मिपा प्रशासनाकडे विचारणा
१. कोणते धागे ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे?
२. धागा वाचनमात्र करण्याविषयी मिपा चं धोरण काय आहे?
३. कोणते प्रतिसाद ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे? प्रतिसाद सम्पादित करण्याविषयी मिपा चं धोरण काय आहे?
४. कोणते आयडी ठेवावेत, कोणते उडवावेत याविषयी मिपा चं धोरण काय आहे?
अधिक माहिती:
१. चालू घडामोडी - मे २०१९ हा धागा का उडवला गेला? त्यावरचे गामा पैलवान यांचे राजीव गांधी यांच्याविषयीचे काही प्रतिसाद संपादक/मालक यांना पटणारे नव्हते यासाठी? आणि तसं असेल तर ते प्रतिसाद संपादित करणं, संबंधित आयडी ला समज देणं हे उपाय करता आले नसते का? थेट धागा उडवायचा?
२. शिवाजी महाराज -- काही रेखाचित्रे या धाग्यावर विशुमित यांनी "गुवात दगड" असे शब्द वापरले होते. ते प्रतिसाद सम्पादित करण्यात आले. रामदास हा आदिलशहा चा हेर होता असं विधान त्यांनी विनापुरावा केलं. तो धागा वाचनमात्र करण्यात आला. मग विशुमित यांना त्यांच्या विधानाचे पुरावे मागायचे कसे?
३. १ मध्ये केलेले प्रतिसाद सम्पादित करण्या ऐवजी धागा उडवला गेला. २. मध्ये प्रतिसाद सम्पादित केले गेले आणि धागा वाचनमात्र केला. यात प्रशासनाच्या ऍक्शन्स मध्ये कन्सिस्टन्सी दिसत नाही. की रामदासांना काहीही म्हटलं तर चालेल, पण राजीव गांधींना काहीही म्हणायचं नाही असं प्रशासनाचं धोरण आहे?
या लेखावरचा माझा प्रतिसाद ("तुमच्या व्यवसायात दिलेली वेळ पाळणे किती महत्वाचे असते? कबूल केलेल्या वेळेत माल देता आला माही तर काय करतात?") कोणतेही स्पष्टीकरण न देता उडवण्यात आला.
४. उपरोल्लेखित विधान केल्यानंतर, विशुमित हा आयडी त्यानंतर बरेच दिवस ऍक्टिव्ह होता. गा पै यांचं सदस्यत्व मात्र त्वरित रद्द केल्याचं दिसतंय. हा वेगवेगळा न्याय का? कोणाविरुद्ध तक्रार आहे, यापेक्षा तक्रारकर्ता कोण आहे यावर काय ऍक्शन घ्यायची हे ठरतं का?
मिपा ची सुरुवात अन्य संस्थळावरची बंधनं झुगारून देण्यासाठी झाली, असं ऐकून/वाचून आहे. मग या वरच्या बाबी मिपा च्या स्थापनेच्या मूळ हेतूलाच हरताळ फासत नाहीत का?
विचारणा प्रशासनाकडे केलेली असली, तरी अन्य सदस्यांनी त्यांचं मत मांडावं, ही विनंती!
याद्या
5292
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
धोरण
गर्व आणी अभिमान
हा धागाच उडवण्यात आला तर तू
जल्ला मैदानाच्या बाहेर षटकार
In reply to हा धागाच उडवण्यात आला तर तू by मोदक
हा धागाच उडवण्यात आला
In reply to हा धागाच उडवण्यात आला तर तू by मोदक
मूळ धाग्यातील
In reply to हा धागाच उडवण्यात आला by mayu4u
मिसळपावचे अधिकृत धोरण
मिसळपाव प्रशासन समतोलपणे आणि
कागलकरांच्या डुआयडी फौजेपुढे