" कशी आहेस ? "
" कशी आहेस ? "
वेशीमधून बाहेर पडताना
उरले सुरले बळ एकवटून
त्याने शेवटी विचारलेच
" कशी आहेस ? "
निर्विकार डोळ्यांनी
निर्विचार मनाने मग
मीही फक्त मान हलवली .
शब्द खूप जड असतात ........
परत कोण ..... ...
ते ओझं वाहणार........
नाहीतर सांगितलं असतं त्याला
"जशी सोडून गेलास ....... तशीच आहे !"
-----------------फिझा !
वा मस्त!
हाच तर प्रॉब्लेम आहे बायकांचा...
आणि पुरुषांचा हा प्रॉब्लेम
राजा अवस्थी सारखे
क्या बात!
ज्जे बात
जबराव जबराव जबराव , सुंदर आशयघन कविता
मस्त गं
+1
आवडली.. नेमकी तरीही सूचक
झकास
1नंबर
1नंबर