Skip to main content

तुम्ही अजूनही केबल/ टाटा स्काय / डिश tv असे वापरता कि ऑनलाइन tv ला शिफ्ट झाले आहेत?

लेखक खंडेराव यांनी मंगळवार, 19/02/2019 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही आधी टाटा स्काय वापरायचो. आवडती चॅनेल्स जवळ जवळ ६०० रुपये महिना पडायची. घरातला TV संच मोठ्या स्क्रीनचा पण नॉन स्मार्ट आहे. ऍमेझॉन ने फायर स्टिक बाजारात आणल्यावर आम्ही ती पहिल्याच आठवड्यात विकत घेतली, आणि लक्षात आले, हे प्रकरण टाटा स्काय पेक्षा फारच चांगले आहे. १. जुना TV स्मार्ट झाला. २. भरपूर सिनेमे, सिरिअल्स यांचे कलेक्शन मिळाले. ३. youtube TV वर बघता यायला लागले. ४. सगळ्यात मोठा फायदा - शून्य जाहिराती. तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ची चलती होती, म्हणून हॉटस्टार चे एक वर्षाचे पैसे भरून तेही आमच्या TV वर दिसू लागले. prime आणि हॉटस्टार मिळून इतके कन्टेन्ट मिळाले कि आम्ही टाटा स्काय काढायचा निर्णय घेतला. एका महिन्यानंतर नार्कोस मुळे नेटफ्लिक्स सुद्धा सुरु झाले. आता, आम्ही हे तीन वापरतो - prime , हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स, आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतात, सगळ्या भाषांमध्ये! अगदी मसाला सिनेमा पासून मराठीतल्या अस्तु सारख्या आशयगर्द सिनेमांना ऍक्सेस मिळाला. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गरज पूर्ण संपली. यातला खर्च - १. टाटा स्काय ला आम्ही ६०० रुपये द्यायचो महिन्याला २. वरच्या तीन ला मिळून ४०० रुपये लागतात. ३. इंटरनेट, जे आम्ही तसेही वापरायचो, महिन्याला 900 लागतात - यात ५० MB वेग आणि अनलिमिटेड डेटा आहे. आणि कामाची गरज म्हणून आम्ही २ इंटरनेट सर्विस प्रोविडर ठेवले आहेत, त्यामुळे हा खर्च मी ० गृहीत धरतोय. तर, असे आमचे पैसे आणि मौल्यवान वेळ, जो जाहिरातींमध्ये जायचा दोन्हीही वाचत आहे. आणि, जागतिक सिरियल्स व सिनेमे बघायला मिळतात जे आपल्या बहुतांशी कन्टेन्ट च्या तुलनेत खूपच चांगले आहेत ( नार्कोस, GOT , मार्वलस मिस मेसाईल्स, यंग शेल्डन, बिग बँग थेअरी, माईक अँड मौली आणि इतर अनेक!) सध्या अजूनही लोक टाटा स्काय किंवा केबल ला इतके पैसे देतात, ते जर इंटरनेट स्वस्त असलेल्या भागात असतील तर हा उत्तम पर्याय आहे.

वाचने 49565
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by सस्नेह

माझ्या माहितीप्रमाणे बरेच न्यूज चॅनेल लाईव्ह बघता येतात. टीव्ही शोज लाईव्ह माझ्या पाहण्यात नाही, पण हॉटस्टार वाल्यानी जाहिरात केलीय की टीव्ही च्या आधी बघा म्हणून. किमान त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी बघता येतात असा अनुभव आहे. सध्या हॉटस्टार ची चांगली ऑफर चालू आहे. मी आधीच प्रीमियम घेतलंय; नाहीतर भारतीय प्रेक्षकांसाठी हा बेस्ट प्लॅन आहे.
Hotstar VIP – ₹365/year Live Sports: Including Cricket, Premier League & Formula 1 Latest episodes of Indian TV Shows at 6 AM everyday New Indian Movie Premieres Exclusive Hotstar Specials
https://www.hotstar.com/subscribe/get-started मला एकंदरीत ऍमेझॉन स्टिक हा चांगला पर्याय वाटतो. अँड्रॉइड बॉक्स मी वापरला नाही, पण मी काही गोष्टींचा विचार केला एक म्हणजे कन्टेन्ट साठी कुठले तरी पेड अँप घ्यावे लागणारच. मग ज्याच्यावर सपोर्ट चांगला मिळेल(विनासायास अपडेट वगैरे) तो पर्याय बरा म्हणजे नंतर काही कटकट नाही. दुसरं म्हणजे आपण खरेच सगळे फिचर वापरणार आहोत का बॉक्स चे? म्हणजे तुम्हाला अगदी घरगुती रिमोट वाला सेटअप चालणार असेल आणि कीबोर्ड, माउस, हार्ड डिस्क ची गरज नसेल तर स्टिक बेस्ट आहे. तसंही आजकाल टोरंट वगैरे वापरायचं प्रमाण कमी होतंय. आणि मी तरी ऑनलाईन बघायचं तर चांगली क्वालिटी असेल तरच बघतो, म्हणजे पायरेटेड चित्रपट(थेटरात आल्यावर लगेच वगैरे) ची गरज मला तरी नाही त्यामुळे इंटरनेट कनेक्शन चांगले आणि किमान २००-३०० GB महिन्याला हवे असे माझे मत आहे. (मी गाणी पण यूट्यूब वरच ऐकतो बहुतांश वेळा) मी स्टिक AVR ला जोडलीय आणि आजकाल बरेचसे content provider Dolby/5.1 साउंड आउटपुट देतात जे माझ्यासाठी बरे पडते. (बॉक्स वर सुद्धा असेल, माहित नाही) माझं म्हणणं आहे कि बॉक्स च्या वेगळेपणाचा उपयोग होणार असेल तरच घ्यावा कारण माझ्यामते थोडा अधिक त्रास निश्चित आहे. वरती लिहिल्याप्रमाणे ब्रँडेड पर्याय कमी आहेत, नवीन अपडेट्स मिळतील का? कितपत जागा खाणार? (स्टिक अगदीच छोटी आहे) आणि स्टिक घ्यायची तर प्राईम अकाऊन्ट असायलाच पाहिजे, तर उपयोग होईल. मला एयरटेल च्या ब्रॉडबँड प्लॅन सोबत मोफत आहे. बऱ्याच पोस्टपेड मोबाईल सोबत पण मिळतो. हॉटस्टार vip घेऊ शकता. नेटफ्लिक्स शेरिंग करूनच घेऊ शकतो कारण खूप महाग आहे. ते पण आपल्याला कितपत गरज आहे त्यावर ठरवता येते. मी नाही घेतलं अजून. झी५ लागेलच. स्टिक वापरून अजून तरी कुठली अडचण किंवा हे चालत नाही असं झालेलं नाही आहे. आपली गरज ओळखून घ्यावं. आणि स्मार्ट टीव्ही असेल तर शक्यतो गरज नाही लागत या सर्वांची. (AVR असेल तर टीव्ही पासून reverse optical cable वापरू शकता. पण मला स्टिक थेट AVR ला लावणं आवडत :) )

"how to use chromecast" How to make your tv smart How to stream / mirror phone on tv इत्यादी.

आॅगस्ट, २०१८पासून अॅमेझाॅन फायर स्टिक आणली व अॅमेझाॅन प्राईमची वार्षिक वर्गणी भरली. स्मार्ट टीव्ही नाही. केबल जानेवारी, २०१८ पासून बंद केले होते. बातम्या व सिरियल्स पहाणे यात सवयीने ठराविक वेळ जायचा पण गेलेला वेळ फार काही चांगला गेला नाही हे सतत जाणवल्याने केबल बंद केलं होतं. केबल बंद केल्यावर वेळ मिळाला. यूट्यूबवर शोधून पाहिल्यावर "वंशवृक्ष" https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b62301&lang=marat… या आवडलेल्या अनुवादित कादंबरीवर आधारित कानडी सिनेमा इंग्रजी सबटायटल्ससह पहायला मिळाला. कादंबरी अधिक आवडली पण सिनेमाही चांगला आहे. अॅमेझाॅन प्राईमवर गेल्या आठवड्यात कादंबरीवर आधारित https://en.m.wikipedia.org/wiki/Mithunam_(2012_film) हा तेलगु सिनेमा सबटायटल्ससह पाहिला. गायक एस पी बालसुब्रहमण्यम् व (ज्यूली)लक्ष्मी या दोघांच्याच भूमिका असलेला सिनेमा कथा, फोटोग्राफी, संगीत, अभिनय, इ. सर्व बाबतीत त्या नायकाच्या भाषेत "अद्भुतम्" वाटला. वेगवेगळ्या प्रकारची करमणूक, माहिती, इ. हव्या त्या वेळेत उपलब्ध होणं नव्या व्यवस्थेत शक्य झालं आहे. वाहिन्या विविध गोष्टी आपल्या डोक्यात कळतनकळत भरवत असतात ते बंद झालं आहे. आदल्या दिवसापर्यंतच्या सिरियल्स जाहिरातींशिवाय उपलब्ध आहेत असं आत्तातरी दिसत आहे. बरंच काही उपलब्ध आहे. जे काही आवडतं ते "शोधाल तर सापडेल" हे इथेही खरं आहे.

धन्यवाद सर्व प्रतिसादक आणि धागालेखक. सध्या चांगल्या इन्टरनेट कनेक्शनच्या शोधात आहे.

डीटीएच सेवा वापरत असलो तरी ऑनलाईन कंटेंट पाहण्यात बराच वेळ जातो. डीटीएच सेवा खर्‍या स्वस्त व्हायला हव्या होत्या ! चॅनलवर जाहिरातीतुन प्रचंड उत्पन्न मिळत असताना लोकांनी वेगळे पैसे का ध्यायचे ? पेड चॅनलवर जाहिराती असता कामा नये ! नेट कनेक्टेड स्मार्ट फोनमुळे नेट कनेक्टेड राहणार्‍यांची संख्यां वेगाने वाढत आहे,त्यामुळे डीटीएच वाल्यांनी काळाची पाउले ओळखली पाहिजेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |

In reply to by मदनबाण

भारतात नव्वदीच्या दशकात सर्व वाहिन्या फुकटच होत्या. पहिल्यांदा स्टार टीव्हीने शुल्क आकारायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही जाहिराती दाखवणार नाही, असे जाहीर केले होते. पण कालांतराने हळू हळू शुल्क + जाहिराती असं सुरु झालं. मग सगळ्याच वाहिन्यांनी शुल्क +जाहिराती असं दुहेरी उत्पन्न सुरू केलं.

केबल असणारे ग्राहक -- ज्यांना निरनिराळे स्पोर्टस चानेलस, एंटरटेनमेंट चानेल्स पाहायचे असत त्यांच्यासाठी केबलचे तिनशे रुपये वसुल होते. जे ग्राहक मोजकेच म्हणजे फक्त मराठी चानेल्स पॅकेज पाहात त्यांना टाटास्काय डिटीएच १३९ रुपयात देत असे. ------- ट्राइ आल्यावर टाटास्काई, डिशटिवीचे फक्त मराठी पॅकेजचे २६० होतात. केबलवाला फक्त मराठी पॅकेज देत नाही सर्वांबरोबर त्याचेकडूनही ३५० घेत आहे. ------------ चानेल अधिक अथवा वजा करणे डिशटीवीमधून चुटकीत होते. त्यांच्या साइटवर सबमिट बटण दाबले की लगेच चानेल्स चालू/ बंद. मी डिशटिवीचे - १०० फ्रीटुएर अधिक १९रुपयेवाले पाच, अधिक इतर पाच ते आठ रु वाले वीस अधिक रेकॅार्डिंग सर्विसचे तीस मिळून ३२० रु देतो. --------- इंटरनेट आधारित ओनलाइन सर्विस हे संपुर्ण वेगळे आहे ते सॅटेलाइट डिटिएचला पर्याय नाहीच. ती अधिकची सोय आहे.

फुकट ते पौष्टीक असे काही शोधताना https://tubitv.com या संस्थळाचा शोध लागला. बरेच फुकट कन्टेन्ट आहे. थोडे दिवस फुकटचा टाईम पास करणार्‍यांसाठी चांगले आहे असे दिसते.