Skip to main content

डोह-१

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 23/06/2019 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
घनतमात पसरला ऐसा कभिन्न काळा देही आ वासून गगना पाही ... डोहकाळीमा डोहकाळिमा श्रांत क्लांत पांथस्थाला दो घोट जलाचे देई आयुष्य मागुनि घेई ..... डोहकाळीमा डोहकाळिमा किती प्रश्न चिरंतन साचे घेऊन उरावर जगणे निरखत हा तगमगणे... डोहकाळीमा डोहकाळीमा पैलतीर ना माहित कुठून कैसा दिसतो फुटता होडी गिळतो .... डोहकाळीमा डोहकाळीमा चिरंतन काजळ काळे सत्य भयाण कि भास हा वेटाळी सर्वांस ..... डोहकाळीमा डोहकाळीमा ©सागरलहरी
लेखनविषय:

वाचने 1581
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

क्या बात!! खोल आहे.