ट्वेन्टी इयर्स ऑफ सरफरोश....फिफ्टीन इयर्स ऑफ लक्ष्य वगैरे ट्रेंड सुरु आहेत.
पण ट्वेंटी इयर्स ऑफ 'धांगडधिंगा' विषयी कोणी काहीच कसं बोलत नाहीये !
९९ साली आलेल्या ह्या सिनेमाची जाहिरात 'टायटॅनिकला मराठी उत्तर' अशी करण्यात आली होती.
टायटॅनिकमध्ये शेवटी लाकडी फलटीवर पुरेशी जागा असतानाही जॅकने मरण का स्वीकारले ह्याचे उत्तर हा सिनेमा बघितल्यावर मिळते.
धांगडधिंगा सिनेमाची कथा कोर्टाच्या पार्श्वभूमीवर घडते. टायटॅनिक जहाजातून वाचलेल्या सातशे प्रवाश्यांनी धांगडधिंगा बघितल्यावर, आम्हाला का वाचवले म्हणून जहाजाच्या कॅप्टनवर त्याच कोर्टात केस केली होती म्हणे. एवढंच नाही, टायटॅनिक सिनेमात ती म्हातारी शेवटी गळ्यातला हिऱ्याचा हार समुद्रात फेकते ते आठवतंय का? तर धांगडधिंगा या 'सिनेमॅटिक जेम' समोर गळ्यातल्या हिऱ्याचे काहीच मोल नाही ह्याची पुरती जाणीव तिला झाली होती. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले.
केट विन्स्लेटने तर किशोरीताई आंबीयेंचा डाएट प्लॅन फॉलो करायला सुरवात केली होती. जेम्स कॅमेरूनच्या केबिनमध्ये 'आमचे श्रद्धास्थान' म्हणून आजही महेश कोठारेंचा फोटो आहे. धांगडधिंगाची पटकथा जेम्सने देवघरात ठेवलीये. अवतार सिनेमा करण्याआधी धांगडधिंगाचाच हॉलीवूडी रिमेक करण्याचा प्रस्ताव घेऊन एक निर्माता जेम्सकडे गेला होता. पण 'क्लासिकस् अँड कल्ट्स कॅन नॉट बी रीमेड. अँड धांगडधिंगा इज अ जेम विच शुड ओन्ली बी व्ह्यूड अँड शुड नॉट बी इव्हन टच्ड' असे म्हणून जेम्सने तो प्रस्ताव धुडकावून लावला.धांगडधिंगा हा माझ्या लायर लायर ह्या सिनेमावरून प्रेरित आहे असा आरोप खुद्द जिम कॅरीने केला होता. जेम्सने त्याचा विरोध करत "जिम कॅरीचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला. अवतारच्या पटकथेत जेम्सने महेश कोठारेंची मदत मागितली होती. पण कोठारे त्यावेळी 'जबरदस्त' या सायन्स फिक्शनच्या कामात बिझी असल्याने ते होऊ शकले नाही.
तरी नशीब धांगडधिंगा सिनेमात महागुरू नव्हते. नाहीतर लियोनार्डो डिकार्पियोने त्यांची दीक्षा घेण्यासाठी भारतात स्थलांतर केले असते. धांगडधिंगात महागुरुंचे नसणे आणि म्हणूनच लियोनार्डोने त्यांना फॉलो न करणे हेच त्याला ऑस्कर मिळण्यासाठी इतकी वर्ष थांबावे लागण्याचे कारण आहे.
इतके अनन्यसाधारण महत्त्व असलेला धांगडधिंगा !
ह्या सिनेमाला अनुल्लेखाने मारल्याबद्दल तमाम सिनेरसिक,विश्लेषक, समीक्षक आणि लेखक ह्यांचा जाहीर निषेध !
चिनार
वाचने
30261
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा हा
मला आवडलेले काही चित्रपट यात दिसत नाहीत.
In reply to हा हा हा हा by श्वेता२४
मिठारे खोटारे आठवून धमाल आली.
हा चित्रपट कुठेही ऑनलाईन मिळत
In reply to मिठारे खोटारे आठवून धमाल आली. by गवि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पहले ताे कभी कभी ग़म था... :- Altaf Rajaधन्यवाद मबाशेठ..
In reply to हा चित्रपट कुठेही ऑनलाईन मिळत by मदनबाण
मला आज
भिकार
खरंच काही सिनेमा विषयी आपण
हाहाहा
मस्तच
जमलंय!
झी५ वर उपलब्ध आहे...
हायला भारी!
एकेकाळी मराठी चित्रपटांची
सासरचे धोतर
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
बायको चुकली स्टँडवर
In reply to सासरचे धोतर by समीरसूर
खूप कमी...
In reply to बायको चुकली स्टँडवर by गवि
अलीकडल्या काळातला सर्वात
In reply to खूप कमी... by समीरसूर
मान्य...
In reply to अलीकडल्या काळातला सर्वात by चिनार
मुळशी पॅटर्न मला यथातथाच
In reply to खूप कमी... by समीरसूर
- मुळशी पॅटर्न मला यथातथाच वाटला (टीव्हीवरच पाहिला)..
- सविता दामोदर परांजपे - . हा कसा आहे ?
- काही अपयशी असले तरी चांगले असतात ..
- हम्पी पाहिला आहे का कुणी ? कसा आहे ?
- अलिकडेच पूजा सावंतचा लपाछपी पाहिला (टीव्हीवर) .. अप्रतिम नसला तरी बर्यापैकी चांगला वाटला.
- मांजा चांगला आहे. (सायकोथ्रिलर .. पण भडक होवू दिला नाहीये), हा कधी कधी टीव्हिवर लागतो
- मला काहीच प्रॉब्लेम नाही - चांगला आहे , पण टीव्हीवर लागत नाही कधी.
- YZ - नावावरुन वाटतो तसा पांचट नाही.. बर्यापैकी चांगला आहे - हा पण टीव्हीवर लागत नाही सहसा
- फॅमिली कट्टा - कथा पटली नाही पण उत्कृष्ट अभिनय / संवाद या करिता आवर्जुन पहावा असाच - पण हा कधी टीव्हीवर लागल्याचं आठवंत नाही.
- याउलट फर्जंद - यशस्वी पण अगदी फसलेला वाटला
- आपला मानूस - यशस्वी आहे आणि आवडलाही
झी टॉकिज आणि फक्त मराठी हे दोन्ही चॅनेल्स तेच तेच चित्रपट लावत राहतात .. वेगळं काही पोहोचंतच नाही रसिकांपर्यंत .. नेटवरही लवकर मिळत नाहीत त्यामुळे मराठी चित्रपटाची जी प्रतिमा रसिकांच्या मनात निर्माण झाली आहे त्याला हे चॅनेलवाले पण जबाबदार आहेत असं मी म्हणेन कारण अखेर प्रेक्षक काही प्रत्येक चित्रपट थिएटरला जावून बघत नाही. तसेच चित्रपटाचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्यांनी युट्यूबवरही ते चित्रपट अपलोड करायला हवेत .. यामुळे जरी त्यांना पैसे मिळणार नाही (युट्युबवरही एखादा व्हिडिओ सशुल्क ठेवता येतो.. पण हा पर्याय मराठी चित्रपटांसाठी सध्या योग्य नाही) पण त्या चित्रपटाची , कलाकाराची एकूणच मराठी चित्रपटांची लोकप्रियता वाढायला मदत होईल .. मार्केट मोठं होवू शकेल .. पण निर्माते हा सगळा विचार करताना दिसत नाहीत.. या निर्मात्यांचं अर्थिक गणित कसं जुळून येतं याबद्दल मला उत्सुकता आहे... असो.मुळशी
In reply to मुळशी पॅटर्न मला यथातथाच by मराठी कथालेखक
मी भोभोचा रेफरन्स द्यायला आलो होतो
In reply to मुळशी by समीरसूर
वारलोय!
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
गायब
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
मी आहे हो...
In reply to गायब by समीरसूर
धुगधुगी
In reply to गायब by समीरसूर
धुमाकूळ
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
अशीच स्टारकास्ट
In reply to धुमाकूळ by अभ्या..
अगदी अगदी.
In reply to अशीच स्टारकास्ट by तुषार काळभोर
ह्या धाग्यावरून youtube वर गेलो
In reply to एकेकाळी मराठी चित्रपटांची by गवि
हा ...हा हा ... लै भारी
In reply to ह्या धाग्यावरून youtube वर गेलो by लंबूटांग
हायला भारी!
देऊळ, रेगे, tcgn हे काही
झाकोळ
In reply to देऊळ, रेगे, tcgn हे काही by गवि
+१
In reply to झाकोळ by गीतांजली टिळक
खोटारे फॅन
+1
In reply to खोटारे फॅन by मित्रहो
बनवाबनवी
In reply to +1 by जॉनविक्क
कोठारे आणि पिळगावकर असे दोन
ह्या दोघांचेही सिनेमे मनोरंजक
In reply to कोठारे आणि पिळगावकर असे दोन by गवि
धांगडधिंगा आणि आयडियाची
In reply to ह्या दोघांचेही सिनेमे मनोरंजक by चिनार
२००२-०३ च्या दरम्यान मराठी
श्वासमुळे मराठी सिनेमा बदलला
In reply to २००२-०३ च्या दरम्यान मराठी by चिनार
सातच्या आत घरात : ओव्हर रेटेड
In reply to श्वासमुळे मराठी सिनेमा बदलला by मराठी कथालेखक
सर्व ठीक आहे परन्तु
In reply to २००२-०३ च्या दरम्यान मराठी by चिनार
काही चांगले मराठी चित्रपट
- बयो
- सुंबरान
- पिपाणी
तर नीळकंठ मास्तर सारखे काही अगदी गंडलेले .. पण गाणी सगळी अप्रतिम इतर चित्रपटात गजर (काहीसा वैचारिक --फारसा मनोरंजक नसला तरी चांगला) मातीच्या चुली मंगलाष्टक वन्समोअरभारी लिहिलय..
चालायचचं !
हा हा
दोनेक वर्षांपूर्वी "चि.व चि
एकापेक्षा एक आणि नवरी मिळे
एव्हड्सं काय ? वांग. त्याला काय ? देठ...