आज मी पुन्हा नापास झालो

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
18 Jun 2019 - 4:47 pm

आज मी पुन्हा नापास झालो

पुढल्या वेळेस नक्की पास होईन

हीच अशा मनी बाळगून

पुन्हा जोमात तयारीला लागलो

मम्मी पप्पा दोघेही घरी

चिंतातुर असतील

मला वाईट वाटू नये

म्हणून हळूच रडत असतील

मी ठरवलंय मनाशी घट्ट

हार मानायची नाही

देत जायचं असेच पेपरवर पेपर

जोपर्यंत नीट कळत नाही

कधीतरी उगवेल सूर्य माझाही

कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप

पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं

तर होईल नको तो ताप

कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही

बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर

फुक्कट घालवणार नाही

माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय

पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा

त्याआधी मला या परीक्षेत पास तरी कर,, देवा

{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}

पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको .. त्यांनी अपयशाकडे दुर्लक्ष करावं हि नम्र विनंती ..

रेखाटनप्रेरणात्मक

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

18 Jun 2019 - 4:57 pm | पद्मावति

आवडली कविता आणि तळटीप टाकण्यामागचं कारणही पटलं .

पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको ..

खरंय :(

पद्मावती तै.. आमच्या इथे एक प्रकरण घडलंय असं .. पण थोडं वेगळं. त्याच्या आईने आत्महत्या केली , मुलगा सारखा नापास होतो म्हणून .. फार वाईट वाटलं .. कधी कधी हा शेजारधर्म, मित्रपरिवार आणि समाज नकोस वाटतो , तो याच कारणासाठी .. काही लोकांना चौकश्या करायचं वेड असत , पण समोरचा त्या कश्या घेईल हे माहित नसत .. त्यामुळे हे अशे प्रकार घडतात .

पद्मावति's picture

18 Jun 2019 - 5:07 pm | पद्मावति

बापरे...फारच दु:खद आहे हे :(

काही लोकांना चौकश्या करायचं वेड असत , पण समोरचा त्या कश्या घेईल हे माहित नसत .. त्यामुळे हे अशे प्रकार घडतात .

खरे आहे.

खिलजि's picture

18 Jun 2019 - 5:08 pm | खिलजि

:( :( :( :(

चावटमेला's picture

18 Jun 2019 - 7:39 pm | चावटमेला

कवितेचा आशय आवडला..