मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे पेन्सील रेखाचित्रे - लेन्डस्केप्स

एकनाथ जाधव · · मिपा कलादालन
Landscape Landscape

वाचने 4978 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चित्रगुप्त गुरुवार, 04/18/2019 - 19:21
चित्रकला कशी शिकावी याविषयी बरेच काही सांगण्यासारखे आहे ते लवकरच लिहेन परंतु त्यापूर्वी तुम्ही स्वतःविषयी, तुम्ही काय करता, काय करू इच्छिता, तुमच्या चित्रकलेच्या अभ्यासाविषयी, तुम्ही रहाता त्या परिसराविषयी वगैरे लिहीले तर नेमके काही सांगणे शक्य होईल. मी चित्रकालाविषयक बरेच लेख इथे लिहीले आहेत, ते वाचावेत अशी शिफारस करतो.

In reply to by चित्रगुप्त

अभ्या.. Sat, 04/20/2019 - 15:58
सहमत आहे, चित्रगुप्तजींचे सल्ले उपयोगात आणा, स्केचेस चालू ठेवा आणि जे काही कराल ते आनंदाने, आनंदासाठीच करा. शुभेच्छा

In reply to by चित्रगुप्त

एकनाथ जाधव Mon, 04/22/2019 - 11:01
धन्यवाद, चित्रगुप्त साहेब. मी पेशाने ग्राफीक डिदिझायनर आहे. मुम्बईमध्ये जाहीरात एजन्सीत कामाला आहे. चित्रकलेचा विषेश अभ्यास असा केलेला नही. फक्त छन्द म्हणुन चित्रे कढतो. नवीमुम्बई मध्ये राहतो. तुमचे बरेचसे लेख वाचले आहेत. मार्गदशन केलेले नक्कीच आवडेल.

चौकटराजा Tue, 04/23/2019 - 09:11
प्रमाण हे चित्रात फार महत्त्वाचे आहे ! जर केवळ शैली म्हणून चित्रात परस्पेक्टेव्ह नको असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा प्रमाण व पस्पेक्टीव्ह हवाच ! तसंच शक्यतो शेडिंग करताना एकच शैली वापरावी . हे कसे करावे याचे मार्गदर्शन नेटवर अनेक ठिकाणी आहे .

झेन Tue, 04/23/2019 - 21:54
चित्रगुप्त आणि चौरा काकांचे मार्गदर्शन असेलच तेंव्हा इथे नवनवीन स्केचेस मात्र टाकत रहा.

खिलजि Tue, 04/30/2019 - 19:24
छान आहे ... माझा हा प्रांत नाही तरीदेखील मी काही निरीक्षणे नोंदवू इच्छितो . ती खालीलप्रमाणे आहेत १ घराशेजारी झाडे बहरलेली आहेत पण ते झाड जे किनारी आहे ते मात्र सुकलेले आहे ... २ ती नाव आहे तर मग तिची प्रतिकृती जी पाण्यात पडलेली आहे ती थोडी वेगळी भासते आहे मी जर चुकत असेन तर मला आपण मार्गदर्शन करा पण एक आहे हि माझी निरीक्षणे तुम्हाला तुमच्या चित्रासाठी माझ्याकडून मिळालेली पोचपावती आहे असे समजा कारण मी आज पाहिल्यान्दाच इथे या कलादालनात प्रतिसाद देत आहे .. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा