कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?
मंदार भौंचा बाजार आमटीवाला धागा पाह्यला आणि डोक्यात किडा वळवळला बघा.
तुम्हाला कधी अस होत का कि लयी कंटाळा आलाय आणि घरात असलेल काहीच खावस वाटत नाही ? मला तर खुपदा होत अस.
मग काहीतरी झोलझाल करून मी नाही नाही ते खात बसतो, शाकाहारी असल्यामूळ थोडी मर्यादा येते पण काय हरकत नाही.
१) शिळा भात असला आणि तो थोडासा मोकळा असला कि त्यावर कच्च तेल टाकून + आपल्याला झेपेल इतके लाल तिखट + मीठ टाकून मस्त हाणतो, सर्दी झाली असल तर नाक मोकळ होत आणि तोंडाला चवही येते.
२) वरचाच प्रकार थोडा मोल्ड करून पोह्याला वापरायचा त्यात आवडत असल तर घरचे घट्ट दही टाकायचे कधी कधी + कोथमिर मारायची थोडी वरून. मस्त लागतंय.
३) टोमाटो भात - खूप पूर्वी आमच्याकडे एक बिगारी काम करणारी यायची (घरकामाला)पण बघता बघता आमची इतकी गट्टी झाली कि मला तीन भाऊच करून टाकला मग तिच्या माग माग कधीतरी तिच्या झोपडीत जाऊन काय काय खायचो मी ती पण प्रेमान खायला घालायची. तर तिथ त्या लोकांचा टोमाटो भात मी पाहिला आणि खाल्ला होता साधा आणि सिम्पल पण चवीला बिर्याणी बिर्याणी बिर्याणी (द अंग्रेज ची आठवण आली) च्या तोडीचा.
टम्बाटी भात :-
१ मिडीयम वाटी तांदूळ घ्या तो धुऊन निथळत ठेवा
३ मोठे टोमाटो घ्या आणि त्याचे मोठे काप करा तसेच मिडीयम २ बटाटे सालासकट घेऊन त्याचे हि मोठे काप करायचे.
पातेलीत थोडे सढळ हस्ते (मानवेल इतके) तेल घेऊन त्यात आधी सालासकट खरपूस बटाटे परतून घ्यायचे नंतर त्यात टोमाटो घालून परतून घ्यायचे नंतर झेपेल इतके तिखट + चवीला मीठ टाकून ते मिश्रण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
आता आपला निथळत ठेवलेला तांदूळ यात टाकून २ मीन परतून घ्या आणि अंदाजाने पाणी टाकून (कोमट पाणी नायतर गार पाण्याने चव बिघडते) शिजत ठेवा.
काही वेळाने तुमचा साधा, सिम्पल टोमाटो भात तयार.
टीप - याला फोडणी लावू नये / कोथिंबीर टाकू नये/ मसाला वापरू नये
--------------------------------------
तुम्ही कंटाळा आला तर काय अतरंगी खाता ते जरूर सांगा.
याद्या
33412
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
इतकी छानृ पाककृती.
हल्ली फोटोविना पाकृ टाकायची
म्हात्रे सर, जल्ला मेला कसली
In reply to हल्ली फोटोविना पाकृ टाकायची by डॉ सुहास म्हात्रे
करुन पाहायला हवा.
तिखटाऐवजी कांदा लसूण मसाला घालूनही
In reply to करुन पाहायला हवा. by गवि
हीच भारी लागतं. असं माझं वैयक्तिक मत आहे.माझे दोन पैसे
दहिपोहे
In reply to माझे दोन पैसे by तुषार काळभोर
मसाला पोहे
In reply to दहिपोहे by अभ्या..
फ्रँकी
In reply to मसाला पोहे by अभ्या..
दहीपोहे
In reply to फ्रँकी by अभ्या..
अभयराव, हा तर कासेडिया !
In reply to फ्रँकी by अभ्या..
कासेडिया
In reply to अभयराव, हा तर कासेडिया ! by चामुंडराय
हे तर गुज्जू आडनाव वाटतेय... हा हा हा .. आधी हे लक्षात नाही आले.
In reply to कासेडिया by अभ्या..
नाचणीच्या पिठाच्या झटपट
अरे वाह स्नेहा ताई करून
In reply to नाचणीच्या पिठाच्या झटपट by सस्नेह
मस्त रेसिपी. नक्की करून बघणार
इंटरेस्टिंग आहे टोमॅटो भाताची रेसिपी.
मला कंटाळा आला कि मी घरी
सगळ्याचाच कंटाळा आला असेल तर
आता कल्याणभेळ मधला गांधी टोपी
In reply to सगळ्याचाच कंटाळा आला असेल तर by अमर विश्वास
पाणीपुरी बद्दल लाखवेळा सहमत.
In reply to सगळ्याचाच कंटाळा आला असेल तर by अमर विश्वास
अगदी सहमत
मुळात हे पाणीपुरी व्रत जर नियमपणे केलं तर कंटाळा तुमच्यापासून दूर राहतो+1हा प्रश्न पुरुष मंडळी साठी असेल तर
हा प्रश्न पुरुष मंडळी साठी असेल तर
टोमॅटो भात केला होता अगदी वर
भेळ. फार काही चटण्या वगैरे पण
अगदी अगदी
In reply to भेळ. फार काही चटण्या वगैरे पण by यशोधरा
गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे खायला मजा येते. किंवा पोळी( चपाती) चा चिवडा. मोहरी, कांद्याची फोडणी करून पोळीचे बारीक तुकडे करून परतायचे आणि वरून थोडी कोथींबीर.हे दोन्ही प्रकार लैच आवडीचे.पोळी( चपाती) चा चिवडा. मोहरी,
In reply to अगदी अगदी by श्वेता२४
गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे
खारीतली पिळखारी (तो बो सारखा
In reply to गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे by तुषार काळभोर
पीळखारी
In reply to खारीतली पिळखारी (तो बो सारखा by अभ्या..
खरेच की पैलवान भाऊ! ते बटर
In reply to गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे by तुषार काळभोर
गाय छाप.
हाहा
In reply to गाय छाप. by नावातकायआहे
सुपर्ब
In reply to गाय छाप. by नावातकायआहे
बटाटा किसून, पाण्यातून काढून
खान्देशच्या बिबड्या
धापोडे..
In reply to खान्देशच्या बिबड्या by गोरगावलेकर
धन्यवाद. नवीन नाव कळले.
In reply to धापोडे.. by चिगो
धान्याचा चिक काढणे
In reply to खान्देशच्या बिबड्या by गोरगावलेकर
मेहनत करायची तयारी असली तरी
In reply to धान्याचा चिक काढणे by Rajesh188
झटपट चीज ( ओपन ग्रिल )
हल्ली चायनीज मसाला मिळायला
शिळ्या भाकरीवर तिखट आणि वर
In reply to हल्ली चायनीज मसाला मिळायला by उपेक्षित
हो. मलाही खूप आवडते. चटणी,
भाकरी मात्र ज्वारीची हवी. गरम
In reply to हो. मलाही खूप आवडते. चटणी, by गोरगावलेकर
@ गोरगावलेकर तुमच्या सोबत
In reply to भाकरी मात्र ज्वारीची हवी. गरम by गोरगावलेकर
देवी आहेत त्या. :)
In reply to @ गोरगावलेकर तुमच्या सोबत by उपेक्षित
अर्रर गल्ली चुकली म्हणायची
In reply to देवी आहेत त्या. :) by यशोधरा
@उपेक्षित
In reply to अर्रर गल्ली चुकली म्हणायची by उपेक्षित
आकबर आनी बिर्बल
कंटाळा आल्यावर घरच्या घरी
जवळ जवळ ६ वर्षांनंतर मिसळपाव
हल्ली कुरमुरे खातो.
मी सुद्धा मुरमुरे हल्दीरामच्या आलू भुजिया बरोबर खातो
In reply to हल्ली कुरमुरे खातो. by कंजूस
अधुन मधून
In reply to हल्ली कुरमुरे खातो. by कंजूस
गरमगरम मेतकुटभात
गूळ शेंगदाणे
पॉपकॉर्न