विहीर
लेखनविषय (Tags)
*विहीर: एक नितांतसुंदर अनुभव*
ओशो म्हणतात.. First Principle (Truth) cannot be told. If at all it is told, it becomes second principle. Words cannot contain the Truth. All it can do, is to give a pointer towards it. विहीर सिनेमा पाहताना नेमका हाच अनुभव येतो आणि उदमेखून काही न सांगता फार महत्वाच काही सांगून जातो.
माणूस कायम अनेक पातळ्यांवर जगतो.. एकाच वेळी. आयुष्य शोभादर्शीतून पहात असल्याप्रमाणे समोर उलगडत जातं. अमूर्त माणूसपण अनामिक ओढ लावत असत, त्याच वेळी त्याच प्राणीपण सुटत नाही. नात्यांतून मिळणारं बंधन उबदारपणा हवाही असतो, आणि त्याच वेळी ते रेशमी दोर काचत ही असतात प्राणांना. व्यवहाराच्या स्थिर पाषाणावर पाय रोवलेले असताना मन तरल अमूर्त जगात वावरतं. जगणं सुरु राहतं, आसपासच्या घटनांचा अर्थ लावत, अर्थ निर्माण करत, माझिया जातीचा भेटो कुणी म्हणत पण आपलं बेट असणं स्विकारत.
हा विषय सिनेमातून मांडणं हेच मुळात एक आव्हान. घटनांना स्वतःला काही खास महत्व नाही. त्यांना अर्थ आपण देतो. अगदी आपल्या जगण्यासारखंच. अशावेळी कॅमेरा हे माध्यम हाती असेल आणि उमेश कुलकर्णी सारखा दिग्दर्शक असेल तर काय कमाल घडते, ती म्हणजे विहीर हा सिनेमा!
आपला सिनेमा नाटकातून उत्क्रान्त झाला. त्यामुळे संवादांना अतोनात महत्व. पण सिनेमा हे दृकश्राव्य माध्यम आहे. इथे कॅमेरा मुख्य सूत्रधार आहे आणि संवाद दुय्यम. कॅमेरा बोलतो, बोलला पाहिजे ही जाण असणारा आणि ती जबाबदारी समर्थपणे पेलणारा सिनेमा.
चांगल्या काव्याचं म्हणा शिल्पाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचा बांधीव नेमकेपणा. गरजेचे सर्व आहे पण तेवढेच आहे, जे नसून चालेल ते नाही, असा घडीवपणा. रचनेचं कौशल्य अस की यात बदल, बारकासाही म्हणजे कलाकृतीला न भरून येणारी जखम! हा सिनेमा तसा बनलाय. एकही फ्रेम उगाच नाही. एकही संवाद उगाच नाही. शेवटची जवळपास 10 मिनिट तर काही संवादच नाहीत मागे पखवाज आणि सरोद सुरु राहतं फक्त तरी ती दृश्य बोलत राहतात आपल्याशी!
सिनेमा सम्पला तरी विहिरीत घुमणाऱ्या आवाजाप्रमाणे मनात घुमत राहतो, ही त्याच्या खास असण्याची पावती. आणि जगणं या गोष्टीचा आणखी एक खास पैलू दिसल्याचा आनन्द..
--अनुप
प्रतिक्रिया
तुम्ही एखादा सिनेमा पाहताना
सिनेमा बघताना नुसता बघितला
हा सिनेमा अजिबात
मला हे का आणि कसं वाटलं
+१
गंभीर सिनेमाच्या वाटेला मी सुद्धा जात नाही .
यावरून एक आठवला, लिंक खफवर
हा सिनेमा तसा बनलाय. एकही
Awadalela
:):)
मला Off-beat चित्रपट आवडतात.
प्रश्नोत्तरे
केवळ दर्जा!
केवळ दर्जा!