बहावा
--------------------------------------------------------------------------------------
घोस लगडले सोनसळी
मन खुलते या तरुतळी
वसंताची बहार ही
झाली टपोर मनकळी
की पांघरला
पिवळा शेला
की सोनसाज
याला केला
रूप देखणे याचे
वरती सोन झळाळी
तो करतो कसा
नजरबंदी
सोनपिवळी
गारुड धुंदी
सय कवळ्या प्रेमाची
देई शहाणा कवळी
-----------------------------------------
बिपीन
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5137
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता छान आहे. कोण म्हणतं
कविता छान आहे. कोण म्हणतं उन्हाळा सुंदर नसतो? उन्हाळ्याचं masculine देखणेपण कवितेत छान प्रकटलं आहे. वसंत-ग्रीष्मात आसमंत सुंदर करून टाकणारी ही झाडं उन्हाळयाचं सौन्दर्य खुलवतात.
का ते माहीत नाही. रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल.
रच्याकने.. कवळी या शब्दाचा अजून एक अर्थ होतो, त्यामुळे तो शब्दप्रयोग जरासा खटकला.
का ते माहीत नाही. रानावनात
रानावनात घुमते बाई शीळ या कवितेची आठवण झाली. ती कविता आंतरजालावर कुठे असेल आणि कोणाला ते माहीत असेल तर कृपया दुवा शेअर करा. माझ्याकडून दुवा मिळेल.हा घ्या दुवा. कविता आणि अजून बरीच माहिती आहे इथे...
https://jaganyachajugar.wordpress.com/2012/09/12/33/
धन्यवाद, डॉ सुहास.
In reply to का ते माहीत नाही. रानावनात by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद, डॉ सुहास.
| इरामयी
| इरामयी
पुन्हा एकदा आभारी आहे
कवळी शब्दाचा प्रॉब्लेम मला माहित होता
पण तालात बसण्या साठी मी तो तसा घेतला
आणखी एकदा विनंती
बहावा हि कथा वाचावी
जरूर
In reply to | इरामयी by बिपीन सुरेश सांगळे
कृपया कथेचा दुवा द्यावा.
इरामयी .
इरामयी .
https://www.misalpav.com/node/44535
आभारी आहे
इरामयी .
इरामयी .
https://www.misalpav.com/node/44349
कृपया आधीचे इग्नोअर करा
आभारी आहे