औरंगजेबाने शिरच्छेद केलेल्या सरमद कशिद बद्दल लिहिलेल्या प्रतिसादात, मध्ययुगीन (छ. शिवाजी कालीन) इतिहासाचे अभ्यासक मनो यांचाही अनुषंगिक विषयावर बर्यापैकी समतोल प्रतिसाद आला. मनोंना त्याच धाग्यावर प्रतिसाद देण्याचा मनोदय होता पण तेथिल इतरांच्या चर्चांनी वेगळी वळणे घेतली आणि मनोंच्या प्रतिसादास योग्य न्याय मिळावा म्हणून हा वेगळा धागा लेख काढला.
औरंगजेबाचा विश्वासू कारभारी हमीदुद्दीनखान याने लिहिलेल्या काही आठवणीतून मुस्लीम धर्म न स्विकारणार्या युद्धकैद्यांचे शीरच्छेद करण्या बद्दल तसेच काही मराठ्यांनी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले, …..दरबारच्या बातमीपत्रावरून धर्मांतर करणारी बरीच माणसे कारकून अगर सैन्याच्या खालच्या थरातील दिसतात. ही धर्मांतरे बढतीच्या आशेने झाली असावीत. क्लचित प्रसंगी अफरातफरीची शिक्षा चुकविण्यासाठी धर्मांतर झाले…...यावरून औरंगजेबाच्या मनोवत्तीवर उत्कृष्ट प्रकाश पडतो. धर्मांतर घडवून आणण्याची तो संधी सोडीत नसे. पण तीहि एका मर्यादेत. मराठ्यांशी निकराचा लढा चाळू असताना धर्मप्रसाराचा आपला छंद फार महाग पडेल याची त्याला जाणीव असावी. मनो यांच्या प्रतिसादातून@ मनो, मध्ययुगिन इतिहासाचा आपला अभ्यास नक्कीच अधिक सखोल आहे. पण माझ्या मर्यादीत वाचनावरून मला काही गोष्टी वाटल्या त्या म्हणजे औरंगजेब धार्मिक होताच त्या सोबत दारा शुकोहच्या विरोधात उभे टाकताना धर्मांध गोतावळा त्याने वापरून घेतला आणि एकदा धर्म वापरून घेतला की त्या वजना खाली येणे आपसूक होते तसे औरंगजेबाचेही झाले असावे बादशहा झाल्यावर काजींच्या मदतीने धार्मिक पुस्तकांनुसार शरीयाची सक्तीने अंमलबजावणी चालू केली असावी. औरंगजेबाची सर्वात प्रीय पत्नी शिया होती आणि ती इराणी राजकन्यांपैकी होती, दुसर्या बाजूला खलिफा मंडळी कर्मठ सुन्नी धर्मगुरुंना प्रतिनिधी म्हणून पाठवत असणार. या दोन्हींचा औरंगजेबाने सत्तेत येण्यासाठी उपयोग करून घेतला असेल. औरंगजेबाच्या दरबारात सुरवातीस शिया धर्म मार्तंडाचे बर्यापैकी वर्चस्व असावे, पण नंतर औरंगजेबाने शिया आणि सुन्नी धर्ममार्तंडाच्या चर्चा घडवल्या आणि औरंगजेब कर्मठ सुन्नी पक्षाकडे झुकला यानंतरच त्याने आपल्या दरबारातून संगित-गायन हद्दपार केले आणि औरंगजेब अधिकच कर्मठ झाला. तरीही औरंगजेबाला काही मर्यादा होत्या पुर्वाश्रमींप्रमाणे सरदार तसेच रेव्हेन्यू ऑडीट सिस्टीम मध्ये थोडेसे हिंदू ही होते - मधल्याफळीत हिंदूंशी काही प्रमाणात जुळवून घेण्याने मुघल सत्ता पॉप्युलर रिव्होल्टची लगेच टार्गेट होणार नव्हती , शिवाय दिलेल्या शब्दास, मीठास जागणे आणि हिशेब व्यवस्थेस लागणारी साक्षरता आणि प्रामाणिकता मधल्या फळीतील ब्राह्मण वर्ग पुरवत होता. जिथे त्याच्या घरातल्यांवर आणि स्वधर्मीयांच्या लॉयल्टी आणि सचोटीची शाश्वती नाही ती मुघलांना काफीर असलेल्या हिंदूंकडून मिळत होती. या मधल्या फळीतील हिंदू गोतावळ्यास बादशहाची मर्जी कशी राखायची याची माहिती होती. औरंगजेबाने काही ब्राह्मणांना दानेही दिलेली दिसतात पण प्रत्येक दानपत्रात मुघलवंशाची सत्ता चालू रहावी म्हणून प्रार्थना करणार अशी मखलाशी दिसते. हि मखलाशी नमेकी कशी करुन्न पदरात चारपैसे कसे पाडून घ्यायेचे यासाठी मधल्याफळितील दरबारी हिंदूनी थोडी फार प्रयत्न केले असू शकतात काही हेरगिरीसाठी माहिती देणारेही असू शकतील. इथे औरंगजेबाची अजून एक अंधश्रद्धा लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे त्याचा साधू लोकांच्या चमत्कार क्षमतेवर असलेला विस्वास. धर्मांतर करणार्यांच्या शिक्षा धर्मानुसार त्यास माफ कराव्या लागत पण चमत्कार क्ष्मता दाखवल्यास सोडून देण्याची आश्वासनेपण औरंगजेब देताना दिसतो. औरंगाबादच्या निपट निरंजनाशी त्याच्या स्पष्ट्वक्तेपणाकडे दुर्लक्षकरून जुळवून बहुधा त्याच्या चमत्कार प्रसिद्धीमुळेच घेतले असावे. दरबारी सरदार आणि विशेषत" सैनिकांना पगार असत पण जनतेला लुटणे पैसा स्त्रीया न मिळाल्यास मुलूख बेचिराख करणे ते धर्मांतरे करवणे त्यांच्या लेव्हलवरही होत असावे. पण बादशहा मंडळी विशेषतः औरंगजेब शरिया आणि धार्मिक ग्रंथांच्या मार्गदर्शनावर अधिक अवलंबून दिसतात. त्यांच्या पवित्रग्रंथातील काही ओळींचा कोणताही परधर्मीय दिसला तरी मारावे असा अर्थ घेऊन आजही दहशतवादी हिंसाचार करताना दिसले तरी बर्याच अभ्यासकांच्या मते युद्धात सापडलेल्या परधर्मीयांकडून जबर दंड घ्यावा किंवा धर्मांतर केल्यास सोडावे असे असावे अन्यथा मारावे. औरंगजेबाने गंभीर स्वधर्मीय शास्त्रार्थ केल्यानंतर धर्मांतर सक्ती कैदेतील लोकांपर्यंत मर्यादीत केली असण्याची बरीच शक्यता वाटते. अर्थात युद्धबंद्यांवर सुद्धा धर्मांतराची जबरदस्ती न्याय्य ठरणारी नव्हती आणि नाही ह्याचे नीटआकलन अनेकांना होत नसण्याची आजच्या काळातही शक्यता असू शकते त्यामुळे यातील असहिष्णूतेला चटकन असहिष्णूता म्हणून लक्षात घेतले जात नसावे. औरंगजेब असो, टिपू सुल्तान असो वा इतर अनेक शांततेच्या धर्माचे पायिक असोत त्यांनी काही ठिकाणी सक्तीने धर्मांतरे करवली पण सरसकट सर्वच जनतेचा धर्म बदलला नाही याचे रहस्य माझ्या व्यक्तिगत मतानुसार वरील प्रमाणे असावे. त्यांच्या काही उदारपंथी विचारवंतानुसार तत्कथीत ग्रंथात परधर्मीयावर आक्रमणे केवळ करार मोडल्यावर, अन्याय कारणाने स्व-प्रदेश सोडावा लागणे तसेच दुसर्या बाजूने आक्रमणे झाल्यास करावयाची आहेत. लेखन चालू * अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे तसेच मिपाकराम्ना उद्देशून व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा करु नयेत . * How Indian was the Mughal Empire? * भारतातील जिझीया अम्मलबजावणी बद्दल ससंदर्भ लेख
वाचने
15983
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा फार गहन विषय आहे. सर्वच
कट्टरतेची स्पर्धा
In reply to हा फार गहन विषय आहे. सर्वच by मनो
शहाजहान आणि त्याची सावत्र आई
In reply to कट्टरतेची स्पर्धा by माहितगार
ओह ओके, १६३१ मध्ये
In reply to शहाजहान आणि त्याची सावत्र आई by मनो
असफखान हा नूरजहाँचा भाऊ,
In reply to ओह ओके, १६३१ मध्ये by माहितगार
जिझिया कर वसूलीसाठी सधन हिंदूंना जिवंत ठेवणे आवश्यक असावे.
@ मनो वरील आचार्य गोपालदास
In reply to जिझिया कर वसूलीसाठी सधन हिंदूंना जिवंत ठेवणे आवश्यक असावे. by चित्रगुप्त
रोचक माहिती
एक छोटी दुरुस्ती सुचवावी
In reply to रोचक माहिती by भंकस बाबा
रोचक माहिती
अजुन एक
अवांतर
दारा - औरंगझेबवर एक इंग्रजी
मनो तुमच्या लेखाची प्रतिक्षा
In reply to दारा - औरंगझेबवर एक इंग्रजी by मनो
लेख इथे आहे
In reply to मनो तुमच्या लेखाची प्रतिक्षा by माहितगार
सुरेख. कलाकृती अफलातून आहेत.
In reply to लेख इथे आहे by मनो
आपल्याकडे याच्या दसपट
In reply to सुरेख. कलाकृती अफलातून आहेत. by यशोधरा
इथे पण सविस्तर लिहिले आहे पूर्ण लेख मला वाचनीय ahe
दार उल इस्लाम म्हणजे काय?
शांततेचा अतिरेक ..
@ तनमयी नरहर कुरंदकरांचे या
In reply to शांततेचा अतिरेक .. by तनमयी
मुस्लिम धर्म हा नेहमीच आक्रमक राहिला आहे
अकबराला " द ग्रेट" हे विशषण