आज मी पुन्हा नापास झालो
पुढल्या वेळेस नक्की पास होईन
हीच अशा मनी बाळगून
पुन्हा जोमात तयारीला लागलो
मम्मी पप्पा दोघेही घरी
चिंतातुर असतील
मला वाईट वाटू नये
म्हणून हळूच रडत असतील
मी ठरवलंय मनाशी घट्ट
हार मानायची नाही
देत जायचं असेच पेपरवर पेपर
जोपर्यंत नीट कळत नाही
कधीतरी उगवेल सूर्य माझाही
कधीतरी असें मीही कुणाचा तरी बाप
पण सालं माझं पोर माझ्यावाणीच निघालं
तर होईल नको तो ताप
कितीही झालं तरी मी माझी विकेट फेकणार नाही
बापाने एवढा पैसा लावलाय माझ्यावर
फुक्कट घालवणार नाही
माहित आहे , मुद्दल वाढत चाललीय
पण एक दिवस , व्याजासकट देईन परतावा
त्याआधी मला या परीक्षेत पास तरी कर,, देवा
{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}
पेपरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचून जीव घाबराघुबरा होतो . सालं हि कोवळी पोर अशी माना टाकायला लागली तर आईबापच काय होत असेल ते विचारच करायला नको .. त्यांनी अपयशाकडे दुर्लक्ष करावं हि नम्र विनंती ..
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5131
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली कविता आणि तळटीप
पद्मावती तै.. आमच्या इथे एक
बापरे...फारच दु:खद आहे हे :(
:( :( :( :(
कवितेचा आशय आवडला..
निखळ स्पर्धा व त्यामागील खिलाडूवृत्तीची जोपासना कशी करावी बरे ?