श्री. अमर्त्य सेन यांच्या लेखाचा अनुवाद व त्यावर (मराठी व इंग्रजी) प्रतिसाद
वाचकहो,
श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप व मोदींच्या निवडणुकीतल्या विजयावर वैचारिक संग्राम ही पार्श्वभूमी धरून काही भाष्य केलं आहे. मूळ इंग्रजी लेख येथे आहे :
https://www.nytimes.com/2019/05/24/opinion/india-modi-election.html
या लेखाचा मी केलेला अनुवाद खाली दिला आहे. त्यावरील माझा (इंग्रजी व मराठी) प्रतिवाद धाग्याखालील टिप्पणीत आहे.
---------------- अनुवाद सुरू ----------------
मोदींनी सत्ता जिंकली वैचारिक संग्राम नव्हे
----------------हिंदू राष्ट्रवादी जिंकले. ही घटना भारताबद्दल काय सांगते?
- लेखक : अमर्त्य सेन. हे एक नोबेल पारितोषिक धारक असून हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत.
२४ मे २०१९
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या हिंदूराष्ट्रवादी भारतीय जनता पक्षास सार्वत्रिक निवडणुकांत घवघवीत विजय प्राप्त करवून दिला. त्यास ५४३ पैकी ३०० हून अधिक जागा , तसेच आजून पाच वर्षं शासन चालवायची अर्हताही प्राप्त झाली. ही एक उठावदार कामगिरी आहे हे खरं, मात्र मोदींना हे केलं तरी कसं? आणि भारतातला सर्वात जुना पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस केवळ ५२ जागांपाशी का अडकली आहे? या प्रश्नांची उत्तरं धुंडाळतांना काहीजण संकल्पना व मतप्रणालींच्या क्षेत्रांत स्पष्टीकरण शोधायला जावंसं वाटलं. विशेषत: भारतातल्या प्रबळ हिंदू अस्मितेशी निगडीत असलेल्या मतप्रणालींत. तथाकथित समजानुसार भारत बदलंत असून काँग्रेस पक्षाची (व त्यातल्या गांधी, टागोर, नेहरू, आझाद आदि दिग्गजांची) जुनी, अनेकोक्त (=puralist), सेक्युलर मतप्रणाली हा काही फारसा प्रभावी पर्याय उरलेला नाही. यात तथ्य असू शकतं. भारतात जरी २० कोटी म्हणजे १४ % मुस्लिम असले तरी भाजपला मिळालेल्या पाठिंब्यापैकी प्रमुख्य हिस्सा हिंदूंकडून आलेला आहे. मात्र संकल्पना एकाकीपणे वावरंत नसतात. आपल्या कल्पनांवर प्रभाव टाकणाऱ्या घटना आयुष्यांत घडतातंच ना ? मोदी भरघोस मतांनी निवडून आलेत. हे तथ्य आहे, म्हणजेच ही एक घडलेली घटना आहे. हिच्यावरून हिंदू उत्थानाची संकल्पना कसकशी उत्क्रांत होत गेली याचा अंदाज बांधता येतो. मात्र घटनेवरून संकल्पनेचा वेध घेऊ जाता आपलं अन्वेषण म्हणजे उशिरा जाग आल्याचं लक्षण आहे. कारण की 'भाजपला काही वर्षांपूर्वीच्या मानाने आज खूपंच जास्त निष्ठावान समर्थक का आहेत', हा प्रश्न अनुत्तरित राहतोय. मोदी विलक्षण कुशल व करिष्मावान राजकारणी नेते आहेत हे निर्विवाद. भाजपच्या झळाळत्या उत्थानात मोदींनी बजावलेल्या भूमिकेचं परीक्षण होणं अर्थातंच अगदी साहजिक आहे. द्वेष व तिरस्काराचा राजकीय लाभ उठवण्याची तत्परता असल्याने त्यांना आपल्या ज्वलंत वक्तृत्वाच्या साहाय्याने समोरच्यावर प्रभाव टाकता आला. हा द्वेष व तिरस्कार भिन्न जीवनशैली धारकांचा ( डावे, तर्कवादी, उदारमतवादी बुद्धीजीवी) होताच, त्याप्रमाणे भिन्न उगम व धार्मिक समजुती असलेल्यांचा उदा. : मुस्लिम यांचाही होता. अटलबिहारी वाजपेयींसारखे आधीचे मवाळ भाजप नेते, तुलनेने जवळपासही फिरकंत नाहीत. मोदींनी निवडबाजीत जसा करिष्मा वापरला तसाच भरपूर पैसाही ओतला. तो काँग्रेस व इतर राजकीय पक्षांच्या कित्येक पटीने होता. शिवाय माध्यमांतील छबीदर्शनाचं व्यस्त प्रमाण आहे ते वेगळंच. दूरदर्शनने ऐन निवडणुकीच्या मे महिन्यात भाजपला काँग्रेसच्या दुप्पट प्रक्षेपणसमय अदा केला. फेब्रुवारीत भारतीय सैन्यावर काश्मिरात दहशतवाडी हल्ला झाल्यावर मोदींनी पाकिस्तानात हवाई हल्ला केला. या प्रत्युत्तराचा भाजपला अफाट फायदा झाला. निवडणुकांत मोदींनी भयावडंबर अतिशय प्रभावीपणे वापरले. मोदींच्या स्वत:च्या संक्रमणात बदल दिसून येतो. २०१४ साली मोदी जिंकले होते तेव्हा त्यांनी दिलेल्या वचनांचा लाभ झाला होता. या आश्वासनांत भ्रष्टाचार व लालफीतीपासून मुक्त अशी व्यवस्थितपणे चालणारी बाजारी अर्थव्यवस्था, सर्वांसाठी रोजगाराच्या अमाप संधी, सरसर पसरणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या फळांचं न्याय्य वाटप, प्राथमिक आरोग्य व शाळांची तत्काळ सुविधा, इत्यादिंचा समावेश होता. आत्ताच्या प्रचारमोहिमेत मात्र मोदींना आपल्या कामगिरीबद्दल बढाया मारता आल्या नाहीत. त्यांनी दिलेल्या वचनांची पूर्ती फारंच किरकोळ आहे. बेरोजगारीने गेल्या ४५ वर्षांतला उच्चांक गाठलाय, आर्थिक वाढ विषम असून जराशी डगमगतीच आहे, किमान आरोग्यसुविधा साकल्याने दुर्लक्षित आहेत आणि लालफीत व भ्रष्टाचारात उल्लेखनीय घट नाही. त्याउलट मोदींनी भारतीय नागरिकांच्या भीती व आशंकांवर भर दिला : आतंकवादाची भीती, पाकिस्तानकरवी घातपाताचं भय, भारतातल्या हान्योत्सुक प्रभृतींच्या भीषण कृत्यांचं भय. जसा १९८२ साली फॉकलंड युद्धाच्या वेळेस मार्गारेट थॅचर यांना पाठींबा मिळून त्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला, तस्संच फेब्रुवारीतल्या पाकवरील सीमापार हल्ल्याचं मोदींना निवडणुकीत अफाट सहाय्य मिळालं. हे घटक भारतीय राजकारणात कथन पूर्ण करतात. बऱ्याच जणांना वाटतं की भाजपने काँग्रेसविरुद्ध 'मतप्रणालीचा युक्तिवाद' जिंकला. मात्र हा काही हिंदुराष्ट्रवादी तत्त्वज्ञानाचा काही खास विजय नाही. आणि गांधी टागोर नेहरूंची सर्वसमावेशी विचारधारा नष्टनाभूत झाल्याची लक्षणीय ग्वाही नाही. भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या राजवटीत भारतातली धार्मिक फूट वाढंत आहे हे पुरेसं स्पष्ट झालं आहे. अल्पसंख्याकांची विशेषत: मुस्लिमांची हालत झपाट्याने डळमळीत होऊ घातलीये. हिंदुराष्ट्रवादी चळवळीने सत्तास्पर्धेत थोडीफार बाजी मारलीये, पण विचारसंग्रामात कसलीही गंभीर आगेकूच नाही. एक भाजपची चळवळी प्रज्ञा ठाकूर हिने म्हंटलं की महात्मा गांधींचे मारेकरी गोडसे हे एक देशभक्त होते. यामुळे भाजपला देखील अवघडल्यासारखं झालं आणि म्हणून ठाकूर बाईंना औपचारिक क्षमायाचना करावयास लावली. परंतु, मध्यप्रदेशातनं निवडणूक लढवणाऱ्या ठाकूर बाई निवडणूक जिंकल्या व त्या संसदेत विधायक ( = कायदे बनवणारी ) होणार. हे सत्ताप्राप्तीची रस्सीखेच जिंकणं असून वैचारिक संग्रामातली जीत नव्हे. गेलाबाजार विरोधकांकडून का होईना, पण हा वैचारिक अभिसंग्राम विशेषकरून ध्यानी न येणं हे खेदजनक आहे. यासाठी बऱ्याच व्यापक संवादाची गरज आहे. पण पहिली पायरी या दोन लढायांची गल्लत न करणं ही आहे. ---------------- अनुवाद समाप्त ---------------- हुश्श ! झाला एकदाचा अनुवाद. पार घामटा निघाला. अतिश तसीरच्या लेखाच्या वेळेस 'अक्षरनामा'चा आयता अनुवाद हाती लागला होता. या वेळेस मात्र स्वत:च परिश्रम घ्यावे लागले. वैचारिक लेख असल्याने ढोरमेहनत म्हणवंतही नाही. सालं गुरासारखं राबायचं पण तशा अर्थाचं लेबलही चिकटवता येत नाही. तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणतात तो हाच. कुठे गेले अच्छे दिन ! फुकट गिळायला मिळालं नाही की हे असं होतं. मोदींनी ल्युटेनच्या लुटारूंचं फुकट गिळणं थांबवलं. म्हणून ते कसे मोदींवर दात धरून असतात. त्याच धर्तीवर माझा फुकट गिळायचा अधिकार संपुष्टात आणल्यामुळे मी अक्षरनामावर चडफडावं का ? हा एक घोर तात्त्विक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे. असो. मूळ इंग्रजी प्रतिसाद व त्याचा मराठी तर्जुमा या लेखाखाली आहेत. तो / ते वाचून आपलं मत अवश्य कळवणे. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान
याद्या
25561
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
Response to Amartya Sen's article on Modi's election victory
अमर्त्य सेनांच्या मोदींच्या निवडणुकीय विजयावरील लेखाचा प्रतिवाद
अमर्त्य सेन यान्चा लेख
+1 पूर्ण सहमत
In reply to अमर्त्य सेन यान्चा लेख by दिगोचि
He also has not taken into account the fact that by introducing NYAY scheme Congress alienated the middle class who saw it as an additional tax burden on them.अगदी अगदी . न्याय योजना जाहिर झाली तेव्हा पहिला विचार हाच आला की किती वर्ष मी भरलेल्या टॅक्समधून इतर लोक फायदा घेणार ?(कॉग्रेसचे गरीब मह्णजे दारिद्र्य रेषेखालील लोक ज्यांना 3-4 मुले जन्माला घालायला परवडतात.) माझ्यासारख्या कित्येक नोकरदारांनी त्याच वेळेला या योजनेबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली होती. कधी नव्हे तो मिडल क्लास राजकारणाबाबत आता संवेदनशील होताना दिसत आहे.धन्यवाद
In reply to अमर्त्य सेन यान्चा लेख by दिगोचि
मस्त उत्तर !. माझे तर मत आहे
आभार!
In reply to मस्त उत्तर !. माझे तर मत आहे by जयंत कुलकर्णी
एकच बाजू दर्शवणारी विचारसरणी
अभ्यास केला असेल तर
देशभक्त , देशद्रोही ई.
In reply to अभ्यास केला असेल तर by रविकिरण फडके
@गामा पैलवान
खरे तर मरतुकडा सेन
गामा जी
गामा जी
त्या अफजल गुरुला काही
In reply to गामा जी by भंकस बाबा
महात्मा गांधी यांचे आयुष्य
1993 आणि 2002 गांभिर्याने
In reply to महात्मा गांधी यांचे आयुष्य by भृशुंडी
तुमच्या मते काँग्रेसने चुका
In reply to 1993 आणि 2002 गांभिर्याने by भंकस बाबा
भृशुंडी साहेब
In reply to तुमच्या मते काँग्रेसने चुका by भृशुंडी
गांधींचे सर्वात मोठे विरोधक
In reply to भृशुंडी साहेब by भंकस बाबा
भृशुंडी साहेब
In reply to गांधींचे सर्वात मोठे विरोधक by भृशुंडी
जर त्यांची हत्या झाली नसती
In reply to भृशुंडी साहेब by भंकस बाबा
भृशुंडी साहेब
In reply to जर त्यांची हत्या झाली नसती by भृशुंडी
विषय काय आणि बोलता काय?
In reply to भृशुंडी साहेब by भंकस बाबा
भृशुंडी साहेब
In reply to विषय काय आणि बोलता काय? by भृशुंडी
वैयक्तिक होण्याचा प्रश्नच
In reply to भृशुंडी साहेब by भंकस बाबा
@भृशुंडी
In reply to महात्मा गांधी यांचे आयुष्य by भृशुंडी
अशा दहा समित्या आणि आयोग कसे हो नेमले जातात? आणि एवढे करून खटला ३६ वर्षे न्यायालयासमोर येतच नाही? आपल्या माणसांना वाचवण्यासाठी कायद्याचा पोरखेळ कसा चालवलेला आहे हे समोर आणणे हा हेतू होता.
२००२ मध्ये झालेल्या गुजरात दंग्यांमध्ये श्री मोदीना गोवून खटल्यावर खटले दाखल होऊनहि त्यांना सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने नि:संदिग्ध शब्दात निर्दोषी घोषित केले आहे. यात जमाव समाविष्ट नव्हता का? कि यात हितसंबंध नव्हते. तेथे आयोगावर आयोग समित्यांवर समित्या का नेमल्या गेल्या नाहीत? या दुटप्पी हलकटपणासाठीच माझा काँग्रेसला विरोध आहे.पूर्णत: सहमत
In reply to @भृशुंडी by सुबोध खरे
समानतेचा मुद्दा समान
In reply to @भृशुंडी by सुबोध खरे
समानतेचा मुद्दा समान
In reply to समानतेचा मुद्दा समान by भृशुंडी
लोल.
In reply to समानतेचा मुद्दा समान by सुबोध खरे
अमर्त्य सेन यांनी मांडलेल्या
धन्यवाद.
In reply to अमर्त्य सेन यांनी मांडलेल्या by वामन देशमुख
सेन असेल किंवा वायर चा मालक असेल
मौलिक विचार.
In reply to सेन असेल किंवा वायर चा मालक असेल by Rajesh188
श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to श्री. अमर्त्य सेन यांनी भाजप by डँबिस००७
अमर्त्य सेन व मनमोहन सिंग
तुम्ही अमर्त्य सेन आणि नालंदा विद्यापीठाबद्दल लिहिले
In reply to अमर्त्य सेन व मनमोहन सिंग by डँबिस००७
त्याची काही खात्रीलायक लिंक
मन मोहन सींगच्या नावाने
Amartya Sen should be
आयशप्पत ....