आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
वाचने
130621
प्रतिक्रिया
217
मिसळपाव
प्रतिक्रिया
फेज ३ चे सरासरी मतदान कालच्या
अंदाज बांधताना
अंदाज बांधल्यावर
In reply to अंदाज बांधताना by शाम भागवत
आसाम मधे बर्याच जणांचे लक्ष
फेज ३ चे आकडे अजूनही बदलत
अंतीम मतदान टक्केवारी ६८.४०%
In reply to फेज ३ चे आकडे अजूनही बदलत by शाम भागवत
उत्तर प्रदेश मधे धमाल चाललीय.
तेलंगणाचा निकाल फारच भारी
या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र
वा
In reply to या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र by शाम भागवत
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू
In reply to वा by अभ्या..
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये.या स्टाईलबद्दल फार काही बोलणार नाहीये. :) पण मतदानाचा टक्का जास्त घसरला तर काय होतं ते पहायला हरकत नाही. ३% पर्यंत अनुत्साह म्हणजे जे चाललंय ते बर चाललंय. पण ही टक्केवारी त्यापेक्षा जास्त व्हायला लागले तर समीकरणे बिघडायला लागू शकतात. जे चाललंय त्या बाजूची लोकं पण आता मतदान करत नाहीयेत असाही अर्थ निघायला लागतो. पण तरीही नापसंती व निरूत्साह ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. निरूत्साह हा आळस आहे. तर नापसंती हा राग आहे. नापसंतीसाठी हल्ली मतदार नोटाचा वापर करू लागली आहेत. मला वाटते राजस्थान व मध्यप्रदेशमधे लोकांनी नोटा वापरला. ती नापसंती होती. जर ती सुविधा नसती तर ती लोकं घरीच बसली असती व टक्केवारी खाली आली असती. पण हा निरूत्साह होता की नापसंती ह्याबाबत मग ठामपणे बोलता आले नसते. शेवटी हे सारे तर्क असतात. कोट्यावधी लोकांना असं साचेबंद नियमात कोणीच बसवू शकत नाही. निरूत्साहामुळे ( म्हणजे आळसामुळे) टक्केवारी खूप कमी झाल्यावर काय होते? यासाठी योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यावर काय झाले ते पहायला मजा येते. गोरखपूरमधे २०१४ ला ५४.६६% मतदान झालेले होते. त्यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी ३ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण २०१८ च्या मार्च मधे झालेल्या पोटनिवडणूकीत हेच मतदान अवघे ४३% झाले. ११.६६% मतदान निरूत्साहामुळे झाले नाही. परिणाम असा झाला की ३ लाखांची पिछाडी भरून काढून प्रविणकुमार निषाद २२००० मतांनी निवडून आले. याचा खूप मोठा गवगवा झाला. हा निरूत्साह नसून नापसंती असल्याचे भासवण्याचा खूप प्रयास झाला. त्यासाठी मायावतींनी पाठींबा दिल्यामुळे हे यश मिळाले वगैरे वगैरे बरेच काही म्हटले गेले. प्रत्यक्षात मायावती कधी पोटनिवडणूक लढवत नाहीत. :) पण आकडेवारी असं सांगते की भाजपाला मत देणारी दोन लाख सत्तावीस हजार लोकं घराबाहेरच पडली नाहीत. याच कारण फक्त आळस. लोकांचाही व नेते मंडळींचाही. योगी आदित्यनाथांनीही ते नंतर कबूल केले. योगी आदित्यनाथ फक्त देव देव करणारा, पूजा पाठ करणारा माणूस नाहीये. इंजिनीअर आहे तो. असो. एवढा आळस असूनही भाजप सपा+बसपा विरूध्द जिंकला असता. पण प्रविण कुमार निषाद हे समाजवादी पार्टीचे नाहीयेत. त्यांची निषाद पार्टी आहे व ती त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. उत्तरप्रदेशात यादवांच्या नंतर निषाद ही सर्वात मोठी जमात आहे. त्यामुळे त्यांची स्वत:ची अशी हक्काची मते आहेत. हे निषाद यावेळेस समाजवादी पार्टी तर्फे उभे राहिले त्यामुळे यादव + निषाद अशी मतांची बेरीज होऊन ते निवडून आले. पण श्रेय मात्र मिडियाने सपा+बसपा ला देऊन टाकले. प्रत्यक्षात निषाद हे आयात उमेदवार होते हे मिडियाने बाहेर येऊच दिले नाही. तर असे हे निषाद सपा बरोबर किती राहतील? :) असो.निषाद हे कधीच बी जे पी मध्ये
In reply to म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू by शाम भागवत
हो.
In reply to निषाद हे कधीच बी जे पी मध्ये by श्री गावसेना प्रमुख
क्लिंटन साहेब असते तर आम्ही
In reply to वा by अभ्या..
ह्या सगळ्या माहितीबद्दल अतिशय
In reply to क्लिंटन साहेब असते तर आम्ही by शाम भागवत
शिवसेनेने रडून रडून वेळ काढला
अवांतर : अमेथीचा विकास ....
मतदारसंघातील २०१९ ची
नवमतदार असा कॉलम तयार करता
In reply to मतदारसंघातील २०१९ ची by शाम भागवत
फेज १ ची अंतीम यादी
उत्साही मते हा काय प्रकार आहे
उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना
धन्यवाद
In reply to उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना by शाम भागवत
फेज १ व २ चा एकत्रीत तक्ता
शीर्षावली
In reply to फेज १ व २ चा एकत्रीत तक्ता by शाम भागवत
मध्यरचित शीर्षावली
In reply to शीर्षावली by गामा पैलवान
हे तुम्ही कसं केले? हातानी
In reply to मध्यरचित शीर्षावली by गामा पैलवान
@ शाम भागवत, तुमचे अनेक आभार.
अगदी अगदी
In reply to @ शाम भागवत, तुमचे अनेक आभार. by यशोधरा
असेच म्हणतो.
In reply to @ शाम भागवत, तुमचे अनेक आभार. by यशोधरा
_/\_
महाराष्ट्र
सुधारीत तक्ता
एकदम मस्तं
In reply to सुधारीत तक्ता by शाम भागवत
मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस
In reply to एकदम मस्तं by गामा पैलवान
बापरे हे तर ....
In reply to मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस by शाम भागवत
तातपुरत्या फायद्यासाठी इतका
In reply to मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस by शाम भागवत
टेबल मिपावर जसं च्या तसं
In reply to तातपुरत्या फायद्यासाठी इतका by डॉ सुहास म्हात्रे
टेबल मिपावर जसं च्या तसं
In reply to तातपुरत्या फायद्यासाठी इतका by डॉ सुहास म्हात्रे
टेबल जसेच्या तसे दिसायला हवे
In reply to टेबल मिपावर जसं च्या तसं by शाम भागवत
तुमच्या पध्दतीत या सगळ्याला
In reply to टेबल जसेच्या तसे दिसायला हवे by डॉ सुहास म्हात्रे
असे पण काही मतदार असतात
हेच ते तरते मतदार. हे
In reply to असे पण काही मतदार असतात by Rajesh188
शंभरी पार केल्याबद्दल अभिनंदन.
भाजपा
मावळ, मुंबई काय म्हणतायत?
धागा आणि त्यावरील प्रतिसाद दोन्ही आवडले.
आपण निवडणूक निकाल ऐकताना बर्
फेज ३ नंतरची परिस्थिती
महाराष्ट्र फेज ४ दुपारी २ वाजता
फेज ४ दुपारी ३:३० वाजता
फेज १,२,३ एकत्रीत मतदान टक्केवारी
केरळमधे सगळीकडे मतदान
भागवत सायेब,
In reply to केरळमधे सगळीकडे मतदान by शाम भागवत
कोण किती कुठ?
In reply to भागवत सायेब, by अभ्या..
माझा अंदाज...
त्यात कॅब ड्रायव्हर,
In reply to माझा अंदाज... by समीरसूर
अंदाज खरा ठरलाय...
In reply to माझा अंदाज... by समीरसूर
फेज ४ रात्री ८:३० वाजता
राजस्थान, मध्यप्रदेश व
केरळ, तामिळनाडू, कर्नाटका,
विधानसभा आणि लोकसभा
In reply to केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, by शाम भागवत
फिर एक बार, मोदी सरकार.
माझा अंदाज आणि अपेक्षा :
अंदाज : NDA २६०+
मोदीभाजप सरकार :) (भाजप चालेल.. मोदी नको)सुप्त लाट
संपूर्ण महाराष्ट्र मतदान टक्केवारी
बारामतीचा गड राखणार की जाणार ?
In reply to संपूर्ण महाराष्ट्र मतदान टक्केवारी by शाम भागवत
बारामतीची मतदार संख्या २१
In reply to बारामतीचा गड राखणार की जाणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक महत्वाचा मुद्दा सांगायचा
In reply to बारामतीची मतदार संख्या २१ by शाम भागवत