Skip to main content

(व्हिस्की पिऊन आलो...)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 29/06/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.

प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून

भेटावयास गेलो,
करून काय आलो ?
बोलावलेत तुम्ही,
व्हिस्की पिऊन आलो...

ना थेंब दिला सोड्याचा
चखना फुकट दिला...
पाण्या सवेत केवळ,
व्हिस्की पिऊन आलो...

होते मित्र चार आणि...
नव्हती कुणीही रमणी,
बायकोस हे पटेना...
व्हिस्की पिऊन आलो...

प्याले जरी रिचवले...
एका मागोमाग आठ,
उलटी होऊ न देता...
व्हिस्की पिऊन आलो...

लेखनविषय:

वाचने 4801
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

भले !!
आठ पेग्ज, भलताच स्टॅमिना दिसतोय तुमचा झब्बू राव

आणि

नव्हती कुणीही रमणी,
बायकोस हे पटेना...

हे मात्र अगदी पटलं :)

नंतर गाडी चालवत नाही ना घरी गेलात?
ड्रिंक रिस्पॉन्सिब्ली, ड्राइव्ह सोबर.

रच्याकने - बिअर पिउन यायचा विचार होता परंतु आता नकोच.


In reply to by चामुंडराय

कसला स्टॅमिना साहेब! दोन तीन पेगातच बोबडी वळते स्वारीची. विडंबनात कसे कल्पनेचे पतंग कितीपण बदवता येतात, म्हणून दिली ढील :-))


खालच्या कवितेत जरा लैच "झालो" "गेलो", "आलो", आहे. पण दर्दी लोक्स सांभाळून घेतील अशी आशा आहे.

जेडी घ्यायला गेलो
शिवास(ही) घेउन आलो
८पीएम वाजता मी
बॅगपायपर वाजवत गेलो

जॉनी वॉकर प्यायलो
अन डीएसपी झालो
ग्लीन फिडीश पिउन मी
मंकी शोल्डरवर बसलो

पॉल जॉन ला भेटलो
अन नं १ झालो
रॉयल स्टॅग मागे फिरत
व्हाईट वॉकर झालो

ईंपिरीयल ब्लू ल्यालो
ऑफिसर चॉइस झालो
ब्लॅक डॉग सवे धावताना
ओल्ड टेव्हर्न ला हादडून आलो

टीपः- उल्लेख न केलेल्या हुस्क्या आम्हास आवडत नाहीत असा कृप्या कोणी गैरसमज करुन घेउ नये, आमचा सर्वधर्मसमभावावर अतिव विश्र्वास आहे ;) :) :)

पैजारबुवा,


In reply to by ज्ञानोबाचे पैजार

वाह पैजार बुवा
मौके पे चौका (विडंबन आणि प्रतिसाद) आवडला .

व्हिस्की प्रेमी- टर्मीनेटर


कशाला क्षमा,आम्हीच जुन्या इमारतीची प्रतिकृती बनवून क्षीण प्रयत्न केला आहे.
बाकी पाउसकाळ्यात आणि श्रावणाच्या अगोदर ही कविता आणि पै बुवांच्या प्रतिसाद हा दुग्धशर्करा माफ करा उच्च मदिरा योग समजावा काय.

कोरडाठाक नाखु पांढरपेशा