तू चंद्र माझा
शांत,शुभ्र, साजिरा
तूज स्पर्शिण्या तूज मागे धावणारे
उथळ अभ्र मी....
येवून कवेत तूझ्या
नीखळ उब मनी भरावी
प्रकाशावे मी एवढे
की लाजावी मजसमोर चांदणी....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6113
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
चंद्र, चांदणी हौर अभ्र??
चंद्र, चांदणी हौर अभ्र??
हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत
In reply to चंद्र, चांदणी हौर अभ्र?? by यशोधरा
हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत दिला असतात तर बरे झाले असते. नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? का पटत नाहीये ही कल्पना तुम्हाला? तुमच्या स्पष्टीकरणाची झाली तर मदतच होईल लेखिकेला नाही का?
तुम्ही काय करावं काय नाही हे सांगण्याचा अधिकार मला मुळीच नाही पण आपलं मत स्पष्ट शब्दात मांडता यावं इतके प्रगल्भ वाचक नक्कीच आहेत इथे. माझंही मत मी स्पष्ट शब्दात व्यक्त केलं म्हणून राग मानू नये.
धन्यवाद.
मला तेच म्हणायचे आहे जे मी
In reply to हा प्रतिसाद अजून थोडा विस्तृत by सिक्रेटसुपरस्टार
मला तेच म्हणायचे आहे जे मी लिहिले आहे! आधीच कविता चिमकुली ( चिमुकली नाही बरं) त्याला प्रतिसाद मोठा म्हणजे मियां मुठभर आणि दाढी हातभर असे नाही का होणार? म्हणून हो!
तुम्ही इतरांना हातभर प्रतिसाद लिहिण्यापेक्षा कवितेबद्दल नाही का लिहायचे? च्च!
अच्छा, सगळ्यांनाच तुमचे
In reply to मला तेच म्हणायचे आहे जे मी by यशोधरा
अच्छा, सगळ्यांनाच तुमचे क्रिप्टिक प्रतिसाद कसे समजतील? म्हणून सविस्तर लिहण्याची विनंती केली. मला कवितेबद्दल जे खटकलं ते खाली एका प्रतिसादात लिहले आहेच. तुम्हालाही त्याच बाबतीत आक्षेप आहे हे प्रतिसादातून कळत नव्हते. मला वाटलं तुम्हाला ही कल्पनाच आवडली नाही, त्यामुळे गैरसमज झाला. असो, लेखिकेने आता तुमचे इथले प्रतिसाद आवरा म्हणायच्या आधी रजा घेतलेली बरी.
तै कोरड्या आभाळाला अभ्र म्हणत
In reply to चंद्र, चांदणी हौर अभ्र?? by यशोधरा
तै कोरड्या आभाळाला अभ्र म्हणत असतील कवी/कवयित्री
म्हणू देत की. मी त्याबद्दल
In reply to तै कोरड्या आभाळाला अभ्र म्हणत by महासंग्राम
म्हणू देत की. मी त्याबद्दल काहीच म्हटले नाहीये.
सुंदर!
सुंदर!
थोडी अजून मोठी असती तर जास्त मजा आली असती.
हेच मनात आलं वाचल्यावर. एखादं
In reply to सुंदर! by सोन्या बागलाणकर
हेच मनात आलं वाचल्यावर. एखादं कडवं अजून असतं तर अजून छान वाटली असती.
तो ती अन चंद्र असा मामला आहे
In reply to प्रतिसाद संपादित केले !! by प्रसाद गोडबोले
तो ती अन चंद्र असा मामला आहे तर.
अन जावू द्या हो. काहीतरी दर्जेदार व्हायला हवे की नको? इतक्या दिवसात काय शिकलात? पुढे जायचे की नाही? की आहे तेथेच रहायचे? मुलगी शिकली प्रगती झाली. पाणी गाळा नारू टाळा. रस्तेपर मस्ती, जान नही सस्ती.
What do you want to say
In reply to तो ती अन चंद्र असा मामला आहे by पाषाणभेद
What do you want to say exactly.. be specific... I really don't understand last few lines ... And what do you exactly mean about first line as well
जगी हा खास ट्रोलांचा पसारा माजला सारा
In reply to What do you want to say by प्रणया
जगी हा खास ट्रोलांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत आंजावरी चमकतो ट्रोल हा तारा