'लकडी की काठी काठी काठी का घोडा' हे गाणं न ऐकलेला माणूस विरळाच म्हणावा लागेल. लहानपणी रविवारी रंगोली मध्ये कित्येक वेळा हे गाणं ऐकलं होतं. तेव्हा त्यातलं त्यात उर्मिला मातोंडकर आणि 'घर से निकलते हि वाला' जुगल हंसराज होता इतकंच काय ते त्या गाण्याचं कौतुक होतं आणि विषय तिथेच संपत होता.
कट टू : करंट जिंदगी
गेले कित्येक दिवस 'मासुम' पहायचं डोक्यात होतं, पण कधी वेळ जमत नव्हती तर कधी अर्धवट पाहिल्या जात होता. सरतेशेवटी काल योग जुळून आला. १९८३ मध्ये आलेला मासुम 'शेखर कपूर' चा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. आज शेखर कपूर 'बँडिट क्वीन' साठी ओळखला जात असला, तरी पहिल्याच चित्रपटात त्याने जो मास्टर स्ट्रोक मारला आहे तो अप्रतिम आहे.
नासीर आणि शबानाचा सुखी संसार, त्यात नसरुद्दीन आणि सुप्रिया पाठक यांच्या प्रेमप्रकरणातून जन्मला आलेला 'राहुल'. त्यामुळे त्यांच्या संसारात आलेलं वादळ, लहानग्या राहुलची आपले वडील शोधण्यासाठीची तडफड, आपला मुलगा समोर असूनही त्याला स्वीकारता येत नसल्याची नासिरची अगतिकता सारं सारं काही शेखर कपूर ने अत्यंत सुबकपणे रेखाटलं आहे. मासुम मध्ये शबाना आझमी ,नसरुद्दीन शहा सारखी तगडी स्टारकास्ट तर आहेच पण या बरोबर गुलजारजींचे अवीट गोड शब्द आणि आर डी चं भावपूर्ण संगीत आहे.
'तुझसे नाराज नही जिंदगी' मध्ये नासिरच्या डोळ्यांत दिसणारी व्याकुळता एखाद्या वडिलांनाच जाणवू शकेल.
'हुजूर इस कदर भी ना इतरा के चलीए' मधली भुपींदर आणि सुरेश वाडकर यांची जुगलबंदी जबरदस्त आहे. या गाण्यातले शब्द प्रभावी म्हणा अथवा गाणाऱ्या आवाजाची कमाल म्हणा, जेव्हा केव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा जसच्या तसं डोळ्यसमोर उभं राहतं !
'दो नैना इक कहानी' मधला आईच्या आठवणींमध्ये तळमळणारा, अलिप्त राहणारा जुगल पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतात. अंगाईच्या जवळपास जाणारं हे गाणं मला कायमच प्रचंड अस्वस्थ करतं.
मासुम वर किती जरी लिहिलं तरी तो स्वतः पाहिल्याशिवाय ते पटणं अवघड आहे. तेव्हा एकदा पहावाच असा चित्रपट.
वाचने
3221
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
जुगल हंसराजच्या ताकतवान अभिनयाने
माझा अत्यंत आवडता चित्रपट
+१.
फारच त्रोटक लिहिले आहे...
बुवा अजून दोन चित्रपट येतायेत
In reply to फारच त्रोटक लिहिले आहे... by ज्ञानोबाचे पैजार
खूप आवडला
In reply to बुवा अजून दोन चित्रपट येतायेत by महासंग्राम
+1
In reply to फारच त्रोटक लिहिले आहे... by ज्ञानोबाचे पैजार
हा चांगला लेख.