मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पारा असा चढला

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१ पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना "साप डाल तडका " खायला मिळाला असता मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चटपूट

वाचने 5934 वाचनखूण प्रतिक्रिया 13

In reply to by टवाळ कार्टा

प्रलयनाथ गेंडा… 05/06/2019 - 17:03
ओ टकाजी , स्पायडरमॅन वैग्रेंचे रिबूट तुम्हाला चालतात .. पण आमच्या अकुंचे रिबूट लेख (विथ डिजिटली मास्टर्ड फोटो ) डोळ्यात खुपतात काय ??

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धर्मराजमुटके 09/06/2019 - 13:06
सापड्याच्या विषाने डाळीचे पिवळे वाटाणे झाले. जर नागड्याने स्पर्श केला असता तर कदाचित हिरवे किंवा काळे वाटाणे झाले असते :)

खिलजि 06/06/2019 - 15:43
काका आता खालील फोटो पण पाठवा कारण मलातरी त्यांना बघावास वाटतेय. नागनंदिनी सोसायटी नागनाथ सर्प मित्र

झेन 07/06/2019 - 09:48
कदाचित रबर मण्यार असावा

झेन 07/06/2019 - 09:49
कदाचित रबर मण्यार असावा