Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खंडेराव on Tue, 02/19/2019 - 17:33
आम्ही आधी टाटा स्काय वापरायचो. आवडती चॅनेल्स जवळ जवळ ६०० रुपये महिना पडायची. घरातला TV संच मोठ्या स्क्रीनचा पण नॉन स्मार्ट आहे. ऍमेझॉन ने फायर स्टिक बाजारात आणल्यावर आम्ही ती पहिल्याच आठवड्यात विकत घेतली, आणि लक्षात आले, हे प्रकरण टाटा स्काय पेक्षा फारच चांगले आहे. १. जुना TV स्मार्ट झाला. २. भरपूर सिनेमे, सिरिअल्स यांचे कलेक्शन मिळाले. ३. youtube TV वर बघता यायला लागले. ४. सगळ्यात मोठा फायदा - शून्य जाहिराती. तेव्हा गेम ऑफ थ्रोन्स ची चलती होती, म्हणून हॉटस्टार चे एक वर्षाचे पैसे भरून तेही आमच्या TV वर दिसू लागले. prime आणि हॉटस्टार मिळून इतके कन्टेन्ट मिळाले कि आम्ही टाटा स्काय काढायचा निर्णय घेतला. एका महिन्यानंतर नार्कोस मुळे नेटफ्लिक्स सुद्धा सुरु झाले. आता, आम्ही हे तीन वापरतो - prime , हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स, आणि घरातल्या सगळ्यांच्या आवडीचे कार्यक्रम बघता येतात, सगळ्या भाषांमध्ये! अगदी मसाला सिनेमा पासून मराठीतल्या अस्तु सारख्या आशयगर्द सिनेमांना ऍक्सेस मिळाला. थिएटर मध्ये जाऊन सिनेमा बघण्याची गरज पूर्ण संपली. यातला खर्च - १. टाटा स्काय ला आम्ही ६०० रुपये द्यायचो महिन्याला २. वरच्या तीन ला मिळून ४०० रुपये लागतात. ३. इंटरनेट, जे आम्ही तसेही वापरायचो, महिन्याला 900 लागतात - यात ५० MB वेग आणि अनलिमिटेड डेटा आहे. आणि कामाची गरज म्हणून आम्ही २ इंटरनेट सर्विस प्रोविडर ठेवले आहेत, त्यामुळे हा खर्च मी ० गृहीत धरतोय. तर, असे आमचे पैसे आणि मौल्यवान वेळ, जो जाहिरातींमध्ये जायचा दोन्हीही वाचत आहे. आणि, जागतिक सिरियल्स व सिनेमे बघायला मिळतात जे आपल्या बहुतांशी कन्टेन्ट च्या तुलनेत खूपच चांगले आहेत ( नार्कोस, GOT , मार्वलस मिस मेसाईल्स, यंग शेल्डन, बिग बँग थेअरी, माईक अँड मौली आणि इतर अनेक!) सध्या अजूनही लोक टाटा स्काय किंवा केबल ला इतके पैसे देतात, ते जर इंटरनेट स्वस्त असलेल्या भागात असतील तर हा उत्तम पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
  • 49306 views

प्रतिक्रिया

Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on गुरुवार, 02/28/2019 - 07:53

In reply to युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून by कंजूस

Permalink

नाही, HDMI पोर्ट असलेलेच

नाही, HDMI पोर्ट असलेलेच टीव्ही स्मार्ट होऊ शकतात
  • Log in or register to post comments

Submitted by सुखी on गुरुवार, 02/28/2019 - 10:10

In reply to युएसबी वाइफाइ अडॅप्टर वापरून by कंजूस

Permalink

USB port नाही, पण टीव्ही ला

USB port नाही, पण टीव्ही ला dvd player Che ports असतील तर Android box ना स्मार्ट करता येईल
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on गुरुवार, 02/28/2019 - 10:42

Permalink

मी दिवसात फक्त सात तास काम

मी दिवसात फक्त सात तास काम करतो( जाण्यायेण्याचा वेळ जास्तीत जास्त १५ मिनिटे) तरीही मला दूरचित्रवाणी पाहायला वेळ मिळत नाही. लोकांना सिरीयल किंवा नेट कन्टेन्ट पाहायला वेळ कसा मिळतो हेच एक कोडे आहे. मी निवृत्त लोकांचे म्हणत नाहीये. माझ्याकडे दोन FULL HD LED दूरचित्रवाणी संच आहेत १ ५५ इंचाचा आणि दुसरा ४२ इंचाचा. घरात ५० एम बी पी एसचा अमर्यादित रुंद पट्टा आहे. तरीही अजून क्रोमकास्ट किंवा फायरस्टिक घ्यावी असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on गुरुवार, 03/07/2019 - 21:18

In reply to मी दिवसात फक्त सात तास काम by सुबोध खरे

Permalink

कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद

कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद यासाठी तुम्ही दुसरे काही करत असणार, किंवा TV बघणे हे तूच्छ / cheap लोकांचे लक्षण असून स्वतः ला तुम्ही उच्च अभिरुची असणारे समजत असणार.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sat, 03/30/2019 - 12:44

In reply to कदाचित मनोरंजन, विरंगुळा, छंद by वगिश

Permalink

नाही हो. इतका हुच्चभ्रू नाही

नाही हो. इतका हुच्चभ्रू नाही मी टीव्ही वरच ३०० चॅनेल आहेत त्यात ४५-५० एच डी चॅनेल आहेत. वैद्यकीय साहित्य, विविध विषयाचे वाचन, मिपा, संगणक, शेअर बाजार आणि सार्वजनिक न्यास (व्हॉट्स अँप) यातून वेळ मिळतो त्यात डिस्कव्हरी, नॅट जिओ किंवा क्रिकेट मॅच एवढेच टीव्ही वर पाहतो. एवढं सोडून अधिक कुठे आणि कसं करायचं?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on गुरुवार, 02/28/2019 - 11:07

Permalink

माध्यमाचा उपयोग माहितीसाठी

माध्यमाचा उपयोग माहितीसाठी नक्कीच आहे पण त्यावेळेस गरज पडेल तेव्हा युट्युब विडिओ बघतो. मोबाइल माध्यम आणि रोज चार जीबी पुरतं. टिविवर फक्त मोठे दिसते. करमणूक म्हणून काहींना गरज असते. तेव्हा मोठा पडदा ओके. मराठी मालिकांमध्ये संवाद महत्त्वाचे असतात. परदेशी चित्रपटांत अॅक्शन.
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Sun, 03/17/2019 - 08:41

Permalink

बातमी

जुना धागा उकरून काढतोय :) या विषया संदर्भातली ही बातमी बघा. https://www.loksatta.com/manoranjan-news/over-the-top-in-entertainment-1858974/
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Mon, 03/18/2019 - 12:59

In reply to बातमी by लई भारी

Permalink

@लई भारी , माहितीपुर्ण

@लई भारी , माहितीपुर्ण लेख आहे. पुढील दिवस याण्चेच असतील याअत शन्का नाही !
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Mon, 03/18/2019 - 14:49

In reply to @लई भारी , माहितीपुर्ण by चौथा कोनाडा

Permalink

लई भारी

चांगला लेख, आपल्या इथल्या चर्चेतले बरेच मुद्दे आहेत. "आधी प्रेक्षक सवयीने मालिका ज्या वेळी प्रसारित होते, त्याच वेळेत ती पाहायचे. आता याचे प्रमाण सुमारे ७५ टक्क्यांनी कमी झाले असून मालिकांचे पुन:प्रसारित भाग किंवा पाहायचे राहिलेले भाग ‘ओटीटी’वर जाऊन पाहणारा प्रेक्षकवर्ग वाढला आहे" हा ७५% आकडा चुकीचा वाटतोय, प्रमाण कमी झाले असावे हे नक्की..
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 03/18/2019 - 11:51

Permalink

हे प्रकर्ण भारी दिसतंय !

कुणीतरी या अग्निकांडी/ अग्निखोका आणि अँड्रॉईड खोका याबद्दल तपशिलात सांगेल काय ? यासाठी काय काय साहित्य लागते आणि कुठे कुठे काय काय जोडावे लागते ? (केबल आणि डीटीएच मुळे संत्रस्त) स्नेहा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 03/18/2019 - 13:18

In reply to हे प्रकर्ण भारी दिसतंय ! by सस्नेह

Permalink

वायफाय आधारित कमीत कमी ४

वायफाय आधारित कमीत कमी ४ एमबीपीएस वेग असलेले अमर्यादित इंटरनेट, एचडीएमआय पोर्ट असलेला एलसीडी/एलईडी टिव्ही. फायर स्टीक टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टला जोडून कॉन्फिग्यर करायची. सोपे आहे खूप.
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Mon, 03/18/2019 - 14:46

In reply to वायफाय आधारित कमीत कमी ४ by प्रचेतस

Permalink

हो

तुमचे जर ऍमेझॉन अकाउंट असेल तर फायर स्टिक अकाउंट लिंक होऊनच आलेली असते. तिला फक्त घरातील वाय फाय शी कनेक्ट करावे लागते. एक इलेक्ट्रिक सॉकेट लागते विजेसाठी, जे टीव्ही जवळ असतेच बहुतेक वेळा. ५ मिनिटात सेट अप पूर्ण होऊन तुम्ही बघायला सुरुवात करू शकता..
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 03/18/2019 - 12:57

Permalink

घरातले चारपाच लोक - आई वडील

घरातले चारपाच लोक - आई वडील ,मुले स्मार्ट टिवी / इंटरनेट आधारित विडिओ / स्टि्रिमिंग करून कार्यक्रम बघतील तर रोजचा ८ - १० जिबी डेटा लागेल ना?
  • Log in or register to post comments

Submitted by खंडेराव on Mon, 03/18/2019 - 14:43

In reply to घरातले चारपाच लोक - आई वडील by कंजूस

Permalink

नाही

कमी डेटा मधेही भागेल. फायर स्टिक मध्ये quality कंट्रोल करायची सोय आहे. तुम्ही तुमच्या इंटरनेट पॅक नुसार मॅनेज करू शकाल.. दिवसाला २-३ जीबी पुरावा.. मला महिन्याला ८५० जीबी डेटा मिळतो, त्यातला २०० सुद्धा वापरला जात नसावा सर्व पकडून
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 03/18/2019 - 16:49

Permalink

Android बॉक्स बद्दल कुणी

Android बॉक्स बद्दल कुणी सांगू शकेल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by अजय देशपांडे on Mon, 03/18/2019 - 18:22

In reply to Android बॉक्स बद्दल कुणी by सस्नेह

Permalink

android box

हो मी सध्या वापरत आहे ..,,,, साधारण किमत 2500 ते 3500 या रेंज मध्ये मिळतो वापरण्यासथी अतिशय सोपा , वायरलेस कीबोर्ड माऊस वापरता येतो नेट वापरता येते मोबाइल फोन कास्ट करता येतो अतिशय छान आहे वापरा
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 03/18/2019 - 20:55

In reply to android box by अजय देशपांडे

Permalink

यावर काय काय पाहता येते नि तो

यावर काय काय पाहता येते नि तो टीव्ही व ब्रॉडबँड ला कसा जोडतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 03/19/2019 - 07:55

In reply to यावर काय काय पाहता येते नि तो by सस्नेह

Permalink

अँड्रॉइड बॉक्स

सिपीयू मोठ्या टीव्हीला जोडलाय असा विचार करा. हा झाला विंडोज बॉक्स. आता एक अँड्रॉइड स्मार्टमोबाईल(स्क्रीन नसलेला) मोठ्या टीव्हीला जोडलाय अशी कल्पना करा. याला अँड्रॉइड बॉक्स म्हणता येईल. किंवा अँड्रॉइड बेस्ड सेटटॉप बॉक्स पण डिशऐवजी इंटरनेट कनेक्शनवर चालणारा. यात युट्युब, अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, अल्ट बालाजी असे ऑनलाईन स्ट्रीमिंग चे अँप मोबाईल सारखे इन्स्टॉल करायचे. (बऱ्याचदा प्रीलोडेड असू शकतात). हा वायफायने इंटरनेटला जोडायचा, hdmiने टीव्हीला जोडायचा अन करायचं सुरू. यात फारसे ब्रँडेड पर्याय दिसले नाहीत आता. Image removed. काही वर्षांपूर्वी लेनोवो ने एक आणला होता. अजूनही मिळतो पण अँड्रॉइड ५ लॉलीपॉपवर असल्याने फारच आउटडेटेड आहे. Image removed. मुळात फायरस्टिक, क्रोमकास्ट, अँड्रॉइडबॉक्स, हे नॉनस्मार्टटीव्हीसाठी आहेत. स्मार्टटीव्ही असेल तर यातील कशाचीही गरज नाही. त्यावर थेट अँप टाकून किंवा मोबाईल कास्ट करून बघता येईल. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 03/19/2019 - 12:22

In reply to अँड्रॉइड बॉक्स by तुषार काळभोर

Permalink

ओह !

ओक्के आणि धन्स पैलवानजी. यापैकी फायरस्टिक अधिक उपयुक्त आणि वापरण्यास सुटसुटीत आहे की अँड्रॉईड बॉक्स ?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 03/19/2019 - 12:25

In reply to ओह ! by सस्नेह

Permalink

आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे

आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे किंवा न्यूज चॅनलचे अ‍ॅप डालो केले तर लाइव्ह कार्यक्रम पाहता येतील का ?
  • Log in or register to post comments

Submitted by लई भारी on Fri, 04/05/2019 - 12:17

In reply to आणखी म्हणजे समजा सोनी मराठीचे by सस्नेह

Permalink

हे बघा

माझ्या माहितीप्रमाणे बरेच न्यूज चॅनेल लाईव्ह बघता येतात. टीव्ही शोज लाईव्ह माझ्या पाहण्यात नाही, पण हॉटस्टार वाल्यानी जाहिरात केलीय की टीव्ही च्या आधी बघा म्हणून. किमान त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी बघता येतात असा अनुभव आहे. सध्या हॉटस्टार ची चांगली ऑफर चालू आहे. मी आधीच प्रीमियम घेतलंय; नाहीतर भारतीय प्रेक्षकांसाठी हा बेस्ट प्लॅन आहे.
Hotstar VIP – ₹365/year Live Sports: Including Cricket, Premier League & Formula 1 Latest episodes of Indian TV Shows at 6 AM everyday New Indian Movie Premieres Exclusive Hotstar Specials
https://www.hotstar.com/subscribe/get-started मला एकंदरीत ऍमेझॉन स्टिक हा चांगला पर्याय वाटतो. अँड्रॉइड बॉक्स मी वापरला नाही, पण मी काही गोष्टींचा विचार केला एक म्हणजे कन्टेन्ट साठी कुठले तरी पेड अँप घ्यावे लागणारच. मग ज्याच्यावर सपोर्ट चांगला मिळेल(विनासायास अपडेट वगैरे) तो पर्याय बरा म्हणजे नंतर काही कटकट नाही. दुसरं म्हणजे आपण खरेच सगळे फिचर वापरणार आहोत का बॉक्स चे? म्हणजे तुम्हाला अगदी घरगुती रिमोट वाला सेटअप चालणार असेल आणि कीबोर्ड, माउस, हार्ड डिस्क ची गरज नसेल तर स्टिक बेस्ट आहे. तसंही आजकाल टोरंट वगैरे वापरायचं प्रमाण कमी होतंय. आणि मी तरी ऑनलाईन बघायचं तर चांगली क्वालिटी असेल तरच बघतो, म्हणजे पायरेटेड चित्रपट(थेटरात आल्यावर लगेच वगैरे) ची गरज मला तरी नाही त्यामुळे इंटरनेट कनेक्शन चांगले आणि किमान २००-३०० GB महिन्याला हवे असे माझे मत आहे. (मी गाणी पण यूट्यूब वरच ऐकतो बहुतांश वेळा) मी स्टिक AVR ला जोडलीय आणि आजकाल बरेचसे content provider Dolby/5.1 साउंड आउटपुट देतात जे माझ्यासाठी बरे पडते. (बॉक्स वर सुद्धा असेल, माहित नाही) माझं म्हणणं आहे कि बॉक्स च्या वेगळेपणाचा उपयोग होणार असेल तरच घ्यावा कारण माझ्यामते थोडा अधिक त्रास निश्चित आहे. वरती लिहिल्याप्रमाणे ब्रँडेड पर्याय कमी आहेत, नवीन अपडेट्स मिळतील का? कितपत जागा खाणार? (स्टिक अगदीच छोटी आहे) आणि स्टिक घ्यायची तर प्राईम अकाऊन्ट असायलाच पाहिजे, तर उपयोग होईल. मला एयरटेल च्या ब्रॉडबँड प्लॅन सोबत मोफत आहे. बऱ्याच पोस्टपेड मोबाईल सोबत पण मिळतो. हॉटस्टार vip घेऊ शकता. नेटफ्लिक्स शेरिंग करूनच घेऊ शकतो कारण खूप महाग आहे. ते पण आपल्याला कितपत गरज आहे त्यावर ठरवता येते. मी नाही घेतलं अजून. झी५ लागेलच. स्टिक वापरून अजून तरी कुठली अडचण किंवा हे चालत नाही असं झालेलं नाही आहे. आपली गरज ओळखून घ्यावं. आणि स्मार्ट टीव्ही असेल तर शक्यतो गरज नाही लागत या सर्वांची. (AVR असेल तर टीव्ही पासून reverse optical cable वापरू शकता. पण मला स्टिक थेट AVR ला लावणं आवडत :) )
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 03/19/2019 - 05:35

Permalink

या जोडण्यांवर युट्युबवर

या जोडण्यांवर युट्युबवर विडिओज आहेत पण कुणी मराठीत चिकटवा इथे फोटोंतून.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Tue, 03/19/2019 - 12:23

In reply to या जोडण्यांवर युट्युबवर by कंजूस

Permalink

तूनळीवर काय म्हणून सर्च

तूनळीवर काय म्हणून सर्च करावे लागेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 03/19/2019 - 12:51

Permalink

"how to use chromecast"

"how to use chromecast" How to make your tv smart How to stream / mirror phone on tv इत्यादी.
  • Log in or register to post comments

Submitted by पलाश on Sun, 03/24/2019 - 19:29

Permalink

आॅगस्ट, २०१८पासून अॅमेझाॅन

आॅगस्ट, २०१८पासून अॅमेझाॅन फायर स्टिक आणली व अॅमेझाॅन प्राईमची वार्षिक वर्गणी भरली. स्मार्ट टीव्ही नाही. केबल जानेवारी, २०१८ पासून बंद केले होते. बातम्या व सिरियल्स पहाणे यात सवयीने ठराविक वेळ जायचा पण गेलेला वेळ फार काही चांगला गेला नाही हे सतत जाणवल्याने केबल बंद केलं होतं. केबल बंद केल्यावर वेळ मिळाला. यूट्यूबवर शोधून पाहिल्यावर "वंशवृक्ष" https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b62301&lang=marathi या आवडलेल्या अनुवादित कादंबरीवर आधारित कानडी सिनेमा इंग्रजी सबटायटल्ससह पहायला मिळाला. कादंबरी अधिक आवडली पण सिनेमाही चांगला आहे. अॅमेझाॅन प्राईमवर गेल्या आठवड्यात कादंबरीवर आधारित https://en.m.wikipedia.org/wiki/Mithunam_(2012_film) हा तेलगु सिनेमा सबटायटल्ससह पाहिला. गायक एस पी बालसुब्रहमण्यम् व (ज्यूली)लक्ष्मी या दोघांच्याच भूमिका असलेला सिनेमा कथा, फोटोग्राफी, संगीत, अभिनय, इ. सर्व बाबतीत त्या नायकाच्या भाषेत "अद्भुतम्" वाटला. वेगवेगळ्या प्रकारची करमणूक, माहिती, इ. हव्या त्या वेळेत उपलब्ध होणं नव्या व्यवस्थेत शक्य झालं आहे. वाहिन्या विविध गोष्टी आपल्या डोक्यात कळतनकळत भरवत असतात ते बंद झालं आहे. आदल्या दिवसापर्यंतच्या सिरियल्स जाहिरातींशिवाय उपलब्ध आहेत असं आत्तातरी दिसत आहे. बरंच काही उपलब्ध आहे. जे काही आवडतं ते "शोधाल तर सापडेल" हे इथेही खरं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sun, 03/24/2019 - 20:21

Permalink

मालिकांचे मोठे गिऱ्हाइक

मालिकांचे मोठे गिऱ्हाइक कुटुंबातले कोण असतात ते सर्वांनाच माहीत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Mon, 03/25/2019 - 11:28

Permalink

हम्म...

धन्यवाद सर्व प्रतिसादक आणि धागालेखक. सध्या चांगल्या इन्टरनेट कनेक्शनच्या शोधात आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 03/30/2019 - 09:10

Permalink

डीटीएच सेवा वापरत असलो तरी

डीटीएच सेवा वापरत असलो तरी ऑनलाईन कंटेंट पाहण्यात बराच वेळ जातो. डीटीएच सेवा खर्‍या स्वस्त व्हायला हव्या होत्या ! चॅनलवर जाहिरातीतुन प्रचंड उत्पन्न मिळत असताना लोकांनी वेगळे पैसे का ध्यायचे ? पेड चॅनलवर जाहिराती असता कामा नये ! नेट कनेक्टेड स्मार्ट फोनमुळे नेट कनेक्टेड राहणार्‍यांची संख्यां वेगाने वाढत आहे,त्यामुळे डीटीएच वाल्यांनी काळाची पाउले ओळखली पाहिजेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Sat, 03/30/2019 - 09:40

In reply to डीटीएच सेवा वापरत असलो तरी by मदनबाण

Permalink

पेड वाहिन्या आणि जाहिराती

भारतात नव्वदीच्या दशकात सर्व वाहिन्या फुकटच होत्या. पहिल्यांदा स्टार टीव्हीने शुल्क आकारायला सुरुवात केली. तेव्हा आम्ही जाहिराती दाखवणार नाही, असे जाहीर केले होते. पण कालांतराने हळू हळू शुल्क + जाहिराती असं सुरु झालं. मग सगळ्याच वाहिन्यांनी शुल्क +जाहिराती असं दुहेरी उत्पन्न सुरू केलं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/15/2019 - 22:28

In reply to डीटीएच सेवा वापरत असलो तरी by मदनबाण

Permalink

केबल शुल्कवाढ ऑनलाइन

केबल शुल्कवाढ ऑनलाइन वाहिन्यांच्या पथ्यावर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Tere Bina Zindagi Se Koi | The Kroonerz Project | Ft. Bhavya Pandit | Anurag Mishra
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Sat, 04/13/2019 - 17:00

Permalink

नेटफ्लिक्स ला डेबीट्/क्रेडीट

नेटफ्लिक्स ला डेबीट्/क्रेडीट कार्ड वापरणे आवश्यक आहे का ? नेट बँकींग चालत नाही का ?
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 04/16/2019 - 06:30

Permalink

केबल असणारे ग्राहक --

केबल असणारे ग्राहक -- ज्यांना निरनिराळे स्पोर्टस चानेलस, एंटरटेनमेंट चानेल्स पाहायचे असत त्यांच्यासाठी केबलचे तिनशे रुपये वसुल होते. जे ग्राहक मोजकेच म्हणजे फक्त मराठी चानेल्स पॅकेज पाहात त्यांना टाटास्काय डिटीएच १३९ रुपयात देत असे. ------- ट्राइ आल्यावर टाटास्काई, डिशटिवीचे फक्त मराठी पॅकेजचे २६० होतात. केबलवाला फक्त मराठी पॅकेज देत नाही सर्वांबरोबर त्याचेकडूनही ३५० घेत आहे. ------------ चानेल अधिक अथवा वजा करणे डिशटीवीमधून चुटकीत होते. त्यांच्या साइटवर सबमिट बटण दाबले की लगेच चानेल्स चालू/ बंद. मी डिशटिवीचे - १०० फ्रीटुएर अधिक १९रुपयेवाले पाच, अधिक इतर पाच ते आठ रु वाले वीस अधिक रेकॅार्डिंग सर्विसचे तीस मिळून ३२० रु देतो. --------- इंटरनेट आधारित ओनलाइन सर्विस हे संपुर्ण वेगळे आहे ते सॅटेलाइट डिटिएचला पर्याय नाहीच. ती अधिकची सोय आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on गुरुवार, 06/06/2019 - 18:58

Permalink

ट्युबी टीवी

फुकट ते पौष्टीक असे काही शोधताना https://tubitv.com या संस्थळाचा शोध लागला. बरेच फुकट कन्टेन्ट आहे. थोडे दिवस फुकटचा टाईम पास करणार्‍यांसाठी चांगले आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com