Skip to main content

कृष्णमयी..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 19/03/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी खेळतो मुरारी, पाठशीव.. हसत खेळत, अल्लड गोपिका अव्खळ राधिका, कान्हा पाही.. घट डोईवर, चाले भराभर नदी तीरावर, पाण्यासाठी.. भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग निरखे श्रीरंग, राधिकेला.. चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. पावरीचा सूर, आज दूर दूर प्रणयाचा पूर, गोकुळात.. - प्राजु वि. सु. = अव्खळ , अव्घड हे मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4164
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

सुरेख कविता! "मोहे पनघट पे" मधली मधुबाला समोर आली! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

In reply to by शितल

जबरी !! एक णंबर !! सर्व ओळी फ्लॉलेस आहेत .. चुकून आवडणार्‍या कवितांपैकी एक !! और आणे दो बॉस

मिटले नयन, सुटला पदर थरारे अधर, चुंबताना.. क्या बात है!! प्राजु, सांभाळ .... वारकरी संप्रदाय मागे लागतील ..... तुझ्या "संपादक" पदाच्या राजीनाम्याची !!

In reply to by मानस

कविता मात्र सुरेख :) अव्खळ पहिल्यांदा वाचलं तेव्हा वेगळेपणामुळे छान वाटलं. अव्घडच्या जागी दुसरा शब्द बघ म्हणजे 'अव्खळ'चा इंपॅक्ट कमी होणार नाही.

In reply to by धनंजय

हेच मनात आले होते. अवांतर - हा कान्हा अंमळ 'तयार' दिसतो. निरखणे वगैरे गुण खास आहेत बाकी...

ओठून ताणून देवद्वार छंदात बसवलेली आह ते सुचने शिवायच कळत आहे ग. पण समोर प्रसंग साकारणारी कविता आहे. तूझ्या यापेक्षा कितीतरी सरस कविता वाचल्या आहेत. त्यामुळे ही मामुली वाटली. म्हणजे माझ्यासारख्या नौशिक्याने केल्यासारखी वाटली. मीनल.

In reply to by शिवापा

स ह म त बिपिन कार्यकर्ते

चोरून ती उभी, अव्घड ओलेती सावळ्याची मिठी, अंगभर.. सुरेखच गं..... भरूनिया कुंभ, घेता डोईवर खडा घटावर, ट्णकारला.. ट्ण्कारला... हा शब्द भारीच :-) खुप छान कविता... काल दिवसभर "राधे रंग तुझा गोरा.." च्या धुन्दीत होते....आणि आता आज ही तुझी कविता... आजचा दिवस पण छान जाणार ..:-) -स्मिता

मस्त गं प्राजु! :) म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका झाली ही राधिका, कृष्णमयी.. हे सर्वांत आवडलं! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

चरणातून अधिकाधिक बहरणारा प्रणय शेवटच्या दोन कडव्यांत सुरेख रीतीनें सूचक झाला आहे. कोठेहि संकेतांचें उल्लंघन न करतां. छान. सुधीर कांदळकर.

प्राजु वेगळ्या छंदातल काव्य छान आलय, सहज पुढे सरकणारी कविता आहे