नवीन सायकल घ्यायची आहे

राहुल करंजे's picture
राहुल करंजे in तंत्रजगत
16 Jun 2019 - 12:53 pm

नमस्कार सर्वांना....
माझे वय 27 आहे, उंची 5फूट 6इंच आहे, वजन 88 किलो आहे, धावपळीच्या आयुष्यात शरीराकडे दुर्लक्ष झाले, डायट पाळता येत नाही , व्यायामाला वेळ मिळत नाही .
त्यामुळे सायकल घ्यायचा विचार करतोय,घर ते ऑफिस 4 किलोमीटर अंतर आहे, सुट्टीच्या दिवशी फिरायला आवडते त्यामुळे 40ते 50 किलोमीटर होईल... म्हणून जे या प्रकारामध्ये तज्ञ आहेत त्यांना विनंती आहे की मार्गदर्शन करावे, अनुभव सांगावे... सायकल कुठली घ्यावी, कशी घ्यावी?? बजेट 8000-12000 आहे...घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

16 Jun 2019 - 1:03 pm | जॉनविक्क

बाकी तज्ञ बोलतीलच.

जॉनविक्क's picture

16 Jun 2019 - 2:01 pm | जॉनविक्क

सायकली भाड्याने मिळतात का ? स्मार्ट सिटीत नक्की मिळतात app मोबल्यावर चढवा की काम सुरू.

एक दोन महिने भाड्याची सायकल वापरून ही लाईफ स्टाईल तुम्हाला रुचती आहे का ते पहा... उगा सहा महिन्यातून एक 100 किमीची ट्रिप करायला 20K++ बजेट फार महाग आहे हे वैयक्तिक मत आहे, बाकी हौस तुमची.

बजेट 8000-12000 आहे...घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

शक्यतो कॅशलेस व्यवहार करा, अशक्यचअसेल तर नोटा फाटक्या येणार नाही याची अवश्य काळजी घ्या.

आता 6-7 किमी रपेटीत दमणारा, पण पौगंडावस्थेत जिल्हा स्तरीय सायकल स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेला - जॉनविक्क

कॉलिंग प्रशांत, मोदक, डॉ. श्रीहास आणि इतर सायकल टोळी..

धर्मराजमुटके's picture

16 Jun 2019 - 1:45 pm | धर्मराजमुटके

पहिले ऑफीस मधे एक लॉकर घ्या.
तिथे सुट, शर्ट, ट्राउजर, युडब्लू, सॉक्स आणि टॉवेल ठेवा.
ऑफीस मधे शॉवर ची सोय नसेल तर मॅनेजमेंट ला सांगून एक शॉवर लावून घ्या.
नंतर ऑफीसच्या कँटीनमधे शीतपेये, चहा, कॉफी चा पुख्ता इंतजाम करुन ठेवा.

घरातून निघताना टी शर्ट आणि तीन चतुर्थांश घालून निघा. आता सायकल चालवत ऑफीस ला जायची पुर्वतयारी झाली आहे.

आता एक सायकल विकत घ्या. ८००० ते १२,००० मधे लहान मुलांची सायकल येईल ती तुम्हाला भवसागर तरुन नेण्यास असमर्थ आहे. आमच्या येथे ठाण्यात कमीतकमी १५,००० पासून रु. १,००,००० पर्यंतच्या सायकल्स मिळतात. तेव्हा थोडे बजेट वाढवावे लागेल.
किंवा कोपर्‍यावरच्या वाण्याकडे वाण सामान पोहोचवायची सायकल चालत असेल तर ती थोडी स्वस्तात मिळू शकते.

कमीत कमी १०००-२००० चा सिपर घेण्यास विसरू नका. आणि १०००-५०० चा नाईट लॅम्प पण नक्की विकत घ्या. साधारण १००० रुपड्याचे हेल्मेट पण विकत घ्या.
आता तुमची सायकल चालवण्याची तयारी झाली आहे. उरलेल्या पैशातून सायकल विकत घ्या.

.
.
.
.
.
ता. क. : प्रतिसाद केवळ विनोदी आहे. जमल्यास हसा किंवा दुर्लक्ष करा. पण मनास लावून घेऊ नका. :)

अभ्या..'s picture

16 Jun 2019 - 3:43 pm | अभ्या..

ते सायकल लावण्यासाठी एक सायकल होल्डरवाली मजबूत स्पोर्ट युटिलिटी वेहिकल पण घ्यावी लागते म्हणे.
त्यातल्या त्यात फॉर्चुनर, गेला बाजार एक्स्युव्ही५०० वगैरे तो बनती है.

धर्मराजमुटके's picture

16 Jun 2019 - 5:13 pm | धर्मराजमुटके

ते विसरलोच होतो बघा ! आणि गॉगल वगैरे अक्सेसरीज पण अ‍ॅडवा लिस्ट मधे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2019 - 5:34 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि मिपाकरांकडून कोपरखळ्या आणि टोमणे खाऊन ते पचवण्याची ताकद... ही तर एकदम अत्यावश्यक गोष्ट आहे. ;) :)

हस्तर's picture

18 Jun 2019 - 2:18 pm | हस्तर

बँकेतून लोन घ्या
सायकल चालवताना ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका
पुढच्या सीट वर बसून सायकल चालवा
शकयतो दोन चाका चीच सायकल चालवा

कंजूस's picture

16 Jun 2019 - 2:47 pm | कंजूस

आठ दहा हजाराखालची सायकल ओफिसला चार किमी जायला चालणार नाही??

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jun 2019 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१ हाच विचार मनात आला.

काही मिपाकरांनी सायकलक्षेत्रात केलेल्या उत्तुंग आणि अभिमानास्पद कामगिरीने मिपाकरांवर इतके गारूड केले आहे की, कोणी सायकल विकत घ्यायची म्हटले की बर्‍याच मिपाकरांना, ती केवळ पूर्वीचे विक्रम मोडण्यासाठीच घ्यावी, असे वाटू लागले आहे. :O) ;)

जॉनविक्क's picture

17 Jun 2019 - 5:37 pm | जॉनविक्क

कारण दुकानातून वाणसामान आणायच्या सायकली बाबत हा धागा नाही असे लेख वाचल्यास सकृतदर्शना भासून जाते, खास करून पुढील वाक्य वाचून...

म्हणून जे या प्रकारामध्ये तज्ञ आहेत त्यांना विनंती आहे की मार्गदर्शन करावे, अनुभव सांगावे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jun 2019 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

घर ते ऑफिस 4 किलोमीटर अंतर आहे, सुट्टीच्या दिवशी फिरायला आवडते त्यामुळे 40ते 50 किलोमीटर होईल.
आणि
बजेट 8000-12000 आहे.

यावरून, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसेल अशीच जास्तीत जास्त चांगली सायकल घ्यावी. नंतर सायकलिंगची आवड निर्माण झाली व अजून काही जास्त करून सायकलिंग या क्रिडाप्रकारातील पुढचे काही करण्याची इच्छा निर्माण झाली, की मग अधिक खर्च करून, त्यासाठी आवश्यक प्रकारची सायकल घ्यावी, असे सुचवतो.

केवळ महागडी सायकल विकत घेण्याने वजन कमी होणार नाही किंवा आरोग्य सुधारणार नाही. तसेच, केवळ व्यायामासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी, खूप महागडी सायकल आवश्यक नाही. त्यासाठी, नियमित सायकल चालवणे मात्र नक्कीच उपयोगी असते व त्याचबरोबर, खाणेपिणे व इतर जीवनशैलीलाही तितकेच महत्व असते.

त्यामुळे, बजेट नसतानाही, सुरुवातीलाच उत्साहाने खूप खर्च करून मग पस्तावण्याऐवजी, सावध पावले टाकत पुढे प्रगती करत जाणे, हे केव्हाही चांगले.

मोदक यांचा हा धागा पहावा
https://www.misalpav.com/node/28858

फोल्डिंग सायकल मिळत/असते का? १२-१५ किमी/तास गेली तरी खूप झालं.

चौथा कोनाडा's picture

17 Jun 2019 - 5:09 pm | चौथा कोनाडा

फोल्डिंग सायकल आणि वेगाचा काय संबंध ?

ट्रेकिंगला नेऊन खाली गावात कुणाकडे ठेवायला नको.
फोल्डिंग करण्यात वेगावर परिणाम होईलच पण चालेल. पलीकडे उतरून जाता येईल. किंवा हॉटेल रूममध्ये ठेवता येईल. कुलुपावर भरोसा नाही.

महासंग्राम's picture

18 Jun 2019 - 11:01 am | महासंग्राम

सायकलिंग साठी शूज कोणते वापरायचे ?

कॅलक्यूलेटर's picture

18 Jun 2019 - 11:11 am | कॅलक्यूलेटर

Keysto ची सायकल मिळते 9 ते 10 हजारांच्या दरम्यान मी दिड वर्षे झाली वापरतोय अधिक माहितीसाठी नेट वर सर्च करा

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Jun 2019 - 1:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

१. शहाणे असाल तर वर कोणीतरी सांगितल्या प्रमाणे २-३ महिने भाड्याची किवा अ‍ॅप् वर (पेडल वगैरे) घेउन चालवा. बहुतेक वेळा उत्साहात घेतलेली सायकल नंतर पडुन राहते.
२. ओ एल एक्स वर बघा. क्र. १ मध्ये म्हटल्याप्रमाणे उत्साहाच्या भरात घेतलेल्या चांगल्या सायकल तिथे विकायला काढलेल्या मिळु शकतात.
३. उंची आणि सायकलची फ्रेम साईझ याचे गणित असते. खाली लिंक दिलेय ती पहा
https://www.bicycle-guider.com/bike-articles/bike-size-chart/
४. आता काही तांत्रिक गोष्टी जसे की
-गियर हवेत का? (६ x३=१८) कि (७ x३=२१)?
-डिस्क ब्रेक हवेत का?
- टायर साईझ (२६' कि २७.५') व जाडी (एम टी बी कि सिटी बाईक)
-मध्ये स्प्रिंग असलेली सायकल टाळावी,
-शिमानोचेच गियर घ्यावे,अंगठ्याने बदलायचे गियर घेणे (रोटेट करायचे घेउ नका जसे की एम ८० स्कुटरला असतात.)
-ईतर गोष्टी काय घ्याव्या जसे की हेल्मेट आवश्यक पण आरसा ,बाटली, एल ई डी लाई,, शुज, एल्बो व नी गार्ड्,गॉगल

मला वाटते सध्या ईतके पुरेसे आहे.

कॉलिंग मार्गीभाउ मोदकभाऊ आणि ईतर तज्ञ मंडळी फॉर मोअर डिटेल्स

गड्डा झब्बू's picture

19 Jun 2019 - 11:02 am | गड्डा झब्बू

महागडी नवीन सायकल खरेदी करून नंतर ती चालवण्याचा उत्साह बारगळणे हि कॉमन बाब आहे. अशावेळी एकतर ती घरात किंवा बिल्डींगच्या खाली उभी करून ठेवावी लागते. किंवा नुकसान सोसून कमी किमतीत विकून टाकली जाते. olx, quikr वर फेरफटका मारलात तर like new, rarely used अशी विशेषणे लावलेल्या सायकली विकायच्या जाहिराती बघा आणि मग विचार करा. त्यातली एखादी घेऊन वर्षभर उत्साह टिकला तर नवीन सायकल खरेदी करणे योग्य ठरेल.

चौथा कोनाडा's picture

20 Jun 2019 - 6:14 pm | चौथा कोनाडा

फेसबुकवर ही जाहिरात दिसली आज :

बर्याच वेळा नव्याने सायकलिंक सुरू कारयची इच्छा असते पण महागडी सायकल घेऊन ती पाडून राहील अशी काळजी वाटत असते त्या मुळे सायकलिंग मत्र राहुनच जाते. मनात आलेला सायकलींग चा विचार लोप पावू नये या उद्देशाने व विद्यार्थ्यांसाठी नोवरिज बायसिकल द्वारे 'रफ्टॉर' ब्राण्डच्या रु. 12,000/- किमतीच्या 21 गियर असलेल्या व दोन्ही चाकाना डिस्क ब्रेक असलेल्या दणकट सायकल (चांगल्या सरावा साठी सायकलला किमान 21 गियर असावेत) रु. 8,999/- मात्र या अतिशय सावलतिच्या दरात उपलब्ध करून देतआहोत. Noworries Bicycles संपर्क: 9890998644. पत्ता: नोवोरिज बायसिकल, केशवलक्ष्मी सोसायटी, पहिली गल्ली, आयडियल कॉलोनी, पौड रस्ता, पुणे 38

ज्या कोण आप्त स्वकीयांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे वाटत असेल त्याना टैग करा. सायकल चालवणे हा उत्तम व्यायाम आहे, तब्येत ठणठणीत राहते!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=450770702368064&id=184074259...