठरतील.

In reply to by गवि

गवि सेठ नविन तंत्रज्ञान येत राहते आणि आधीचे जाते त्यानुसार माणसांचे काम देखील जाते आणि नविन काम देखील उपलब्ध होत राहते, परंतु गेल्या काही वर्षात मात्र तंत्रज्ञान बदलण्याचा काळ त्याचा अपडेट होण्याचा कालावधी देखील झपाट्याने बदलला आहे आणि बदलतो आहे ! अगदी रोजच्या मोबाइल वापरात देखील हल्ली अ‍ॅप्स ना देखील आता जवळपास रोज अपडेट अव्हेलेबल असतो. पुर्वी कंपनीत इमेलसाठी लोटस डॉमिनो सर्व्हर वापरला जायचा आणि लोटस इमेल क्लायंट असायचे मग आउटलुक मेल क्लायंट आले आणि मायक्रोसॉफ्ट सर्व्हर्स आले, परंतु टेक्नॉलॉजी बदलुन सुद्धा त्यावर काम करणारी माणसे कमी झाली नव्हती फक्त फंक्शन्ल चेंज झाला ! मात्र क्लाउड आल्यावर अख्खा सेटअप बदलला आणि कंपनीच्या आत असलेल्या सर्व्हस पासुन डेटा सेंटर / डेटा बेस हे सगळच क्लाउडवर मुव्ह झालं आणि कंपनीच्या मेलिंग सिस्टिमसाठी असलेला अख्खा सेटअप त्यांच्या माणसां सकट गायब झाला ! म्हणजेच या सेटअप मध्ये असलेल्या सगळ्यांच्या नोकर्‍या गेल्या. ट्रक मधुन सामान भरण्याचा किंवा काढण्याचा अगदी लो-स्किल जॉब देखील आता नष्ट होणार आहे, बर्गर बनवणारा रोबोट बाजारात आहे आणि रोबो वेटर देखील हाजिर आहे. Robots Edge Closer to Unloading Trucks in Amazon-Era Milestone

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawant | Tamannaah

आज एक व्हिडीओ गोवा भागातील काजू फॅक्टरी चा पाहिला . सर्व कामे लोक हाताने करीत होते. उलट टर्की मधला काज्यू फॅक्टरी चा ही व्हिडीओ पाहिला . त्यात सर्व कामे यंत्रे करीत होते . माझ्या माहिती प्रमाणे हे काम खूप क्लिष्ट असल्याने त्यात अनेक प्रक्रिया आहेत म्हणून काजू फार महाग आहेत .टर्की मधील काजूचा भाव भारतातील भावाच्या खूपच खाली आहे . मी काम करीत असलेल्या कारखान्यातून सुमारे दहा हजार कामगारांना निवृत्त होण्यास भाग पाडण्यात आले व कामे यंत्रावर करण्याचे प्रमाण वाढविण्यात आले कारण स्पर्धेत टाकून राहायचे असेल तर मालाचा दर्जा तर टिकवावा लागतो सबब प्रक्रिया खर्च कमी करण्यासाठी प्रथम बळी पर्याय असलेल्याचा देण्यात येतो . उदा कारकून मंडळी , शिपाई ई. बागकाम, सिक्युरिटी ई कामे आता सर्रास ठेकेदाराकडून करून घेतली जातात . आज शाळेत प्रवेश घेणार्या इतक्या बाळकांना कोण काम देणार हा प्रश्न माझ्यासमोर सतत पिंगा घालीत असतो.अनेकांनी एका मुलावर ( मुलगा बरे ) समाधान मानण्याचे सुरू केले आहे पण बाकीच्यांचे काय ? खर्च वाढवून अर्थव्यवस्था चालविता येते पण तो काही दीर्घकाळ चालणारा उपाय नव्हे . शेवटी साधनसंपती व मागणी यांनीच मूळ अर्थव्यवस्था बनत असते. आज बँक ,पोस्ट , सरकारी खाती यांच्यात ७० ८० च्य दशकाप्रमाणे भरती होते का ? मानवाचे शरीर ज्याप्रमाणे काही काळ औषधानी ,कृत्रिम प्राणवायूने जगावितां येते पण त्याला जशी मर्यादा आहे तरी अर्थव्यवस्थेला ही .

स्वतःची बुध्दी असणारी यंत्र फक्त उत्पादन क्षेत्रात च वापरली जातील असे नाही . माणूस आणि यंत्राच्या कार्य क्षमतेत फरक आहे .मानवाला शारीरिक मर्यादा आहेत . यंत्र म्हणजे अफाट ताकत आणि परत ती बुद्धिवान पण झाली (आपणच त्यांना बुद्धिवान करतो)तर लष्करात सुद्धा माणसाचे output यंत्र पेक्षा कमी असेल तिथे सुद्धा माणसाची जागा यंत्र घेतील . पोलिस,न्यायधिष,ड्रायव्हर,pilot, train Che driver,salesman,waitor,asha खूप साऱ्या ठिकाणी माणसेच लागणार नाहीत . आणि समाजातील खूप मोठा हिस्सा हा निर्धन होईल .उत्पादने जी निर्माण होतील भले यंत्र वापरून उत्पादित होत असतील पण ती उत्पादने असतील तर माणसा साठी किती ही स्वस्त असली तरी रोजगार च नसलेला समाजाचा मोठा हिस्सा ते खरेदी कशाला करतील . टूथपेस्ट,साबण,कपडे,चमचमीत अन्न,हे तो नक्की टाळेल कारण ते विकत घेण्याची त्याच्या कडे ताकत च नसेल. मुंबई मध्ये बरेच फ्लॅट विक्री वाचून पडून आहेत कारण ते विकत घेण्याची ताकत लोकांकडे आहे . बँके चे कर्ज घेवून ती ताकत ग्रहकडे येते पण त्या फ्लॅट चे खरे मूल्य हे घरेदी किमती पेक्षा खूप कमी असते.१० लाखाचा फ्लॅट चे भाडे २००० रुपये सुद्धा मिळत नाही .उद्या कर्ज फेडले गेले नाही तर ती प्रॉपर्टी विकून बँकेचे पैसे वसूल होवू शकत नाही कारण मुळातच त्याच्या वर असलेले कर्ज खऱ्या मूल्य पेक्षा खूप जास्त असते (एक उदाहरण म्हणून घावे)

आज आपण ज्या वस्तू रोजच्या जीवनात वापरतो त्याचे उत्पादन यंत्राचा वापर करून केलेला आहे . कोणती वस्तू स्वस्त आहे बाईक चा विचार केला तर तिची कमीत कमी किंमत ६०००० आहे . तिचे उत्पादन मूल्य किती असेल २५००० रुपये . मग हा जो फरक आहे तो फायदा म्हणून मोजला जातो . आणि तो फायदा मधल्या साखळीत कमी प्रमाणात विभागला जातो आणि उत्पादन करणाऱ्या ला जास्त प्रमाणात मिळतो एकच व्यक्ती कडे साधनसंपत्तीचा खूप मोठा हिस्सा जातो . आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणून काही ठराविक लोकांकडे खूप मोठी संपत्ती जमा झाली आहे . उत्पादन खर्च वाढतो म्हणून कामगार नकोत हे कारण पटत नाही .२० percent होणारा फायदा ४० percent झाला पाहिजे म्हणून कामगर नकोत हे खरे कारण आहे असेच मला वाटत

In reply to by Rajesh188

हा मुद्दा / विचार अयोग्य नाही. पण केवळ कामगारांचा पगार हाच उत्पादनखर्च वाढण्यामागचा घटक नाही. उत्पादकता, वेग, volume, अचूकता, प्रमाणितपणा अशा अनेक गोष्टींनी उत्पादन घेण्यातली किफायत ठरते. दोन टोकं आहेत , दोन्ही टोकाच्या परिस्थिती सदोषच. दोरीवर तोल सांभाळत कसरत करत पुढे जावं लागतं. उजवीकडे तोल जावो किंवा डावीकडे .. कपाळमोक्ष होणारच. शेवटचा विचार, श्रेय : श्री. राजीव साने (युगांतर पुस्तकाचे लेखक)

In reply to by Rajesh188

संपत्तीचे वाटप हा सामाजिक, नैतिक. राजकीय प्रष्ण आहे अर्थशास्त्रीय नाही . एका कडे संपत्ती जमा होते याचे कारण नुसते भांडवल नाही , तर उद्यमशीलता , महत्वाकांक्षा , कल्पकता , संशीधकता व बुद्धी हे ही त्यात येतात . हे सारे गुण एकत्रीतपणे समाजाकडे म्हणजेच सरकारकडे असतील तर अंबानी ,बजाज यांची गरज नाही . पण असे सरकार निदान लोकशाहीत तरी अस्तित्वात नसते.

एक सोनोग्राफिस्ट सांगत होते काही वर्षात अल्ट्रा सोनो ग्राफी रोबोच करेल. त्याला निर्दोष शरीर रचनेचे काही शेकडा फोटो पुरविण्यात येतील व तो सर्व स्वतः: करून रिपोर्ट देखील प्रिंट करेल.

मध्ये काही वर्षा पूर्वी एक बातमी होती मायक्रोसॉफ्ट ला तिचे पाय windows saftware साठी एका विशिष्ट सॉफ्टवेअर( किंवा हार्डवेअर) गरज लागायची आणि ते दुसरी कंपनी पुरवायची पण तेच मायक्रोसॉफ्ट नी फुकट द्यायला survat केली त्यामुळे ती दुसरी कंपनी बंद झाली . आणि केस कोर्टात गेल्यावर मायक्रोसॉफ्ट ला दोषी ठरवून मोठा दंड भरावा लागला ही मनोवृत्ती काय दर्शवते . खूप लोकांना आठवत असेल पाहिले जागोजागी गाड्यांना रंग देण्याची garage होती. कारण ठराविक वर्षांनी गाडीचा रंग उडायचं आणि त्या मुळे रंग देण्याचा रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण झाला होता . आता गाड्यांचे रंग उडतच नाहीत त्या मुळे हा रोजगार बंद झाला ही सुद्धा जी मनोवृत्ती car उत्पादक कंपनीच्या द्वारे दाखवली गेली त्याच्या पाठीमागे असलेले कारण मायक्रोसॉफ्ट chya उदाहरणातील कारण एकच आहे . मी सर्वात मोठा takatwan व्यक्ती झालो पाहिजे . आणि ह्या मुळे बऱ्याच क्षेत्रात स्वयं रोजगार निर्मिती बंद झाली आहे . मोठ्या कंपन्या पैसे chya जोरावर एकाधिकार शाही गाजवत आहेत

कारण ठराविक वर्षांनी गाडीचा रंग उडायचं आणि त्या मुळे रंग देण्याचा रोजगार स्थानिक पातळीवर निर्माण झाला होता . आता गाड्यांचे रंग उडतच नाहीत त्या मुळे हा रोजगार बंद झाला ही सुद्धा जी मनोवृत्ती car उत्पादक कंपनीच्या द्वारे दाखवली गेली त्याच्या पाठीमागे असलेले कारण मायक्रोसॉफ्ट chya उदाहरणातील कारण एकच आहे .
म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय ? कारचे रंग उडत रहायला हवेत ? रोजगार निर्मिती व्हावी म्हणून मुद्दम कमी दर्जाची उत्पादने बनवून विकावीत ? काहीही हं राजेश :)

Automation चे बरे (चांगले, स्वस्त उत्पादन) वाईट (रोजगार जाणे) परिणाम आहेतच पण टोकाचे Automation एकदम एका टप्प्यात होवू शकणार नाही. अनेक कंपन्यांकडे त्याकरिता लागणारे भांडवल नसेल तर ज्यांच्याकडे असेल त्याही खप , बाजारातली स्थिती याचा अंदाज घेत सावध पावले टाकतील. driver less car तर २०३० पर्यंत भारतासारख्या देशात रस्त्यांवर अवतरतील हे अशक्य वाटते. विमानाच्या पायलटला जरी Automation ने replace केले तरी खूप झाले. पायलटचा पगार प्रचंड असतो..

ऑटोमेशन मुळे रोजगार जातीलच असे पण नाही . फक्त हे कोलीत माकडाच्या हातात नसावे. घरात किंवा ऑफिस मध्ये विजेचे दिवे,साऊंड सिस्टीम,पडदे बंद किवा चालू करण्यासाठी मोठ्या शहरात ऑटोमेशन चा वापर केला जातो. ऑटोमेशन करणाऱ्या कंपनीचं app mobile वर डाउनलोड करून त्या मार्फत तुम्ही घरातील विजेचे दिवे,साऊंड system , पडदे ह्या मोबाईल मार्फत नियंत्रण ठेवू शकता . फक्त ह्या कामासाठी नोकरी कधीच उपलब्ध नव्हती . पण ऑटोमेशन मुळे रोजगार निर्मिती झाली . System installation साठी ,ती repair करण्यासाठी माणसाची गरज लागली . म्हणजे ज्या क्षेत्रात रोजगार च नव्हतं तिथे रोजगार निर्माण झाले असे सुधा होवू शकत ऑटोमेशन मुळे रोजगार कमी न होता रोजगार चा प्रकार बदलू शकतो

प्रश्न: अधिकाधिक यांत्रिकीकरणामुळे मानवाला रोजगार शिल्लक राहील का? उत्तर: नक्कीच राहील, एवढेच नव्हे तर रोजगार वाढतच जाईल. दोन प्रकारे या उत्तराचे स्पष्टीकरण देता येईल - १. ऐतिहासिक दृष्टीने - ज्या दिवशी मानवाने पहिला दगड उचलून प्राण्याची शिकार केली त्या दिवसापासून खरंतर यांत्रिकीकरणाला सुरुवात झालीे. तेव्हापासून आजवर, आर्थिक मंदीच्या काही क्षणभंगुर लाटा वगळता मानवी रोजगाराला मागणी सतत वाढतच राहिली आहे. अर्थात अपेक्षित स्किल-सेट अधिकाधिक वेगाने बदलत राहिलेला आहे ही बाब वेगळी. २. तार्किक दृष्टीने - वेगवेगळ्या देशांची सरकारे आणि खाजगी कंपन्या या, सध्याच्या जगातील सर्वशक्तिमान entities आहेत आणि त्या लोकांच्या पैशांवर चालतात. लोकांना रोजगार नसेल आणि पर्यायाने त्यांच्याजवळ पैसा नसेल तर ते कर भरु शकणार नाहीत आणि वस्तू सेवा विकत घेऊ शकणार नाहीत; पर्यायाने अनुक्रमे सरकारे आणि कंपन्या बंद पडतील. त्यामुळे रोजगारविहीन समाज अशी परिस्थिती या दोन्हीही entities (सर्वशक्तिमान असल्यामुळे) येऊ देणार नाहीत.

In reply to by वामन देशमुख

Afterthought - कदाचित असंही होईल, रोजगार-विहीन लोकांना निरुपयोगी ठरवून नष्ट केले जाईल. ... पण आजवर असं कधी झालंय का?

यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत अर्थात हे सर्व हे यांत्रिकीकरण कोणत्या समाजात ( देशात) आणि कोणत्या क्षेत्रात घडत आहे यावर अवलंबून नाही का? सर्वांसकट ( ब्लॅंकेट स्टेटमेनेट) करणे कितीपत योग्य आहे? कोणता देश / समाज असा जर विचार केला तर : सर्वसाधारण ढोबळ मानाने असे म्हणता येईल कि जिथे अति लोकसंख्या आणि गरीबी असे दोन्ही आहे तिथे यांत्रिकीकरणाचा त्रास जास्त होणार, कितीतरी उदाहरणार्थ : इमारतीकचे स्लॅब करण्यासाठी घमेलं आणि बांबू च्या शिड्या ( SCAFOLDING ) वापरून शेकडोंनी रोजगार कि काँक्रिट पंप वापरून थोड्यांना रोजगार? विटा भट्टीतून विटा पॅलेट वरून वाहतूक करून न्यायाच्या कि अख्खा ट्रक मजुरांनी नि डॉक्व्यावरून वाहवायच्या? काही ठिकाणी यांत्रिकरण हा उत्तम पर्याय असतो पण काही ठिकाणी नाही प्रगत देशात बहू उत्पादन क्षेत्रात ( मास प्रोडूकशन ) एखाद्या गोष्टीला चकचकीत पणा आणण्यासाठी ते हाताने घासावे लागते त्याला ताशी मनुष्यबळ दराने करायचे तर परवडणार नाही पण असे पोलिश करायचे मात्र स्थानिक च मग करणार कसे? [अर्देशातून अख्खा सुटत बग आणणे काही कारणाने शक्य नाहीये असे असेल तर? उदाहरण : - दरवाजाचे हॅण्डल; ( मूठ) झिंक ओतणे ( डाय कास्टिंग )> त्याचे मशीनिंग करणे > त्याला पॉलिशिंग करणे आणि त्याला मुलामा ( प्लेटिंग ) प्लांट च्या रॅक वर लावणे हे सर्व विविध रोबो वापरून केले जाते, - परंतु या डाय कास्टिंग चा जो साचा असतो त्याला आतून जो ठराविक दर्जाचा चकचकीत पणा लागतो तिथे विविध प्रकारच्या पोलिश कागद आणि फाईल वापरवाय लागतो त्याचे यांत्रिकरण अजून अवघड आहे तिथे टूल मेकरच लागतो. यांत्रिकीकरण अर्थात हे काही फक्त उत्पादन क्षेत्रात च आहे असे नाही , वैद्यकीय , रचना ( DESIGN ) क्षेत्रात हि होत आहे एक मित्र यूरोपात अति उच्च ( फेरारी, एरबस, मर्सिडिस ) वगैरे लोकांबरोबर काम करतो, मेकॅनिकल DESIGN मध्ये , गाडीच्या वायपर कुठे असावा याचे नियम हे गोळा करून त्या "निर्णयाचे" यांत्रिकरण केले आहे, अशी अनेक उदाहरणे आहेत आधी लोकांनी यावर केलेली सर्व चर्चा रोचक आहे ,

In reply to by चौकस२१२

एका अंदाजानुसार ( आत्ता नक्की संदर्भ देता येत नाही ) २१३० पर्यंत जगातील ४० टकके लॊकांना आपला जॉब गमवावा लागेल ! माझ्या मते अमेरिका फर्स्ट ही त्याची एक सुरुवात आहे . ब्रिटन ला बाहेर पडायचे आहे याचा संबंध सर्व्हायव्हल शी असू शकेल . १९४० ते २०१० या काळात अनेक लोक हे फक्त कारकुनी स्वरूपाची कामे करीत होते. त्या पैकी अनेक जागा आता भरल्या जाणारच नाहीत . अर्थात संगणक आल्यावर स्टेशनरी , प्रिंटर यांचा व्यवसाय निर्माण झाला असे प्रत्येक क्षेत्रात होऊन काही प्रमाणात रोजगाराची शक्यता चालू राहिलच यात शंका नाही . त्यामुळे यांत्रिकीकरणामुळे नोकऱ्या जातील किंवा अजिबात जाणार नाहीत हि दोन टोकं शक्य नाहीत या तुमच्या विधानाला मी दाद देतो. धान्य महाग झाले तर मासेमारी जोरात येईल व अन्नास पर्याय उत्पन्न होईल असेही काहीतरी घडेल . आपण म्हणता त्यानुसार बेकारीची कुऱ्हाड ही कोणत्या देशावर पडेल हे ही महत्वाचे आहेच . जिथे लोकसंख्या बेसुमार आहे तिथे लोकांना कमी मुले निर्माण करणे किंवा परदेशी स्थलांतर करणे एवढेच उपाय राहातील . पैकी परदेशी नागरिकत्व मिळविणे म्हणजे काही मेथीची भाजी आणणे नव्हे . आता विकसनशील देशानाही यांत्रिक प्रगती पासून फारकत घेऊन मुद्धामहोऊन रोजगार टिकविणे सर्रास शक्य होणार नाही . वाढत्या लोकसंख्या च्या हिशेबाने जरी भारतात ए टी एम आली असली तरी त्यात काही आर्थिक फायदा आहे की नाही हे बँकेचे कॉस्टिंग तपासून पाहिले जाईलच . एकूणात कॉस्ट अकौंटन्सीचा जोर सर्व ठिकाणी राहाणार . त्याचा परिमाण रोजगारावर होणार .

एक माणूस फॅक्टरी असू नाही तर ऑफिस विविध प्रकारची कामे करू शकतो . तो साफसफाई करू शकतो ,ड्रायव्हिंग सुधा करू शकतो,computer var kam sudha Karu शकतो. पण ही सर्व काम करायला विविध प्रकारची यंत्रे लागतील. माणूस हा विविध काम करण्या बाबत रोबोट chya खूप पुढे आहे . हे माणसाचे बलस्थान च आहे

बर्याच दिवसांनी एक सकस चर्चा झाली. सर्वांनी खूप चांगले मुद्दे मांडले अाहेत. हा विषय युवाल हरारीच्या होमो ड्युअाॅस या पुस्तकात अतिशय सर्वंकषपणे मांडलेला अाहे. त्यात त्याने एक ‘यूसलेस’ क्लास तयार होईल अशी शक्यता वर्तवली अाहे. अायुष्याचा अर्थ काय? हे नव्या पिढीला सतत शोधत रहावे लागेल. तत्वज्ञान हा विषय अात्तापर्यंत खूप लोकांनी अाॅप्शनला टाकला होता, तो महत्वाचा ठरू शकेल असे तो म्हणतो. अत्यंत वाचनीय पुस्तक.

यांत्रिकी करण हे मानवी सुखासाठी आहे . पण त्या मुळे यंत्र माणसालाच replace Karu लागली तर मानव जातीचा फायदा न होता खूप मोठा तोटा होईल . ही अस्वस्थ लोक बाकी संपन्न लोकांना सुखाने जगू देणार नाहीत . त्या साठी गरीब हटाव ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यात बेरोजगार गरीब जिंकेल की यांत्रिकारण चे समर्धक जिंकतील हे काळच ठरवेल. यांत्रिकी कारण पर्यावरणाची नक्कीच हानी करेल. निसर्ग ग्रीन हाऊस gas chya दुष्परिणाम मुळे मानव वर संकटाची अनेक प्रसंग आणेल . आणि त्या पुढे मानव कधीच जिंकू शकणार नाही. किती ही प्रगत झाले तरी ऑक्सिजन,पाणी, अन्न हैच मूलभूत गरजा असतील . आणि त्या गरजा पूर्ण होण्यासाठी निसर्ग शिवाय कोणताच मार्ग नसेल . दलदली मध्ये माणूस जेवढं बाहेर निघायचं प्रयत्न करतो तेवढं जास्त तो दलदली त फसतो अशी अवस्था माणसाची होईल . विविध रोग, व्हायरस चे आक्रमण,असे विविध अडचणी येतील . त्या मुळे enough is enough ase समजून वाटचाल करायला हवी

संस्था निकृष्ट म्हणणे जनरलायझेशन होईल. “Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference.” हे शिकवल पाहिजे, कुणाचाही असा जिव जाणं.....

इतक्या मोठ्या संस्थेत पोहोचू शकलास, लाखात एक संधी मिळाली, आईबापांनी खूप खस्ता खाल्ल्यात, आता सर्व आशा तुझ्यावर आहेत... परतीचे दोर कापलेत, ... ऊर्फ इथून पुढे हरण्याचा , कमी पडण्याचा ऑप्शन तुला शिल्लकच नाही.. अशा परिस्थितीची इतकी खात्री मनोमन पटली असावी की पूर्ण एकटा पडून हाराकीरी केली असावी. इंग्रजी बातमीत दिलेल्या मजकुरानुसार हेच जाणवतं. इतकी भारी संस्था, इतके भारी लोक इ इ. म्हणजे असं सर्व असूनही मी घरच्यांना यश देऊ शकलो नाही अशी अपराधी भावना जाणवते. इतर साध्या कॉलेजपेक्षा आय आय टी वगैरे संस्थेत त्या संस्थेच्या नावाच्या दबदब्यामुळे हे ओझं "पॉईंट ऑफ नो रिटर्न"ला पोचत असावं. अनेक मेडिकल स्टुडंट्सबाबतही असं जाणवतं बातम्या वाचून.

मुळात कोणतीही activity न करता, काय करू, सांगाल ते करतो असे म्हणणारे बरेच आहेत, पण प्रत्यक्षात काम करतांना मनलावुन किंवा चिकाटीचा खुप अभाव असतो.... असो आश्या तरूणांना एकच सल्ला देतो, जे काम त्यांना आवडतं त्या कामाची सखोलं माहिती घ्यावी त्याच मास्टर की मिळवावी (pg degree नव्हे ......निपुनता) , मग त्यासाठी जेथे जावे लागेल तेथे जावे, then after money will start following him सध्या इतकचं