माणसे मित्र बनून येतात...... ( प्रेरणा :: माणसे कविता बनून येतात...)

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
26 Apr 2019 - 12:14 pm

माणसे मित्र बनून येतात
सदैव गाती मैत्रीचे गोडवे
तोंडात जणू साखर ठेवतात,
काही महिन्यांमध्येच
एक जीवघेणी कळ देऊन
पाठीत वार करून जातात ...

माणसे मित्र बनून येतात
मनातलं बाहेर काढून
केवळ अर्थाचा अनर्थ घेऊन
दिवसभर कानाशी बसतात
आपली लागताना खोलून
मैत्रीच्या अंधारात
पुन्हा गुडूप होतात......

माणसे मित्र बनून येतात...

हे ठिकाणविडंबन

प्रतिक्रिया

विडंबन म्हणता सुडंबन झालं की हे. आवडलं.

चामुंडराय's picture

27 Apr 2019 - 3:26 am | चामुंडराय

सुंदर
विडंबन न धरता स्वतंत्र कविता म्हणून देखील चालेल म्हणजे पळेलच !

शब्दानुज's picture

28 Apr 2019 - 7:50 am | शब्दानुज

खिलजींच्या भाषेत सांगायचे तर जबराव आहे ही कविता.

चित्रगुप्त's picture

28 Apr 2019 - 7:58 am | चित्रगुप्त

मस्त आहे कविता. आता एक कविता जन्मभर मैत्री कायम ठेवणार्‍या दोस्तांबद्दलही येऊ द्या.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Apr 2019 - 9:35 am | ज्ञानोबाचे पैजार

खरा मित्र ओळखता येणे ही सुध्दा एक कलाच आहे
पैजारबुवा,

खिलजि's picture

29 Apr 2019 - 1:45 pm | खिलजि

आमचे थेट आभार स्वीकारा शिवकन्या ताई

या प्रतिसादांच्या मानकरी आपण आहात